भारतीय समाज व्यवस्था
प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या आश्रम व्यवस्था-पंचऋण संकल्पना- चार पुरुषार्थ सामाजिक संस्थांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती.व्यक्ती विकासाबरोबरच समाजाचाही विकास घडवण्याच्या उद्देशाने प्राचीन भारतात सामाजिक जीवनात आश्रम संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान होते. प्राचीन भारतीयांनी समाज जीवनाची उद्दिष्टे व ध्येय स्पष्ट करताना पुरुषार्थ संकल्पनेला प्राधान्य दिले होते अध्यात्मिकता हा भारतीय संस्कृतीचा पाया असला तरी विचारवंतांनी लौकिक जीवनाचाही विशेष दृष्टीने विचार केला होता.
1. प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था
प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्थांची निर्मिती झाली त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती. व्यक्तीच्या लौकिक व पारलौकिक जीवनातील सुखदुःखाचा विचार करण्याबरोबरच व्यक्ती व समाजाच्या विकासाचाही विचार आश्रम व्यवस्थेत प्राधान्याने केला होता. व्यक्तीने विविध गुणसंपादन करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घ्यावा व याचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा ही ह्या संस्थांच्या निर्मिती मागील प्रमुख भूमिका होती. आश्रम संस्थेने नैतिक स्वरूपातील नियम मांडले होते. व्यक्तीने व समाजाने या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा होती. मात्र या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला शिक्षक देण्याची यंत्रणा अस्तित्वात नव्हती. आश्रम संस्थेच्या नियमाचे समाजातील सर्व घटकांनी स्वेच्छेने पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
आश्रम म्हणजे काय? आश्रम म्हणजे श्रम करण्याची जागा; समाजाच्या दृष्टीने व्यक्तीने कोणत्या वयामध्ये कोणते गुणसंपादन करावेत कोणते कार्य करावे, कोणती कर्तव्य पार पाडावीत, याविषयीचे नियम आश्रम संस्थेत सांगितले होते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्यास त्या समाजाच्याही विकास होतो असे मानले होते. भारतीय परंपरेनुसार एका व्यक्तीचे आयुष्य शंभर वर्षाचे मानलेले असून त्याचे चार आश्रमांमध्ये विभाजन करण्यात आले होते. ते चार आश्रम म्हणजे 1. ब्रह्मचर्याश्रम 2. गृहस्थाश्रम 3. वानप्रस्थाश्रम 4. संन्यास आश्रम
ब्रह्मचर्याश्रम :- व्यक्तीच्या जीवनातील पहिला व अतिशय महत्त्वाचा आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम होय. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत या आश्रमाचा कालखंड मानलेला होता. उपनयन संस्कार केल्यानंतर या आश्रमाची सुरुवात होत असे. उपनयन संस्कार करताना विद्यार्थ्याला भावी काळातील जीवनाविषयी माहिती दिली जात असे. पुढील 12 वर्षाच्या काळात त्याने गुरुगृही राहून नियमांचे पालन करून शिक्षण घ्यावे असे मानले होते. या काळात त्याने विविध विषयांचे ज्ञान मिळवावे, चांगल्या विषयाचे संपादन करावे अशी अपेक्षा होती. गुरुकुलामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील आश्रमात जाण्याची परवानगी दिली जात असे.
