Wednesday, August 9, 2023

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपासूनच गडकोटांना अनन्य साधारण महत्व दिले. महाराजांनी प्रामुख्याने डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग बांधले. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले; काही किल्ले जिंकून घेतले आणि काही किल्ल्यांची दुरुस्ती करून स्वराज्यासाठी उपयोगात आणले. या लेखामध्ये राजगड आणि रायगड या दोन महत्त्वाच्या किल्ल्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. स्वराज्यातील सर्व गडकोट सामर्थ्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक होते.राजगड आणि रायगड हे दोन्ही किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. धाडसी पर्यटनासाठी राजगड एक आदर्श ठिकाण आहे.रायगड किल्ला ऐतिहासिक पर्यटन आणि धाडसी पर्यटन या दोन्हीसाठी आकर्षण केंद्र आहे.

Rajgad Live Location-  https://goo.gl/maps/RumdDA86zp7sxJWA9

राजगडाची वैशिष्ट्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला– सन 1662 मध्ये राजगडाचे  बांधकाम पूर्ण झाले. राजगडाला भक्कम दुहेरी तटबंदी असून तीन माच्या (संजीवनी माची, सुवेळा माची व पद्मावती माची) आणि तीन बालेकिल्ले आहेत. राजगडामध्ये प्रवेश करण्यासाठी पाच दरवाजे आहेत. त्यापैकी एक गुप्त दरवाजा आहे. गडावर सदर,अंबरखाना,दारूकोठार, राजवाडा आणि इतर प्रमुख इमारती तसेच देव देवतांची मंदिरे आहेत. महाराणी सईबाई यांची  समाधी राजगडावर आहे.काळाच्या ओघात गडावरील अनेक वास्तु नामशेष झाल्या असून काही वास्तूंचे भग्न अवशेष शिल्लक आहेत. किल्ले राजगड ते रायगड स्वराज्याची वाटचाल पुढे चालू झाली. धाडसी पर्यटक राजगडाला आवर्जून भेटून देतात.

Rajgad Fort,Pune
Rajgad Fort,Pune

राजगड किल्ल्याचे महत्त्व काय? – राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य 25 वर्षे होते. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घटनांचा राजगड साक्षीदार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर त्याचे शीर राजमाता जिजाऊ यांना दाखविण्यासाठी राजगडावर पाठवण्यात आले होते. महाराणी सईबाई यांचे निधन, पन्हाळगडावरील सिद्धी जोहर याच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून शिवाजी महाराज 1660 मध्ये राजगडावर परतले. 1661 मध्ये प्रतापगडावर सध्या असलेल्या भवानी मातेच्या मंदिरातील मूर्ती सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना दाखविण्यासाठी राजगडावर आणण्यात आली होती. 1664 मध्ये सुरत येथील ब्रिटिश वखारीतील मौल्यवान वस्तू व खजिना राजगडावर आणण्यात आला होता. 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहात राजगड मुघलांना द्यावा लागला. पर्यटनाच्या दृष्टीनेही राजगड किल्ल्याचे महत्व आहे.

Rajgad Fort
Rajgad Fort,Pune

Advertisements
REPORT THIS AD

1670 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला.1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजगड पुन्हा मुघलांकडे गेला. 1697 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी राजगडाला राजधानीचा दर्जा देऊन राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. 1704 मध्ये  झालेल्या तहात राजगड मुघलांना द्यावा लागला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी राजगडाची दुरुस्ती केली. 1818 पर्यंत राजगड स्वराज्यामध्येच होता.

Shivrajyabhishek
Shivrajyabhishek Painting

Raigad Fort Live Location – https://goo.gl/maps/UQZzWNZmhX4u34VL8

स्वराज्याचा मानबिंदू रायगड किल्ला –कोकणातील पर्यटन स्थळ – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली. रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. 1671 मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे बांधकाम पूर्ण केले. 6 जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्नपूर्ती झाली. शिवराज्याभिषेकामुळे भारताच्या इतिहासात एका नव्या युगास सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांचे वास्तव्य रायगडावरच होते.पर्यटनाच्या दृष्टीने रायगड किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 6 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त रायगडावर मोठा उत्सव साजरा करण्यात आला.

