विद्यापीठ शिक्षण पद्धती
प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील हा महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे काम चालत असे. त्यांना घटिका विद्यालय म्हणत असत. या विद्यालयांची कार्यपद्धती व अभ्यासक्रम यांची माहिती साहित्यातून मिळते.
विद्यापीठांचा प्रारंभ-प्राचीन काळातील प्रसिद्ध विद्यापीठे प्रामुख्याने बौद्ध विहारातून उत्क्रांत झालेली दिसतात. गौतम बुद्धांनी धर्मप्रसारासाठी धर्म संघाची निर्मिती केली होती. सार्वजनिक जीवनातून सर्वसंग परित्याग केलेल्यांना धर्म संघामध्ये प्रवेश दिला जात असे. धर्म संघात प्रत्येक सदस्याला नियमाचे अतिशय काटेकोरपणे पालन करावे लागे. धर्मसंघामध्ये भिक्षू व भिक्षुणी वर्षातील आठ महिने धर्मप्रसाराचे काम करीत असत आणि पावसाळ्याचे चार महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करीत ; अशा ठिकाणाला विहार म्हणतात. या विहारांमध्ये तत्वज्ञानातील विविध घटकांवर चर्चा होत असे. काही काळानंतर अशा विहारांमध्ये वर्षभर शिक्षण देण्याची सोय करण्यात आली. धर्म संघात झालेल्या चर्चेतून अनेक ग्रंथांची निर्मिती होऊ लागली. अशा विहारांचे प्रगत स्वरूप म्हणजेच प्राचीन भारतातील विद्यापीठे होत. या विद्यापीठांमध्ये भारताबरोबरच भारताबाहेरील देशांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.
विद्यापीठातील प्रवेश पद्धती – प्राचीन काळात सामान्यतः वयाच्या बारा ते पंधरा वर्षानंतर विद्यापीठात प्रवेश मिळत असे. या विद्यापीठातून कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात असे. पण प्रवेशापूर्वी त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळवण्याची किती जिज्ञासा आहे याची परीक्षा घेतली जात असे. चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून अशा प्रकारची द्वार परीक्षा अतिशय कठीण असे; यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात असे.
विद्यापीठातील अभ्यासक्रम – भारतातील प्रसिद्ध नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला,आणि वल्लभी या विद्यापीठातून प्रामुख्याने बौद्ध धर्माचे तत्वज्ञान व इतर धर्मांचे तत्वज्ञान सुद्धा शिकवले जात असे. तर काशी विद्यापीठात प्रामुख्याने हिंदू धर्म तत्वज्ञान व आचार यांचा अभ्यास होत असे. या विद्यापीठात विविध विषयांच्या अध्यापनाचे वर्ग विविध इमारतींमध्ये चालत होते. याशिवाय व्यवसायिक कौशल्यासाठी आवश्यक असलेले विषयही येथे शिकवले जात होते. विशिष्ट काळानंतर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली जात असे. या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पदव्या दिल्या जात होत्या. विद्यापीठातील अभ्यासक्रमात आवश्यकतेनुसार काही काळानंतर योग्य ते बदल केले जात होते. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला विविध विषयांचे परिपूर्ण ज्ञान व्हावे अशाप्रकारे अभ्यासक्रमाची आखणी केली जात होती.