गृहस्थाश्रम:- व्यक्ती व समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम होय. व्यक्तीला या आश्रमात सुखांचा उपभोग घेण्याची परवानगी दिल्याने व्यक्तीच्या दृष्टीने गृहस्थाश्रम महत्त्वाचा मानतात. इतर आश्रम व समाजाची सर्वांगीण प्रगती गृहस्थ व्यक्तीच्या सहकार्यावर अवलंबून असल्याने या आश्रमाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रारंभीच्या काळात स्त्रियाही ब्रह्मचर्यात राहून शिक्षण घेत होत्या. पण नंतरच्या काळात बालविवाह पद्धतीमुळे स्त्रियांचा शिक्षण घेण्याचा अधिकार नष्ट झाला. 12 वर्षे आश्रमात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घेणाऱ्या व्यक्तीवर समावर्तन नावाचा संस्कार केला जात असे. त्यावेळी ब्रह्मचर्याश्रमात घालण्यात आलेल्या विविध बंधनातून व्यक्तीची मुक्तता होत असे. त्यानंतर व्यक्तीला आपल्या वर्णानुसार विवाह करण्याची परवानगी दिलेली होती. यानंतरच व्यक्तीच्या गृहस्थ जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असे. गृहस्थाश्रमाचा कालखंड 25 ते 50 वर्षे असा मानलेला होता गृहस्थ व्यक्तीने पुरुषार्थांची प्राप्ती करून घ्यावी तसेच पंच ऋणातून मुक्तता मिळवावी; हे गृहस्थ व्यक्तीसाठी आवश्यक मानलेले होते.
वानप्रस्थाश्रम :- गृहस्थाश्रमातील सर्व सुखांचा उपभोग तसेच संन्यास आश्रमातील सर्व सुखांचा त्याग या दोन परस्पर भिन्न असलेल्या अवस्थांच्या मधील वानप्रस्थाश्रम ही एक अवस्था आहे. व्यक्तीला सुखांचा उपभोग घेण्यापासून अलिप्त करण्याचे तसेच त्याच्यामध्ये त्यागाची प्रवृत्ती निर्माण करण्याचे कार्य या आश्रमात केले जात असे. सामान्यतः वयाच्या 50 वर्षानंतर कौटुंबिक व आर्थिक जबाबदारीतून व्यक्तीने स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न या काळात करावा. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसह अरण्यात जाऊन रहावे असे मानले होते. काही दिवस कुटुंबात राहून कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत व कौटुंबिक परंपरांच्या बाबतीत नवीन पिढीला मार्गदर्शन करावे ही अपेक्षा होती. या काळात व्यक्तीला काही कर्तव्य पार पाडण्यास सांगितली आहेत. वानप्रस्थाश्रमात व्यक्तीने दैनंदिन जीवनात यज्ञाचा अवलंब करावा ,सामाजिक जीवनातून संन्यस्थ प्रवृत्तीचा विकास करावा ,सुखांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, निश्चयपूर्वक व निर्धाराने प्रयत्न केल्याशिवाय कुटुंब व समाज याविषयी असणारी आसक्ती नष्ट होऊ शकत नाही. वानप्रस्थाश्रमाच्या 25 वर्षांच्या काळात मोक्ष अवस्था प्राप्त करून घ्यावी.
संन्यास आश्रम :- आश्रम संस्थेतील अतिशय कठीण जीवनाचा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम होय. वानप्रस्थाश्रमात सुखांची आसक्ती नष्ट करण्याचे व त्यागाची प्रवृत्ती विकसित करण्याचे काम वानप्रस्थाश्रमात होत असे. त्यामुळे संन्यास आश्रमात प्रवेश करताना व्यक्ती कोणत्याही सुखाच्या इच्छेपासून पूर्णतः विरक्त झालेला असे. संन्यास आश्रमात त्याने जंगलामध्ये वास्तव्य करावे. तसेच दैनंदिन जीवनातील नित्य यज्ञ, व्रत वैकल्य, देव देवतांची प्रार्थना यामध्येच जास्तीत जास्त काळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. लोकांकडून मिळणाऱ्या अन्नदानावर तसेच जंगलातील फळे, कंदमुळे यावरच आपला उदरनिर्वाह करावा. गृहस्थाश्रमात असताना त्याने धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची प्राप्त प्राप्ती तसेच पंच ऋणातून मुक्तता मिळवल्याने चौथा पुरुषार्थ म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी व्यक्ती संन्यास आश्रमाच्या काळात प्रयत्न करीत असे. पुढील काळात समाज जीवनात संन्यास आश्रमातील या कठीण व कठोर जीवनामुळेच संन्यास आश्रमाचे पालन करण्यास लोकांची तयारी राहिली नाही असे दिसते.
