अजिंठा लेणी:चित्रकलेचा समृद्ध वारसा
अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे; असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगांचाही चित्रकलेमध्ये समावेश केला आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला. भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकलेकडे वळला असावा. मानवी जीवनात कलेचा अविष्कार चित्रकलेच्या स्वरूपात झाला असावा. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात अजिंठा येथे भेट देतात.शैल चित्रकलेची वैशिष्ट्ये,अजिंठा चित्रकलेचे तंत्र व पद्धत आणि वेगळेपण उल्लेखनीय आहेत.अजिंठा लेणी समूह औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
अजिंठा चित्रकलेचे वेगळेपण प्राचीन चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी ऋग्वेद, रामायण ,महाभारत तसेच कालिदास ,भास, बाणभट्ट इत्यादी कवी व लेखकांच्या साहित्यातून चित्रकलेचे उल्लेख आढळतात. बौद्ध व जैन ग्रंथांमध्येही चित्रकलेचे उल्लेख आले आहेत. भारतीय चित्रकला रूप, भेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य, वर्णिकाभंग इत्यादी सहा तत्त्वांवर आधारित आहे.अजिंठा यथील चित्रकाम इ.स.पूर्व २रे शतक ते इ.स.च ५वे शतक या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.अजिंठा येथील क्रमांक १०,९,६,१६,१७,१ व २ या लेण्यांमध्येच चित्रकाम शिल्लक आहे.येथील सर्व चित्रे लेण्यांच्या भिंतीवर व छतावर चितारलेली आहेत.
अजिंठा चित्रकलेचे तंत्र व पद्धत फ्रेस्को पद्धती प्राचीन चित्रकलेत प्रथम गुंफेच्या आतील दगडी भिंत तासून सपाट केली जाते.. त्यानंतर भिंतीवर चिकन माती, शेण, गवत आणि तांदळाचा कोंडा यांचे मिश्रण करून त्याचे लेपन केले जात असे. हा लेप ओलसर असताना त्यावर चुन्याचा हात देत असत. या पांढर्या शुभ्र पार्श्वभूमीवर चित्रे रेखाटलेली आहेत. येथील चित्रांची बाह्य रेषा ठळक व स्पष्ट दाखवण्याची पद्धत होती. अजिंठा येथील चित्रांमध्ये विविध वस्तू व व्यक्ती यांच्यातील फरक दाखविण्यासाठी स्पष्ट रेखा कृतींचा वापर केलेला आहे. अजिंठा येथील चित्रे जलरंगात रंगवली आहेत. हे रंग दीर्घकाळ टिकावेत यासाठी डिंकाचा वापर केलेला आहे. या पद्धतीला फ्रेस्को पद्धती ची चित्रकला म्हणतात. अचूक रेखाटन व जलद चित्रकाम ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत.१५०० वर्षांनंतरही यथील चित्रकाम अजूनही ताजेपणाने टिकून आहे.
अजिंठा चित्रकलेचे स्वरूप – अजिंठा https://goo.gl/maps/ajmBALwTcxv1Hssy8 येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते. या शिवाय समाज जीवनातील विविध प्रसंग उदाहरणार्थ युद्ध करीत असलेले सैनिक, मासे पकडणारे कोळी, शिकार करणारे शिकारी, ग्रामीण समाज जीवन इत्यादी अनेक प्रसंग चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रेम,हर्ष,लज्जा, हास्य, भय, क्रोध, विरक्ती आणि उत्साह इत्यादी मानवी भावभावना अतिशय प्रभावीपणे चित्रित केलेल्या आहेत. विषयाच्या अनुरोधाने अजिंठा चित्रकलेचे अलंकारिक, वर्णनात्मक व रूपकात्मक असे तीन भाग पडतात. चित्रातील मुख्य पात्राचे महत्व वाढवण्यासाठी यक्ष, गंधर्व ,अप्सरा ,किन्नर ,राक्षस ,गरुड व पशुपक्षी यांची चित्रे रेखाटलेली आहेत .अलंकारिक चित्राबरोबरच गुंफेच्या छतावर भौमितिक नक्षी कामांचा सहभाग मोठा आहे. दुसऱ्या विभागात प्रामुख्याने गौतम बुद्धाच्या जीवना संबंधीच्या वर्णनात्मक जातक कथांच्या आधारे चित्रे रेखाटलेली आहेत. यात सीबी जातक, शरभ जातक, ब्राम्हण जातक वगैरे अनेक जातक कथा दाखवले आहेत. तिसऱ्या विभागात गौतम बुद्ध, बोधिसत्व ,राजा राणी इत्यादी चित्रां शिवाय गौतम बुद्धाची अभय मुद्रा, धम्मचक्र मुद्रा ,भूमीस्पर्श मुद्रा, वरद मुद्रा इत्यादी अवस्थेतील चित्रे आहेत. ही सर्व चित्रे चित्रकलेच्या दृष्टीने असामान्य ,अप्रतिम आणि अद्वितीय आहेत.