प्राचीन विद्यापीठांचे प्रशासन – प्राचीन भारतातील या विद्यापीठांतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. नालंदा विद्यापीठात चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती चिनी प्रवाशांनी दिलेली आहे .या विद्यापीठांचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारलेली होती. विविध राजांकडून तसेच श्रीमंत व दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या आर्थिक सहकार्यावर विद्यापीठांचा कारभार चालत असे. विद्यापीठाचे प्रशासन चालवण्यासाठी कुलगुरूंच्या मदतीला विद्वत सभा व व्यवस्थापन समिती अशी दोन मंडळे होती. अभ्यासक्रमांची रचना करणे, विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, त्यांची परीक्षा घेणे, अध्यापन वर्गावर नियंत्रण ठेवणे हे काम विद्वत सभा करीत असे. विद्यापीठाच्या परिसराचे योग्य रक्षण करणे, नवीन इमारती बांधणे, दुरुस्त करणे, वसतिगृह बांधणे, शिक्षकांसाठी निवासाची सोय करणे ही सर्व कामे व्यवस्थापन समितीकडे होती. या दोन्ही मंडळांनी घेतलेल्या विशेष दक्षतेमुळे प्राचीन भारतातील या विद्यापीठांना केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
प्राचीन भारतातील काही प्रसिद्ध – विद्यापीठे तक्षशिला विद्यापीठ प्राचीन भारतात वायव्य दिशेला गांधार प्रदेशात तक्षशिला विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. आर्य चाणक्य. वैद्य जीवक व्याकरण कर्ता पाणीनी यासारख्या विद्यार्थ्यांनी तक्षशिला विद्यापीठात अध्ययन केले होते. बौद्ध साहित्यात या विद्यापीठाची माहिती मिळते. इसवी सन पूर्व 800 ते इसवी सन पूर्व 400 या काळात हे विद्यापीठ लोकप्रिय होते. येथे शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशातून विद्यार्थी येत होते. साहित्य, कला , राजनीति, युद्धतंत्र, स्थापत्य,गणित, आयुर्वेद इत्यादी विषय या विद्यापीठात शिकविले जात होते. पर्शियन, ग्रीक, शक, हूण, कुषाण काळामध्ये झालेल्या आक्रमणात हे विद्यापीठ उध्वस्त झाले.
नालंदा विद्यापीठ– हे विद्यापीठ प्राचीन भारतातील सर्वात लोकप्रिय विद्यापीठ होते. गुप्त काळात चिनी प्रवासी फाहीयान याने या विद्यापीठाला भेट दिली होती. गुप्त सम्राट कुमार गुप्त यांनी या विद्यापीठाला राजाश्रय दिला होता. इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग याने नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती. त्याने लिहिलेल्या ग्रंथामध्ये या विद्यापीठाचे वर्णन मिळते. या विद्यापीठात दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा उल्लेख त्याने केला आहे.
Ancient ruins of Nalanda Location – https://goo.gl/maps/fJ5VVzGjBiYrw1QV8
नालंदा विद्यापीठात धर्मपाल, चंद्रपाल, गुणमती,शीलभद्र यासारखे प्रसिद्ध विद्वान आचार्य कुलपती होऊन गेले. या विद्यापीठात बौद्ध, जैन आणि हिंदू या धर्मांचे तत्त्वज्ञान तसेच इतरही अनेक विषयांचे अध्ययन अध्यापन केले जात होते. नालंदा विद्यापीठातील धर्मगंज नावाचे ग्रंथालय विशेष उल्लेखनीय होते. यामध्ये विविध विषयांचे लाखो ग्रंथ ठेवण्यात आले होते. देश विदेशातून हजारो विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत होते. तेराव्या शतकात आक्रमकानी नालंदा विद्यापीठ उध्वस्त केले.
विक्रमशीला विद्यापीठ:- पाल घराण्यातील राजा धर्मपाल यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठात 3000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा उल्लेख साहित्यातून मिळतो. त्या काळातील अनेक प्रसिद्ध विद्वान आचार्य या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करीत होते. देश विदेशातून असंख्य विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत होते.
भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे काम चालत असे. त्यांना घटिका विद्यालय म्हणत असत. या विद्यालयांची कार्यपद्धती व अभ्यासक्रम यांची माहिती साहित्यातून मिळते. प्राचीन भारतात काशी, वल्लभी व इतरही अनेक लहान मोठी विद्यापीठे ज्ञानदानाचे कार्य करीत होती. रानटी आक्रमकांनी ही ज्ञानमंदिरे उध्वस्त केली.