प्राचीन भारतातील आश्रमाचे महत्त्व -प्राचीन भारतात कार्यरत असलेल्या सर्व सामाजिक संस्थांमध्ये आश्रम संस्थेला विशेष महत्त्व होते. व्यक्ती विकासाबरोबरच समाजाचाही विकास घडवण्याच्या उद्देशाने प्राचीन भारतात सामाजिक जीवनात आश्रम संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान होते. व्यक्तीच्या वाढत्या वयाबरोबरच त्याला त्याच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देणे तसेच समाजासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा विकास होईल याकडे लक्ष देण्याचे काम आश्रम संस्थेने केले. आश्रम संस्थेच्या या वैशिष्ट्यांमुळेच पुढील काळात वर्णव्यवस्थेत ज्याप्रमाणे दोष निर्माण झाले तसे दोष आश्रम संस्थेत झालेले दिसत नाहीत. जोपर्यंत या आश्रम संस्थेच्या नैतिक नियमांचे समाजामध्ये योग्य पद्धतीने पालन होत होते तोपर्यंत आश्रम संस्था व्यक्ती व समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्तच ठरलेली दिसते.
2.पंचऋण संकल्पना-ऋग्वेदकाळापेक्षा उत्तर वेदकाळातील सामाजिक जीवनात महत्त्वाचे बदल झाले राज्य व्यवस्था निर्माण झाल्यामुळे शहरीकरण वाढले समाजाच्या सुख सोयी वाढल्या सामाजिक जीवनातही विविध परंपरा व संस्थांना महत्त्व मिळत गेले असे दिसते प्राचीन भारतीय विचारवंतांनी समाजासमोर काही आदर्श व्यवस्था व संकल्पना निर्माण केल्या या आदर्श संकल्पनांचे समाजाने काटेकोर पालन करावे असे अपेक्षित होते प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. पंचऋण संकल्पना प्राचीन भारतामध्ये सामाजिक जीवनात गृहस्थाश्रमातील व्यक्तीला पंच ऋणातून मुक्त होणे महत्त्वाचे मानलेले होते मानवाला आपल्या जीवनात पाच स्वरूपाचे ऋण म्हणजेच कर्ज असतात या ऋणातून मुक्तता मिळविल्याशिवाय व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होत नाही असे मानलेले होते प्राचीन भारतातील पंच ऋण पुढील प्रमाणे आहेत 1.देव ऋण 2.मातृ पितृ ऋण 3.गुरु ऋण 4.समाजऋण 5.पशुपक्षी ऋण
देव ऋण :- परमेश्वराने सजीव प्राण्यांमध्ये आपल्याला मानवाचा जन्म दिला व मोक्षप्राप्ती करून घेण्याची संधी दिली हे प्रत्येक मानवावर परमेश्वराचे ऋण मानलेले होते परमेश्वराचे स्मरण ठेवणे म्हणजेच त्याच्या ऋणातून मुक्ती मिळविणे होय असे मानलेले होतेमातृ पितृ ऋण :- आपल्याला माता पित्याने जन्म दिला, आपले संगोपन केले हे माता पित्याचे ऋण मानलेले होते. मानवाने त्यांची सेवा करून त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळवावी असे मानलेले होते.गुरु ऋण :- माता आणि पिता यांनी दिलेल्या अनौपचारिक शिक्षणानंतर अवपचारिक औपचारिक शिक्षणाद्वारे आपला पुनर्जन्म घडवण्याचे कार्य व ज्ञानाच्या माध्यमातून जीवनात सर्वांगीण विकास करण्याची संधी उपलब्ध करण्याचे काम गुरु करतात त्यामुळे हे गुरुचे ऋण मानलेले होतेसमाज ऋण :- ज्या समाजाने एक घटक म्हणून आपल्याला समाविष्ट करून घेतले तसेच आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण केले हे समाजाचे ऋण मानलेले होतेपशुपक्षी ऋण :- मानवाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जीवन जगण्यास मदत करणाऱ्या पशुपक्ष्यांचेही ऋण मानलेले होते अशा प्रकारे प्राचीन भारतीय समाजात पंच ऋणांना अनन्य साधारण महत्व होते
