इतिहास म्हणजे काय व इतिहासाचे प्रकार कोणते ?
काळाचे मुख्यतः भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या तीन भागात विभाजन झाले आहे. ह्या तिन्ही काळामधील जो भूतकाळ असतो, ह्याला विशेष महत्व दिले जाते, कारण भूतकाळावरून आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कसा असेल ह्याचा अंदाज लावता येतो. भूतकाळाला इतिहास देखील म्हटले जाते.
इतिहासाची नेमकी व्याख्या काय, महत्त्व काय, इतिहासाचे प्रकार कोणते अशा विविध घटकांसंबंधीत माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत,
इतिहास म्हणजे काय ?
भूतकाळातील घटना अथवा परिस्थितीची स्मृती, त्याचे सादरीकरण, आणि स्पष्टीकरण म्हणजेच इतिहास होय. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर इतिहास म्हणजे भूतकाळ होय.
लिखित संग्रह, मौखिक विचार, पौराणिक कलाकृती, पर्यावरणीय स्थिती हे काही घटक आहेत, ज्याद्वारे भूतकाळाचा अथवा इतिहासाचा आढावा घेतला जातो.
इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीचा वापर करावा लागतो. ही शिस्तबद्ध पद्धत भूतकाळात घडलेल्या घटनांचे वर्णन व त्याचे विश्लेषण करण्यास मदत करते.
इतिहासातील घटनांचे विश्लेषण अथवा वर्णन हे ठराविक व्यक्ती अथवा इतिहासकार मार्फत होत नसून, साधारणतः इतिहासकार ठराविक घटनेबाबत वाद-विवाद करतात, ज्यातून घटनेच्या विश्लेषनाचा अंतिम टप्पा गाठला जातो. अनेकदा इतिहासकार केवळ इतिहासाचा अभ्यास नव्हे, तर त्यातून मिळणाऱ्या कौशल्यातून वर्तमानकाळातील समस्या देखील कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.
कोणत्याही संस्कृतीतील कथा म्हणजे एक प्रकारे संस्कृतीचा इतिहास अथवा भूतकाळ असतो, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. अशा कथा दंतकथा म्हणून ओळखल्या जातात.
या कथा संवादा मार्फत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत विस्तारत असतात. इतिहास हा अवशेषां वरून सिद्ध होत असल्याने, अशा कथांचा आणि इतिहासाचा अनेकदा काहीही संबंध जुळून येत नाही.
इतिहासाचे प्रकार
1. सामाजिक इतिहास
समाजाच्या भूतकाळाला विविध स्वरूपात पाहण्याची पद्धत म्हणजेच सामाजिक इतिहास होय. समाज म्हणजेच लोकांचा एकत्र आलेला समूह होय. येथे लोक एकत्र येण्याची विविध कारणे असू शकतात जसे की, कुटुंब व्यवस्थापन, व्यवहार, लोकांची सुरक्षितता इत्यादी.
लोकांचा समूह, समूहाचे दैनंदिन जीवन, समूहाचा समाजावर अथवा देशावर पडलेला प्रभाव या सर्व घटकांचा समावेश सामाजिक इतिहासाच्या अभ्यासक्रमात असू शकतो.
2. राजकीय इतिहास
राजकीय इतिहास म्हणजे ठराविक देश, प्रांत किंवा राज्यातील भूतकाळात घडलेल्या राजकारणा संबंधित घटना. इथे साधारणतः राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र संबंधित इतर घटकांचा आढावा घेतला जातो. राजकीय इतिहासासंबंधित अभ्यासक्रम हा भारतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीत शिकवला जातो.
3. धार्मिक इतिहास
धार्मिक इतिहास या घटकात साधारणतः असे पाहिले जाते की, ठराविक धर्माने कशा प्रकारे एखाद्या भूभागाला अथवा देशाला व्यापून तेथील घटनांना आकार दिला आहे, अथवा रचल्या आहेत.
कोणत्याही धर्मात लोकांचे मुख्यतः दोन गट आपल्याला दिसून येतात, त्यातील पहिला गट म्हणजे आस्तिक आणि दुसरा गट म्हणजे नास्तिक. आस्तिक म्हणजे देवाधर्मावर विश्वास ठेवणारे आणि नास्तिक म्हणजे धर्मातील देवांवर विश्वास न ठेवणारे अथवा त्यांच्या अस्तित्वावर शंका निर्माण करणारे.
आर्थिक इतिहासात ठराविक देश अथवा प्रदेशाच्या भूतकाळातील आर्थिक स्थिती आणि धनसंपत्ती या घटकांचा समावेश होतो. कोणत्याही देशाचा आर्थिक इतिहास पाहता त्यामूळे इतर अनेक घटनांचा उलगडा होताना दिसतो, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत होय.
पूर्वी भारत जगातील सर्वात श्रीमंत देश होता. भारताची श्रीमंत पाहता भारतावर अनेक परकीय आक्रमण झाले, त्यामुळे भारताचा नवीन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय इतिहास उदयास आला.
No comments:
Post a Comment