अजिंठा येथील काही उल्लेखनीय चित्रकला -गुंफा क्रमांक -1 पद्मपाणी बोधिसत्व व्यक्तीचित्र – अजिंठा येथील पहिल्या क्रमांकाच्या लेणी मधील पदमपाणी बोधिसत्वाची कलाकृती अजोड आहे. त्याची शरीरयष्टी एखाद्या शिल्पा प्रमाणे आहे. रुंद व भरदार खांदे व खाली निमुळते होत जाणारे शरीर तसेच त्याचा उभ्या राहण्यातला डौल चित्रकाराने मोठ्या कौशल्याने रंगवला आहे. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे. अंगावर मोजकेच अलंकार आहेत. चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव आहेत. त्यामुळे अजिंठा येथील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून हे चित्र ओळखले जाते.
नागदंपत्ती,महाजन जातक व शीबी जातक चित्रे-अजिंठा लेणी येथील गुंफेमध्ये नागदंपत्तीचे एक सुंदर चित्र आहे. राजवाड्यातील अंत:पुरातील एक सजवलेल्या आसनावर राजपुरुष बसला आहे .त्याच्या शेजारी त्याची राणी बसली आहे. राजाच्या डोक्यावर सात फण्यांचा नाग व राणीच्या डोक्यावर एक नागमणी आहे. याच गुंफेमध्ये राजवाड्यातील इतरही राजपुरुष व स्त्रियांची चित्रे रेखाटलेली आहेत. याशिवाय महाजन जातक व शीबी जातक ही चित्रे अतिशय सुंदर आहेत.
गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगचित्रे– अजिंठा लेणी क्रमांक 16 या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत. त्यामध्ये गौतम बुद्धाची आई मायादेवी. हिला पडलेले स्वप्न ,सिद्धार्थचा जन्म ,भविष्यकथन ,बाल गौतमाचे शिक्षण ,गौतमाने पाहिलेली चार दृश्य, गौतमाचा राज्यत्याग, सारनाथ येथील प्रवचन तसेच गौतमाच्या दर्शनास आलेल्या राजांचे चित्र इत्यादी कथा अत्यंत सुंदर रित्या चित्रित केलेल्या आहेत.
राजवाड्यातील जीवनातील चित्रे – अजिंठा लेणी क्रमांक 17 गुंफा म्हणजे एक विहार आहे. डावीकडील भिंतीवर एक भव्य चक्र चितारलेले आहे. त्या चक्रामध्ये ग्रामीण ,शहरी तसेच राजवाड्यातील जीवनातील चित्रे दाखवलेली आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची घरे, त्यांचे साधे जीवन, शहरी जीवनातील रंगढंग, राजप्रासाद,आतील विविध प्रसंग यांचे चित्रण केलेले आहे. याशिवाय दूर वनामध्ये शांत ठिकाणी आत्मचिंतन करणारे भिक्खू दाखवले आहेत. या गुंफेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रे अंतराळात रेखाटलेली आहेत.