3. चार पुरुषार्थ आणि भारतीय समाज– प्राचीन भारतीयांनी समाज जीवनाची उद्दिष्टे व ध्येय स्पष्ट करताना पुरुषार्थ संकल्पनेला प्राधान्य दिले होते अध्यात्मिकता हा भारतीय संस्कृतीचा पाया असला तरी विचारवंतांनी लौकिक जीवनाचाही विशेष दृष्टीने विचार केला होता.उत्तर वेदकाळात मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष प्राप्ती करणे हे मानलेले होते प्रत्येक व्यक्तीने मोक्ष प्राप्तीसाठी कोणत्या आचार नियमांचे काटेकोर पालन करावे याची मी मांसा व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीने प्राधान्याने केलेले दिसते व्यक्तीने आपल्या जीवनात यश कसे मिळवावे मोक्ष प्राप्ती कशी साध्य करावी याविषयी सामाजिक संस्थांनी काही आदर्श मांडले होते या आदर्शाचे प्राचीन भारतीय समाजात काटेकोर पालन केले जात असे व्यक्तीच्या जीवनात चार पुरुषार्थ सांगण्यात आले होते.
पुरुषार्थ संकल्पना-प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या दृष्टीने पुरुषार्थ संकल्पना आदर्श मानली गेली होती. सामाजिक संस्था किंवा विचार प्रणाली म्हणजेच पुरुषार्थ होय. व्यक्तिने आपल्या जीवनात कोणते नियम पाळावेत, कोणती सुखी उपभोगावीत तसेच कोणती कर्तव्य पार पाडावीत याचे विश्लेषण पुरुषार्थ संकल्पनेत केलेले आहे. पुरुष म्हणजे व्यक्ती आणि अर्थ म्हणजे ज्या गोष्टीची इच्छा केली जाते अशी वस्तू. यावरून व्यक्ती ज्या गोष्टीची इच्छा करते ती साध्य करणे म्हणजे पुरुषार्थ होय. तसेच ज्याद्वारे ते उद्दिष्ट साध्य केले जाते त्यालाही पुरुषार्थ असे म्हणतात. प्राचीन भारतीय समाज जीवनात धर्म, अर्थ , काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना विशेष महत्त्व दिलेले होते.
धर्म :- पुरुषार्थ संकल्पनेत सर्वात महत्त्वाचा पुरुषार्थ म्हणून धर्म या संकल्पनेला महत्त्व दिलेले होते. धर्म या तत्त्वांमध्ये इतर तीन पुरुषार्थांचा समावेश होतो असे मानले जाते. धर्म या संकल्पनेत कोणत्याही आचाराचा किंवा विधींचा समावेश नव्हता. केवळ नैतिक बंधने यामध्ये सांगितलेली होती. धर्म हा शब्द ध्रु या संस्कृत मूळ शब्दापासून बनला आहे. ध्रु म्हणजे समाजाचे नियमन किंवा नियंत्रण करणारे आचार किंवा नैतिक बंधने असे मानलेले होते. ऋग्वेद काळात यालाच र्ऋत अशी संज्ञा दिली होती. र्ऋत म्हणजे नैतिक नियमांचे पालन करणे. या तत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला वरूण देवता शिक्षा देते असे मानलेले होते. महाभारतातही धर्म या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना नैतिक आचार विषयी नियमांना प्राधान्य दिले होते. धर्म या संकल्पनेत लौकिक जीवनातील उत्कर्षा बरोबरच पारलौकिक जीवनातील उत्कर्षाविषयीचे विचार व नियम यांचा समावेश होतो. याशिवाय स्मृती ग्रंथ व कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथांमध्येही धर्म या पुरुषार्थाचे विश्लेषण केलेले आहे. धर्म ही संकल्पना म्हणूनच भारतीय समाजामध्ये विशेष महत्त्वाची मानली जाते.