Univrsity Education System
This is considered to be an important stage in the educational evolution of ancient India. The major universities in ancient India are known from the information given by Chinese travelers who came to India as well as from the remains obtained from the excavations carried out in the places where the ancient universities existed. The universities of Taxila, Nalanda, Vikramshila, Vallabhi and Kashi were especially famous in North India. While in South India, the work of teaching was done in the temple. They were called Ghatika Vidyalayas. Information about the procedures and curriculum of these schools is available from the literature.
Beginning of universities
The famous universities of ancient times seem to have evolved mainly from Buddhist viharas. Gautama Buddha created the Dharma Sangha for the propagation of the Dharma. Those shunned from public life were admitted into the Dharma Sangha. In Dharma Sangha every member had to follow the rules very strictly. In the Dharma Sangha, the monks and nuns used to do missionary work for eight months of the year and lived in one place for four months of the rainy season; Such a place is called Vihar. Various elements of philosophy were discussed in these viharas. After some time facilities were provided to provide education throughout the year in such viharas. From the discussions held in the Dharma Sangh, many books began to be produced. The advanced form of such viharas were the universities of ancient India. Students from India as well as outside India used to come to study in these universities.
University Admission Procedure:
In the ancient times, usually after the age of 12 to 15 years, students from any background were admitted to the university, but before admission, the students were tested to see how much curiosity they have to acquire knowledge. According to the information given by Chinese travelers, this type of entrance examination is very difficult. was given
Courses in University
The famous Nalanda Taxila Vikramashila Vallabhi University in India mainly taught the philosophy of Buddhism and the philosophy of other religions as well. While Kashi University mainly studied Hindu religion philosophy and ethics. In this university, the teaching classes of various subjects were conducted in various buildings. Apart from this, the subjects required for business skills were also taught here. After a certain period of time, the knowledge of the student who completed the course was tested. Various degrees were given to the students who successfully pass this examination. After some time, suitable changes were made in the curriculum of the university as per the need. The curriculum was designed in such a way that the student admitted to the university should have thorough knowledge of various subjects.
Administration of Ancient Universities
A large number of students were admitted from these universities in ancient India. Chinese travelers have given the information that four thousand students are studying in Nalanda University. A separate administrative system was set up to look after the affairs of these universities. The universities were run on financial support from various kings as well as rich and philanthropic individuals. To run the administration of the university, there were two boards viz. Vidvat Sabha and Management Committee to assist the Vice-Chancellor. The work of designing the courses, admitting the students, conducting their examinations, controlling the teaching class was done by the Vidwat Sabha. Proper maintenance of the university premises, construction of new buildings, repairs, construction of Vastigraha, accommodation for teachers were all under the management committee. Due to the special care taken by these two bodies, these universities of ancient India gained immense popularity not only in India but also in other countries.
Some famous universities of ancient India
Taxila University Taxila University was established in the Gandhara region in northwest India in ancient India Students like Arya Chanakya Vaidya Jivaka Grammar Panini studied in Taxila University Information about this university is found in Buddhist literature The university was popular during the period 800 800 BC to 400 AD There were students coming from home and abroad to study literature, art, politics, warfare, architecture, Ayurveda etc. subjects were taught in this university.In Nalanda University famous scholars like Dharmapala Chandrapala Gunmati Shilabhadra became the chancellor in this university philosophy of Buddhism Jain Hinduism and many other subjects were taught and the library named Dharmaganj in Nalanda University was particularly notable. Lakhs of books on various subjects were kept in it. Thousands of students from all over the country used to come to study in this university. In the thirteenth century, invaders destroyed Nalanda University.
Vikramashila University This university was founded by King Dharmapala of Pal dynasty. It is mentioned from the literature that 3000 students are studying in this university. Many famous scholars of that time Acharya were teaching in this university. Many students from all over the country used to come to study in this university.
The universities of Taxila, Nalanda, Vikramshila, Vallabhi and Kashi were particularly famous in India. While in South India, the work of teaching was done in the temple. They were called Ghatika Vidyalayas. Information about the procedures and curriculum of these schools is available from the literature. In ancient India, Kashi Vallabhi and many other small and big universities were doing the work of imparting knowledge. The invasion of barbarian invaders destroyed these temples of knowledge.
No comments:
Post a Comment