Thursday, August 31, 2023

 

                  इतिहासाचे महत्त्व





इतिहास न केवळ आपल्या वर्तमानासाठी तर आपल्या भविष्यासाठी देखील फार महत्त्वाचा असतो. इतिहासामुळे आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, संस्कृतीचे वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेण्यास फार मदत मिळते.

आजचा एकविसाव्या शतकातील समाज आणि समाजातील जवळ-जवळ सर्व लोक जितके विकासाच्या मार्गाने पुढे जात आहेत, तितकेच ते आपल्या इतिहासा पासून दूर होताना दिसत आहेत. एक प्रकारे लोकांनी त्यांच्या इतिहासापासून पाठ फिरवली आहे, असे आपण म्हणू शकतो.

आपण आपल्या पूर्वजांना विसरत आहोत, त्यांना परिभाषेत करण्याऐवजी आपण स्वतःला परिभाषेत करत आहोत, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचे महत्त्व आपल्या जीवनात कालांतराने कमी होताना दिसत आहे.

इतिहासातील कोणतीही गोष्ट आता आपल्या काही कामाची नाही, अशी विचारधारा आजच्या माणसाची होत आहे, ज्यामुळे मौल्यवान असतानाही ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांचे महत्त्व कमी होत आहे.

आपण आपल्या इतिहासापासून कितीही दूर गेलो, तरी त्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती आपल्या इतिहासा सोबत जोडला गेलेला असतो, त्याचा त्याच्या वर्तमान काळाकडे पाहण्याचा एक प्रभावी दृष्टिकोन असतो, तसेच जो इतिहास जाणतो तो व्यक्ती त्याचे भविष्य रचू शकतो.

जसे की आपण जाणतोच, सनातन धर्म ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखत आहोत, हा पृथ्वीवरील सर्वात जुना आणि पहिला धर्म आहे. हिंदू धर्माची संस्कृती आणि इतिहास नक्कीच इतर धर्मांच्या तुलनेत प्रभावी आहे.

हिंदू धर्माचा प्रभाव कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले, ज्याची सुरुवात आजपासून जवळ जवळ १००० ते १५०० वर्षांपूर्वी झाली. भारतावर विविध प्रशासकांनी हल्ले केले आणि भारतातील ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यांमध्ये एलेग्जेंडर, बाबर, मोहम्मद घोरी यांचा समावेश होता. कालांतराने या शासकांना हिंदूधर्मातील नेतृत्वाद्वारे विरोध करण्यात आला आणि हिंदू धर्माचे पुनर्वसन करण्यात आले, याचा उल्लेख आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये आढळून येतो.

जर वर्तमान शिस्तबद्ध आणि प्रभावी बनवायचा असेल तर इतिहासासोबत एकरूप राहणे, फार महत्त्वाचे आहे.


No comments:

Post a Comment