रायगडावरील वास्तु रायगड किल्ला समुद्र सपाटीपासून 870 मीटर उंचीवर आहे. रायगडावर 350 इमारती,84 टाक्या आणि अकरा तलाव होते. गडावर नगारखाना,  सदर,बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, शिरकाई देवीचे मंदिर, जगदीश्वर मंदिर, धान्य कोठार, शस्त्रास्त्र व दारुगोळा ठेवण्यासाठी दारूकोठार, राजवाडा, राणीवसा, सचिवालय, अष्टप्रधान यांचे वाडे, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, रत्नशाळा इत्यादी वास्तू बांधलेल्या होत्या. त्यापैकी काही वास्तु आजही चांगल्या स्थितीत आहेत.

Raigad Fort
Raigad Fort

रायगडावर जाण्यासाठी प्रवेशद्वार रायगडावर जाण्यासाठी महादरवाजा, नाणे दरवाजा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा मधून प्रवेश करता येतो. संकट समयी बाहेर पडण्यासाठी गुप्त दरवाजा केलेला होता. महादरवाज्याला दोन मोठे बुरुज आहेत. या बुरुजावर शत्रूवर मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. दरवाजाची रचना गोमुखा सारखी असल्यामुळे महादरवाजा डोंगराच्या पायथ्यापासून दिसत नाही. या दरवाज्यातूनच जाणारा रस्ता किल्ल्याचा मुख्य रस्ता आहे. महा दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम तटबंदी बांधलेली आहे. किल्ला अभेद्य राहण्यासाठी ठीक ठिकाणी बुरुज बांधलेले आहेत.

Maharadarawaja,Raigad
Mahadarwaja,Raigad Fort

रायगडावरील वैशिष्ट्यपूर्ण वास्तु – राजवाडा -बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर एक उंच चौथरा लागतो हा चौथरा म्हणजेच राजवाड्याची इमारत असावी. याच्या एका बाजूस पाण्याचे दोन हौद आहेत. राजवाड्याच्या पूर्वेस रत्नशाळा किंवा खलबतखाना ही वास्तू लागते. ही वास्तू तळघरात बांधलेली आहे. रत्न शाळेच्या पूर्वेस एक प्रशस्त चौथरा असून त्यावर अनेक खांबाच्या खुणा आहेत. हा चौथरा म्हणजे सदर असावी .

सदर पासून पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्यापासून बनविलेले सिंहासन होते; तो चौथरा आहे. ही संपूर्ण वास्तू बालेकिल्ल्याच्या मध्यभागी बांधलेली आहे. या इमारतीच्या समोरील बाजूस आल्यावर नगारखाना दिसतो. नगारखाना सिंहासनाच्या पूर्वेस असून सिंहासनाजवळ  बोललेले  नगारखान्यात स्पष्ट ऐकू येते. नगारखाना 52 फूट उंच असून त्याच्यावर सनई चौघडे आणि नगारे वाजवण्याची व्यवस्था केलेली होती.

Nagarkhana,Raigad
Nagarkhana,Raigad Fort

बाजारपेठ रायगडावरील ही एक प्रेक्षणीय वास्तू आहे. बाजारपेठेमध्ये दोन्ही बाजूस प्रत्येकी 22 दुकाने आहेत. यांची उंची  घोड्यावर बसून वस्तू खरेदी करता येईलअशा पद्धतीने ठेवलेली आहे. शिरकाई मंदिर रायगडावरील ही मुख्य देवता आहे. या मंदिरात शिवकालीन महिषासुर मर्दिनीची अष्टभुजा मूर्ती आहे. नवरात्रात या देवीचा उत्सव होत असे. जगदीश्वर मंदिर या मंदिराची रचना गर्भगृह आणि सभा मंडप या पद्धतीची आहे. गर्भगृहात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. मंदिराभोवती प्रशस्त लांबी रुंदीचा तट आहे. तटाच्या पूर्वेस व पश्चिमेस मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत.