अर्थ:- प्राचीन भारतीय समाजाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अर्थ या संकल्पनेलाही धर्म या पुरुषार्थासोबत स्थान दिले होते. कौटिल्यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये व्यक्ती व समाजाच्या दृष्टीने अर्थ हा पुरुषार्थ अधिक महत्त्वाचा मानला आहे. मानवाच्या उपजीविकेची व चरितार्थासाठी लागणारी साधने म्हणजे अर्थ होय; असे मानलेले आहे. व्यक्तीला आपले जीवन सुखी करण्यासाठी पैशाची गरज असते. तसेच उपजीविकेचे साधन निर्माण करणे हेही आवश्यक मानलेले होते. अर्थ या पुरुषार्थाची प्राप्ती करताना व्यक्तीने धर्म बंधनाची जाणीव ठेवणे आवश्यक मानलेले होते. केवळ पैसा मिळविणे, अयोग्य आणि लाचार मार्गाने पैसा मिळवून आपली उपजीविका करणे याला मान्यता दिलेली नव्हती. अर्थ प्राप्ती करून घेण्यामध्येच गुंतल्यास कोणतीही व्यक्ती मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल करू शकत नाही असे मानलेले होते.
काम:- भारतीय संस्कृतीमध्ये काम या पुरुषार्थ संकल्पनेला धर्म व मोक्ष या संकल्पनेबरोबरचे स्थान दिलेले आहे. या पुरुषार्थाची प्राप्ती केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करता येत नाही. काम म्हणजे इच्छा विशिष्ट अर्थाने ऐहीक सुखाची इच्छा करणे म्हणजे काम असे मानलेले होते. वात्स्यायनाने लिहिलेल्या कामशास्त्र या ग्रंथात काम या संकल्पनेचे स्पष्टीकरण केलेले आहे. भारतीय विचारवंतांच्या मते काम पुरुषार्थ संपादन करताना व्यक्तीने नैतिक नियमांचे व बंधनांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण कामवासनेच्या पूर्ततेसाठी व्यक्ती गुंतून राहिल्यास तो मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करू शकत नाही.
मोक्ष:- उत्तर वेद काळानंतर मोक्ष मिळविणे हेच मानवाचे अंतिम ध्येय मांनण्यात आले. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेणे म्हणजे मोक्ष होय. गेल्या जन्मातील कर्म बंधनानुसार या जन्मामध्ये सुखदुःख भोगणे भाग पडते. मात्र व्यक्तिने या जन्मात नैतिक तत्त्वांचे काटेकोर पालन केल्यास तसेच शुद्ध आचार विचार ठेवल्यास कोणतीही नवीन कर्म बंधने निर्माण होत नाहीत असे मानले होते. गेल्या जन्मातील कर्म बंधनातून मुक्त झालेला आत्मा नवीन कर्म बंधने निर्माण न झाल्याने परिपूर्ण अवस्था म्हणजेच मोक्षप्राप्ती करू शकतो. मोक्ष प्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते. त्यासाठी चार पुरुषार्थांची प्राप्ती करणे आवश्यक मानले होते.
स्त्रिया व पुरुषार्थ संकल्पना:- प्राचीन भारतात पुरुषार्थांची प्राप्ती करून घेणे हे स्त्रियांच्या दृष्टीने ही आवश्यक मानलेले होते. विशेषतः पुरुषार्थाची प्राप्ती करून घेणे हे स्त्रियांचे कर्तव्य मानले होते. उत्तर वेदकाळात विवाह विधी मध्ये कन्यादान करताना वधू पिता आपल्या जावयाला धर्म, अर्थ, काम यांची प्राप्ती करून घेताना आपल्या मुलीची अवहेलना करू नये असे सांगत असे. यावरून स्त्रिया सुद्धा मोक्ष प्राप्ती साठी प्रयत्न करीत होत्या असे दिसते.