त्यामध्ये गौतम बुद्ध त्यांचा पुत्र राहुल यांच्या भेटीचे चित्र दाखवले आहे. त्यामध्ये भिक्षा मागण्यासाठी हातात भिक्षापात्र घेऊन गौतम बुद्ध घरा बाहेर उभा आहे आणि त्याची पत्नी यशोधरा लहान राहुलला घेऊन त्याठिकाणी येते .त्यावेळी राहुल आपल्या पित्याची याचना करीत आहे. या चित्रामध्ये तिघांच्या चेहऱ्यावरील भावदर्शन अवर्णनीय आहे. याशिवाय या गुंफेतील गौतमाला वंदन करीत असलेले गंधर्व व अप्सरा यांचे चित्रही अतिशय सुंदर आहे .याच गुंफेतील स्वर्गामधून गौतम बुद्धाला भेटण्यासाठी इंद्र देवता आपल्या अनुयायांसह निघाला आहे असे चित्र आहे .या सर्व चित्रांमधील सौंदर्य रेखाटन व लालित्य अवर्णनीय आहे. याच गुहेमध्ये विश्वांतर जातक कथा रेखाटलेली आहे .यामध्ये एक राजपुत्र आपल्या पत्नीला राज्यातून हद्दपार करतो ही बातमी तिला समजल्यानंतर ती बातमी ऐकून बेशुद्ध पडते .त्यावेळी राजकुमार तिला मद्याचा प्याला देतो .तिच्या पाठीमागे एक दासी हा प्रसंग पाहून चिंतातूर झाली आहे. या संपूर्ण चित्रातील भावदर्शन आणि त्या चित्रातील सर्व व्यक्तींचा एकत्रित परिणाम अप्रतिम आहे.
अजिंठा चित्रकलेची वैशिष्ट्ये: विविध सौंदर्य कृतींचे चित्रण हे अजिंठा चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे .अजिंठा येथील चित्रे सफाईदार रेषा आणि डौलदार आकृती तसेच लालित्य दाखविण्याचा अतिरेक यामुळे काही चित्रे निर्जीव असल्यासारखे दिसतात. अजिंठा चित्रामध्ये फारसे निसर्ग चित्र आढळत नाही. राजवाड्यातील विलासी जीवन मोठ्या प्रमाणात दाखवलेले आहे. याला गुंफा क्रमांक सात 17 मधील काही जातक कथा अपवाद आहेत. अजिंठा येथील चित्रकला विशिष्ट संकेतांनी बद्ध आहे. येथील चित्रकारांनी चित्रकलेचे काही आराखडे निश्चित केले होते. त्याला अनुसरून त्यांनी चित्रे काढलेली आहेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे मोठेपण दाखविण्यासाठी त्याच्या भोवतीच्या आकृती लहान आकारांच्या दाखवले आहेत. अजिंठा येथील चित्रकलेत अनेक कथांची मालिका दाखवलेली आहे. यातील प्रसंग सादर करताना त्यामध्ये कोणताच क्रम बद्धता नाही.त्यामुळे ही चित्रे एकमेकांमध्ये मिसळल्या सारखी दिसतात .अजिंठा येथील चित्रकला प्राचीन भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली म्हणून ओळखली जाते. येथील चित्रांमध्ये विविध कथा प्रसंग, चित्रातील सौंदर्य, लालित्य, रंग संगती यामुळे या चित्रांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली आहे.
Ajanta Caves: A Rich Heritage of Painting
Ajantha Caves Group is located in Aurangabad district. These caves are mainly famous for rock paintings. The painting here is influenced by Buddhism; However, artists have included other parts of human life in painting. Especially Gautama Buddha in various forms can be seen in these caves. Painting was used by the artists of ancient India as a means of expressing human emotions. Before the development of language, humans may have first turned to painting. Art may have been invented in human life in the form of painting.
Ancient Ajanta Painting To study ancient painting, mentions of painting are found in Rigveda, Ramayana, Mahabharata as well as literature of poets and writers like Kalidasa, Bhasa, Banabhatt etc. Painting is also mentioned in Buddhist and Jain texts. Indian painting is based on the six principles of form, contrast, proportion, emotion, contrast, analogy, color break etc. The painting at Ajanta has been done in the period from 2nd century BC to 5th century AD. No. 10 at Ajanta, Paintings are left only in caves 9, 6, 16, 17, 1 and 2. All the paintings here are painted on the walls and ceilings of the caves.