Jagadishwar Temple,Raigad
Jagadishwar Temple,Raigad

रायगडा वरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी– जगदीश्वर मंदिरासमोर काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. अष्टकोनी चिरेबंदी चौथर्‍यावर ही समाधी बांधलेली आहे. 1926 मध्ये सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार करण्यात आला होता. सध्या रायगड किल्ला महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडे असून रायगडाचे जतन व संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे.

Shivaji Maharaj Samadhi ,Raigad
छत्रपती शिवाजी महाराज समाधी,रायगड

सारांश राजगड आणि रायगड हे दोन्ही किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत धाडसी पर्यटनासाठी राजगड एक आदर्श ठिकाण आहे राजगडावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे चालत जावे लागते त्यामुळेच गिर्यारोहणासाठी गिर्यारोहकांचे सर्वात पसंतीचे ठिकाण म्हणजे राजगड ते तोरणा असा प्रवास करणे आहे. रायगड किल्ला ऐतिहासिक पर्यटन आणि धाडसी पर्यटन या दोन्हीसाठी आकर्षण केंद्र आहे. रायगडावर जाण्यासाठी जवळपास पंधराशे पायऱ्या चढून जाता येते त्याशिवाय वरती जाण्यासाठी रोप-वेचीही व्यवस्था केलेली आहे. ऐतिहासिक वास्तूंना भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी रायगड किल्ल्याला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

Forts of Chhatrapati Shivaji Maharaj: Rajgad and Raigad Tourism

Chhatrapati Shivaji Maharaj gave special importance to Gadkot right from the establishment of Swaraj. Maharajas mainly built hill forts and forts. Shivaji Maharaj built many forts; Some forts were conquered and some forts were repaired and used for Swarajya. This article gives detailed information about two important forts namely Rajgad and Raigad. All gadkots in Swarajya were symbols of power and protection.

Progress of Rajgad Fort to Raigad Fort for Swarajya

Rajgad, the first capital of Swarajya

Rajgad means king of forts. Rajgad is located in Pune district and is 35 km away from Pune. Rajgad has been a silent witness to many important events. In the year 1642, Shahaji Raja got the Rajgad fort in Jahagiri. From 1646 Shivaji Maharaj lived in Rajgad. In 1649, Shivaji Maharaj repaired this fort and renamed it as Rajgad.

Form of Rajgad

The construction of Rajgad was completed in the year 1662. The Rajgad has a strong double fortification with three machis (Sanjivani machi, Suvela machi and Padmavati machi) and three forts. There are five gates to enter the Rajgad. One of them is a secret door. The fort has Sadar, Ambarkhana, Darukothar, Rajwada and other important buildings as well as temples of gods and goddesses. The mausoleum of Maharani Saibai is at the Rajgad. In the course of time, many structures on the fort have become extinct and some of the structures remain in ruins.

Some major events at Rajgad

Chhatrapati Shivaji Maharaj lived at Rajgad for 25 years. So Rajgad has witnessed many important events. After Chhatrapati Shivaji Maharaj killed Afzal Khan at the base of Pratapgad, his head was sent to the Rajgad to be shown to Rajmata Jijau. Maharani Saibai passed away, Shivaji Maharaj returned to Rajgad in 1660, freeing himself from the siege of Siddhi Johar at Panhalgad. In 1661, the idol of Bhavani Mata Temple, which is present at Pratapgad, was first brought to Rajmata to show it to Rajmata Jijau. In 1664, valuables and treasures from the British Vakhari at Surat were brought to the Rajgad. Rajgad had to be given to the Mughals in 1665 in a treaty with Mirzaraj Jaisingh.

Chhatrapati Rajaram Maharaj was born in Rajgad in 1670. After the death of Chhatrapati Sambhaji Maharaj in 1689, Rajgad again went to the Mughals. In 1697, Chhatrapati Rajaram Maharaj started ruling Rajgad with the status of capital. Rajgad had to be given to the Mughals in a treaty signed in 1704. After the death of Aurangzeb, Chhatrapati Shahu Maharaj repaired the Rajgad. Until 1818, Rajgad was in Swarajya.