पुरुषार्थ संकल्पनेचे महत्त्व-प्राचीन भारतातील सामाजिक संस्थांमध्ये पुरुषार्थ या संकल्पनेला विशेष महत्त्वाचे स्थान होते. व्यक्तीच्या जीवनाचा तसेच सामाजिक जीवनाचाही विचार यामध्ये करण्यात आलेला होता. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असलेल्या मोक्ष प्राप्तीसाठी पुरुषार्थाची प्राप्ती करून घेणे आवश्यक मानलेले होते. मानवाच्या या जन्माबरोबरच मृत्यूनंतरच्या अवस्थेचाही विचार या संकल्पनेत करण्यात आला होता. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये पुरुषार्थ संकल्पनेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच व्यक्ती व समाजाच्या दृष्टीने पुरुषार्थ संकल्पनेला प्राचीन भारतीय समाजामध्ये विशेष महत्त्व दिलेले होते.
सारांश -प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्थांची निर्मिती झाली प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती.व्यक्ती विकासाबरोबरच समाजाचाही विकास घडवण्याच्या उद्देशाने प्राचीन भारतात सामाजिक जीवनात आश्रम संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान होते. प्राचीन भारतीयांनी समाज जीवनाची उद्दिष्टे व ध्येय स्पष्ट करताना पुरुषार्थ संकल्पनेला प्राधान्य दिले होते अध्यात्मिकता हा भारतीय संस्कृतीचा पाया असला तरी विचारवंतांनी लौकिक जीवनाचाही विशेष दृष्टीने विचार केला होता.
Indian Social System
Ancient Indian Ashram System
The ashram system was one of the major social institutions that were created in ancient India to help the progress of individuals and society. Apart from thinking about the happiness in the mundane and transcendental life of the individual, the development of the individual and the society was also considered as a priority in the Ashram system. The main role behind the creation of these institutions was that the individual should develop his personality by acquiring various qualities and use it for the development of the society. The Ashram Sanstha had laid down rules of moral nature. Individuals and society were expected to follow these rules strictly. However, there was no mechanism to provide a teacher to a person who did not follow these rules. It was hoped that all sections of the society would voluntarily follow the rul
What is Ashram?
An ashram means a place of labour; In terms of the society, the rules about what age a person should acquire, what work should be done, what duty should be performed, were stated in the ashram institution. It was believed that if the individual’s personality develops, the society also develops. According to Indian tradition, a person’s life is considered to be 100 years and it was divided into four ashrams. Those four Ashrams are 1. Brahmacharya Ashram 2. Grihasthashram 3. Vanaprasthashram 4. Sannyas Ashram
Brahmacharya Ashram :- The first and very important ashram in a person’s life is Brahmacharya Ashram. The period of this ashram was considered till the age of twenty-five years. This ashram used to start after the upanayan rites. During Upanayana Sanskar, the student was given information about the future life. During the next 12 years, he was supposed to stay in a Gurugriha and study according to the rules. During this period, he was expected to acquire knowledge of various subjects and acquire a good subject. After completing his education in the gurukula, he was allowed to move to the next ashram.
Grihasthashram:- Grihasthashram is a very important ashram in terms of individual and society. Grihasthashram is important to the individual as he is allowed to enjoy the pleasures in this ashram. This ashram is given special importance as the overall progress of other ashrams and society depends on the cooperation of the householder. In the early days women were also celibate and getting education. But in later times the right of women to get education was destroyed due to child marriage system. A person who completes his education and develops his personality by staying in an ashram for 12 years, a rite called Samavartan was performed. At that time, a person was freed from various restrictions placed in Brahmacharya ashram. A person was then allowed to marry according to his varna. It was only after this that a person’s household life really began. The period of grihasthashram was considered to be 25 to 50 years for the grihastha to achieve purusharthas and get rid of pancha debt; It was considered essential for a householder.