Techniques and methods of Ajanta painting Fresco method In ancient rock painting, the stone wall inside the cave was first flattened by sand.. Then the wall was coated with a mixture of chicken soil, dung, grass and rice bran. When this coating was moist, a hand of lime was applied over it. The pictures are drawn on this white background. The way to show the outline of the pictures here was bold and clear. The paintings at Ajanta use clear line work to show the difference between various objects and persons. The paintings at Ajanta are painted in water colors. Gum is used to make these colors last longer. This method is called fresco method of painting. Accurate sketching and rapid painting are the hallmarks of this style. Even after 1500 years, the painting still retains its freshness.
The Ajanta painting form is located in the Ajanta cave group in Aurangabad district. These caves are mainly famous for paintings. The painting here is influenced by Buddhism; However, artists have included other parts of human life in painting. In particular, various depictions of Gautama Buddha can be seen in these caves. Apart from this, the artists have tried to show various events in the social life, for example, soldiers fighting, spiders catching fish, hunters hunting, rural social life etc. The paintings at Ajanta depict human emotions like love, joy, shame, laughter, fear, anger, disgust and enthusiasm very effectively. According to the request of the subject, Ajanta painting falls into three parts namely figurative, descriptive and allegorical. To increase the importance of the main character in the picture, pictures of Yaksha, Gandharva, Apsara, Kinnar, Rakshasa, Eagle and Pashupakshi are drawn. Along with the figurative picture, there is a large participation of geometric carvings on the ceiling of the cave. In the second section, illustrations are drawn mainly based on descriptive Jataka stories related to the life of Gautama Buddha. It shows many Jataka stories like CB Jataka, Sharabh Jataka, Brahmin Jataka etc. In the third section, apart from the pictures of Gautama Buddha, Bodhisattva, King Queen etc., there are pictures of Gautama Buddha in Abhay mudra, Dhammachakra mudra, Bhumisparsha mudra, Varada mudra etc. All these pictures are unusual, wonderful and unique in terms of painting.
Padmapani Bodhisattva Figure – The sculpture of Padmapani Bodhisattva from Cave No. 1 at Ajanta is unparalleled. His body is like a sculpture. The painter has painted with great skill the broad and broad shoulders and the body tapering down, as well as his standing posture. He has a crown on his head. There are few ornaments on the body. There is a very happy expression on the face. Therefore, this painting is known as one of the best works of art at Ajanta.
Nagdampatti, Mahajan Jataka and Shibi Jataka Pictures – Ajanta has a beautiful picture of Nagadampatti in this cave. The king is seated on a decorated seat in Antpura in the palace. His queen is seated next to him. On the king’s head there is a seven-bladed serpent and on the head of the queen is a serpent. In this cave, the portraits of other royal men and women of the palace are also drawn. Apart from this, the pictures of Mahajan Jatak and Shibi Jatak are very beautiful.
Scenes from the Life of Gautama Buddha Ajanta No. 16 These caves depict scenes from the life of Gautama Buddha. Gautama Buddha’s mother Mayadevi in it. Her dream, Siddhartha’s birth, fortune-telling, child Gautama’s education, Gautama’s four visions, Gautama’s abdication, discourse at Sarnath and the portraits of the kings who visited Gautama are beautifully depicted.
Pictures from Palace Life Ajanta No. 17 This cave at Ajanta is a vihara. A magnificent chakra is painted on the left wall. In that cycle, pictures of rural, urban and palace life are shown. It depicts the houses of farmers, their simple life, the scenes of urban life, various events inside Raj Prasad. In addition, monks are shown introspective in a quiet place in a distant forest. The characteristic paintings in these caves are drawn in space.
It shows a picture of Gautama Buddha meeting his son Rahul. In it, Gautama Buddha is standing outside the house with an alms bowl in his hand to beg for alms and his wife Yashodhara comes there with little Rahul. At that time Rahul is pleading with his father. The expression on the faces of the three in this picture is indescribable. Apart from this, the picture of Gandharva and Apsara paying homage to Gautama in this cave is also very beautiful. In this cave there is a picture of Lord Indra leaving with his followers to meet Gautama Buddha. The beauty and elegance of all these pictures is indescribable. It is in this cave that the Viswantar Jataka story is drawn. In it, a prince banishes his wife from the kingdom and she faints after hearing the news. At that time, the prince gives her a cup of wine. Behind her, a maidservant is worried about this incident. The emotion throughout this picture and the combined effect of all the characters in it is amazing.
No comments:
Post a Comment