Raigad, the focal point of Swarajya

Chhatrapati Shivaji Maharaj chose Raigad as the capital of Swarajya. Raigad Fort is located in the Sahyadri mountain range in Mahad taluka of Raigad district. In 1671, Heroji Indulkar completed the construction of Raigad. On June 6, 1674, Shivaji Maharaj crowned himself. On this occasion the dream of Chhatrapati Shivaji Maharaj was fulfilled. Shiva’s coronation marked the beginning of a new era in the history of India. Later Shivaji Maharaj lived at Raigad. On June 6, 2023, three and a half hundred years have passed since the coronation of Shiva. On that occasion, a big festival was celebrated at Raigad.

Vaastu at Raigad

Raigad fort is at a height of 870 meters above sea level. Raigad had 350 buildings, 84 tanks and eleven lakes. On the fort there are Nagarkhana, Sadar, Bazarpeth, Chhatrapati Shivaji Maharaj’s Mausoleum, Shirkai Devi Temple, Jagdishwar Temple, Granary, Arms and Ammunition Storehouse, Palace, Ranivasa, Secretariat, Ashtapradhan’s Palace, Gangasagar Lake, Hatti Lake, Kushavarta Lake, Ratnashala etc. were built. Some of them are still in good condition.

Entrance to Raigad

Raigad can be accessed through Maha Darwaza, Nane Darwaza, Palkhi Darwaza, Mena Darwaza. A secret door was made to escape in times of crisis. The Mahadarvaja has two big bastions. Arrows are placed on this tower to hit the enemy. Mahadarwaja is not visible from the base of the hill as the structure of the door is like a gomukha. The road leading through this gate is the main road of the fort. A strong fortification is built on both sides of the Maha Darwaza. To make the fort impregnable, bastions are built at the right places.

Typical architecture of Raigad

Rajwada – After entering the fort, there is a tall square. This square should be the building of the palace. There are two water tanks on one side of it. To the east of the palace is the Ratnashala or Khalbatkhana building. This structure is built in the basement. To the east of the Ratna School is a spacious quadrangle with many pillar marks on it. This should be Sadar.

After proceeding from Sadar, there was a throne of Chhatrapati Shivaji Maharaj made of 32 manas of gold; He is the fourth. This entire structure is built in the center of the fort. When you come to the front side of this building, you can see the Nagarkhana. The nagarkhana is to the east of the throne and the speech near the throne can be clearly heard in the nagarkhana. The nagarkhana is 52 feet high and was equipped with clarinet choghde and nagaras.It is a spectacular structure on Market Raigad. The market has 22 shops on each side. Its height is placed in such a way that one can buy goods while sitting on a horse. Shirkai Mandir Rai

This is the main deity on the fort. In this temple there is an octagonal idol of Mahishasura Mardini of Shiva period. This goddess used to be celebrated during Navratri. Jagdishwar Mandir The structure of the temple consists of sanctum sanctorum and assembly mandap. The sanctum sanctorum has a Shivling established by Chhatrapati Shivaji Maharaj. There is a wide embankment around the temple. There are two gates to enter the temple on the east and west side of the bank.

Tomb of Chhatrapati Shivaji Maharaj

At some distance in front of the Jagdishwar temple is the tomb of Chhatrapati Shivaji Maharaj. This mausoleum is built on an octagonal incision. The tomb of Shivaji Maharaj was first restored in 1926. At present, Raigad Fort is under the possession of Maharashtra Archeology Department and the preservation and conservation work of Raigad is going on in a big way.

Summary

Both Rajgad and Raigad forts are very important in terms of tourism.Rajgad is an ideal place for adventure travel.Rajgad is an ideal place to reach Rajgad due to lack of transport system. Raigad Fort is a center of attraction for both historical tourism and adventure tourism.To reach Raigad, there are about 1500 steps to climb. Rajmata Jijau’s mausoleum is at Pachad at the foothills of Raigad.

No comments:

Post a Comment