Vanaprasthashram :- Vanaprasthashram is a state between two mutually different states of enjoyment of all the pleasures of a householder and relinquishment of all the pleasures of a sannyasa ashram. The task of detaching a person from enjoyment of pleasures and inculcating in him the tendency of renunciation was done in this ashram. Generally after the age of 50, a person should try to distance himself from family and financial responsibilities during this period. For that he thought that he should go and live in the forest with his wife. He was expected to stay with the family for a few days and guide the new generation in family matters and family traditions. During this period the person is asked to perform some duties. A person in Vanaprasthashrama should adopt Yajna in daily life, develop a sannyastha tendency in social life, try to stay away from pleasures, attachment to family and society cannot be destroyed without resolute and determined efforts. During the 25 years of Vanaprasthashrama, the state of salvation should be attained.
Sannyas Ashram :- Sannyas Ashram is the most austere life ashram in an ashram institution. Vanprastashram used to destroy the attachment to pleasures and develop the tendency of renunciation. Therefore, on entering a sannyas ashram, a person is completely freed from any desire for pleasure. He should live in a forest in a sannyas ashram. Also, one should try to spend maximum time in daily sacrifices, vows and prayers to gods and goddesses in daily life. Livelihood should be based on food donations from people as well as forest fruits and tubers. While in Grihasthashram, he attained the realization of the three purusharthas of religion, artha and work, and after attaining liberation from the five evils, the person strived for the fourth purushartha, i.e. salvation, during the time of Sannyas Ashram. It seems that people are not ready to follow the Sannyas Ashram due to this difficult and harsh life in the Sannyas Ashram in the social life.
Significance of Ashram in Ancient India
Among all the social institutions functioning in ancient India, the ashram institution had a special importance. In ancient India, the ashram institution played an important role in the social life with the aim of developing the society as well as the individual. As the person grows older, the ashram institute worked to make him aware of his duties and responsibilities and to develop qualities necessary for the society. It is because of these characteristics of the ashram institution that in the later period, as in the caste system, the defects did not appear in the ashram institution. As long as the ethical rules of this ashram institution are properly followed in the society, the ashram institution seems to be useful for the progress of the individual and the society.
- Five negative concept
There were important changes in the social life of the post-Vedic period compared to the Rigvedic period. Due to the formation of the state system, urbanization increased, the comforts of the society increased, it seems that various traditions and institutions also gained importance in the social life. The ancient Indian thinkers believed that attaining salvation in social life was the ultimate goal of human beings, for which various ideal concepts were presented to the society, out of which, the concept of Pancha Nrama was considered important. Concept of Five Debts In ancient India, it was considered important for a householder to get rid of five debts in social life. Humans have five types of debts i.e. debts in their life. It was believed that a person cannot attain salvation without getting rid of these debts. The five debts of ancient India are as follows: 1. God Debt 2. Mother. Pitru Debt 3. Guru Debt 4. Social Debt 5. Animal Debt
Debt to God :- Every human being was considered to be indebted to God for giving birth to human beings among the living creatures and giving them the opportunity to attain salvation.
Matri Pitru Debt:- It was considered a debt to the parents that we were born, brought up by our parents. Humans were supposed to serve them and get rid of their debts.
Guru Debt:- After the informal education given by mother and father, Guru does the task of rebirthing us through informal formal education and providing opportunities for all-round development in life through knowledge, so it was considered debt of Guru.
Debt to Society:- It was considered a debt to the society that included us as a unit and created the environment necessary for our overall progress.
Animal and Bird Debts:- Pancha Debts had unique universal significance in the ancient Indian society as the animals and birds that directly or indirectly helped humans to survive were considered debts.
- The Four Purusharthas and Indian Society
While clarifying the goals and objectives of the society, the ancient Indians gave preference to the concept of masculinity. Although spirituality is the foundation of Indian culture, intellectuals also thought about the worldly life in a special way. In the post-Vedic period, the ultimate goal of human life was to achieve salvation. It seems that the Indian culture has given priority to follow the flesh and guidance of how a person should achieve success in his life and how to achieve moksha.
Masculine concept
In ancient India, the concept of masculinity was considered ideal for the individual and the society. A social organization or system of thought means Purushartha. What rules a person should follow in his life, what happiness he should enjoy and what duty he should perform is analyzed in Purushartha concept. Purusha means person and artha means the thing that is desired. Purushartha is the achievement of what one desires from this. Also the means by which that goal is achieved is called Purushartha. In the ancient Indian social life, special importance was given to the four Purusharthas namely Dharma, Artha, Kama and Moksha.
Dharma:- The concept of Dharma was given importance as the most important Purushartha in the concept of Purushartha. The principles of dharma are believed to include the other three Purusharthas. The concept of religion did not include any ritual or ritual. Only moral obligations were mentioned in it. The word dharma is derived from the Sanskrit root word dhru. Dhru was considered to be the code of conduct or moral obligations that regulated or controlled society. In Rigveda period it was given the term Rita. Rit means following moral rules. The deity Varuna was believed to punish anyone who violated this principle. Mahabharata also gave priority to rules about moral conduct while explaining the concept of dharma. The concept of religion includes thoughts and rules about the exaltation of the worldly life as well as the exaltation of the transcendental life. Apart from this, the Purushartha of Dharma is also analyzed in Smriti Granth and Arthashastra of Kautilya. Religion as a concept is therefore considered very important in Indian society.
Artha:- The special feature of ancient Indian society is that they placed the concept of Artha along with Dharma as Purushartha. Kautilya in his book Arthashastra has considered artha as more important in terms of individual and society. Means are the means of human livelihood and life; It is considered so. A person needs money to make his life happy. It was also considered necessary to create a means of livelihood. It was considered necessary for a person to be aware of the dharma bandhan while achieving this purushartha of Artha. Merely earning money, earning one’s livelihood by unfair and helpless means was not approved. Any person, if engaged in making money
It was considered that she could not progress towards the attainment of salvation.
Work:- In Indian culture, the masculine concept of work is given a place along with the concept of Dharma and Moksha. Without attaining this Purushartha, no person can progress towards Moksha. Kama means desire In the specific sense of desiring worldly pleasure, Kama was considered as Kama. The concept of work is explained in Kamasastra written by Vatsyayana. According to Indian thinkers, a person must follow moral rules and obligations while acquiring work for men. Because if a person is engaged in lust fulfilment, he cannot progress towards salvation.
Moksha:- After the post-Vedic period, attainment of Moksha was considered as the ultimate goal of man. Moksha is liberation from the cycle of birth and death. According to the karmic bond of the previous birth, one is forced to enjoy pleasures in this birth. However, it was believed that if a person strictly follows moral principles in this life and keeps pure ethical thoughts, no new karmic obligations arise. A soul freed from the karmic bonds of the previous life can attain the perfect state i.e. moksha as no new karmic bonds are created. Attainment of salvation was considered the ultimate goal of man. For that it was considered necessary to achieve the four Purusharthas.
Women and Masculine Concepts:- In ancient India it was considered essential for women to achieve Purusharthas. In particular, it was considered the duty of women to achieve the male goal. In the post-Vedic period, while donating a daughter in the marriage ceremony, the bride’s father used to ask his son-in-law not to neglect his daughter while attaining dharma, artha and work. From this it seems that women were also trying to attain salvation.
Importance of Purushartha concept
The concept of Purushartha had a special place in the social institutions of ancient India. Individual life as well as social life was considered in this. Attainment of purushartha was considered essential for attaining moksha, the ultimate goal of human life. Along with this birth of a human being, the state after death was also considered in this concept. The concept of masculinity has a significant contribution to the character of Indian culture. That is why Purushartha concept was given special importance in ancient Indian society in terms of individual and society.
Summary
In ancient India, the social institutions that aided the progress of individuals and society were formed. The ancient Indian thinkers considered the ultimate goal of human beings to achieve salvation in social life. Among the various ideal concepts that were presented to the society, the concept of five points was considered important. The ashram system was a major social institution among them. The ashram institution played an important role in the social life of ancient India with the aim of developing the society as well as the individual. While explaining the aims and goals of social life, the ancient Indians gave priority to the concept of masculinity, although spirituality is the foundation of Indian culture, intellectuals also thought about worldly life in a special way.
No comments:
Post a Comment