Wednesday, August 9, 2023

 

हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत. हडप्पा संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने तांबे व दगड या दोन्हींचाही उपयोग हत्यारे बनविण्यासाठी केला तो काळ ताम्रपाषाण युग म्हणून ओळखला जातो. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. ताम्रपाषाण युगात भारतात विविध प्रदेशांमध्ये अनेक संस्कृती उदयास आल्या. त्यापैकी सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा नगररचना, सांडपाण्याची व्यवस्था, स्थापत्यकला या क्षेत्रात हडप्पा संस्कृतीने फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली दिसून येते. तांबे व जस्त या धातूच्या मिश्रणातून  ब्राँझ धातू बनविण्याचे कौशल्य हडप्पा संस्कृती मधील लोकांनी विकसित केले होते.

हडप्पा संस्कृती नगर रचना : पुरातत्त्व आणि पर्यटन याचे उत्तम उदाहरण -जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये न आढळणारी नियोजनबद्ध नगर रचना हे हडप्पा संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. हडप्पा व मोहें-जो-दडो व इतर ठिकाणी ही योजनाबद्ध नगर रचना आढळते. नगररचनेच्या बाबतीत सौंदर्यवादी दृष्टिकोना बरोबरच त्यांनी उपयुक्ततेला देखील प्राधान्य दिले होते. हडप्पा संस्कृती मध्ये दोन विभाग दिसतात. एका बाजूस असलेल्या उंच भागावर राज्यकर्ते व श्रीमंत लोक यांचे वास्तव्य असावे तर मैदानातील भागावर सर्वसामान्य समाजाची वस्ती असल्याचे दिसून येते. येथील नगर रचनेमध्ये तटबंदी, मैदानातील नगररचना आणि प्रचंड इमारती हे तीन भाग होतात.

DockYard -Lothal Gujarat
DockYard -Lothal Gujarat

तटबंदी Fortification मोहेंजोदडो येथे तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. यावरून या संस्कृतीमधील लोक शांतताप्रिय असावेत असे मत जॉन मार्शल यांनी मांडले आहे. हडप्पा येथे शहराच्या एका बाजूस उंच भागावर असलेल्या घराभोवती तटबंदी केल्याचे आढळले. अशाच प्रकारे अनेक नगराभोवती तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत .तटबंदीमुळे नगराचे संरक्षण होत असावे.

Advertisements
REPORT THIS AD

रस्ते Roads  हडप्पा ,मोहेंजोदडो ,लोथल ,धोलावीरा ,राखीगढी इत्यादी ठिकाणी शहरांमधे रस्त्यांचे अवशेष आढळले. शहराच्या मध्यभागातून पूर्व-पश्चिम भागातून जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहराचे दोन भागात विभाजन केलेले होते.या मुख्य रस्त्याला बरोबर काटकोनात छेद देणारे कमी रुंदीचे उप रस्ते  केलेले आहेत. या विशिष्ट रचनेमुळे शहरातील वातावरण मोकळे व स्वच्छ राहात होते. रस्त्यावर दिवाबत्तीची सोय व कचरा एकत्र करण्याची सोय केलेली होती.

Rakhigadhi Excavation Site
Rakhigadhi Excavation Site

घरे Houses  सामान्य नागरिकांची घरे शहराच्या मैदानाकडील भागात आहेत. ही घरे उप रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बांधलेली आहेत. कोणतेही घर मुख्य रस्त्याला आढळले नाही. तसेच मुख्य रस्त्याकडे तोंड करून घराचा दरवाजा किंवा खिडकी बांधलेली आढळत नाही. ही घरे पक्या भाजलेल्या विटांनी बांधलेली आहेत. घरांचा आकार सर्वसाधारणपणे चौरस पद्धतीचा आहे. घराच्या मध्यभागी चौक असून त्याच्या बाजूला खोल्या आहेत. ही घरे दुमजली असून क्वचित तीन मजली घरे देखील त्यांनी बांधली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी भिंतीतून पायऱ्या केलेल्या आहेत. घराच्या समोर अंगण व मागे परस केलेले आहे. काही घरांमध्ये विहिरी आढळल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह बांधलेले आहे. तळमजल्यावरील खोल्यांचा उपयोग स्वयंपाक गृह आणि भांडार गृह यासाठी केला जात असावा.

Dholaviraa -Gujarat
Dholaviraa -Gujarat

भुयारी गटारे (Underground drainage system) हडप्पा संस्कृती मध्ये प्रत्येक घरात स्नानगृह बांधलेले होते. घरातून बाहेर पडणारे सांडपाणी उभ्या नळाद्वारे उप रस्त्या खालून जाणाऱ्या गटाराना जोडलेले होते. मुख्य रस्त्याखाली असलेल्या भुयारी  गटारा मधून हे सांडपाणी शहराच्या बाहेर नेऊन सोडण्याची व्यवस्था केलेली होती. ही गटारे  भाजलेल्या विटांनी बांधलेली आहेत. गटारे स्वच्छ करण्यासाठी ठराविक अंतरावर स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारची भुयारी गटारांची योजना समकालीन इतर संस्कृती मध्ये आढळत नाही.

प्रचंड इमारती Huge Buildings हडप्पा संस्कृतीच्या विविध ठिकाणी केलेल्या पुरातत्वीय उत्खननामध्ये प्रचंड इमारतींचे अवशेष मिळाले आहेत. नियोजन बद्ध नगर रचनेप्रमाणे प्रचंड इमारती हेसुद्धा या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या इमारतींच्या बांधकामामध्ये सौंदर्यवादी दृष्टीकोन ,प्रमाणबद्धता ,उपयुक्तता व रेखीवता इत्यादी घटकांचा समावेश होतो.

महास्नानगृह (Great Bath) मोहेंजोदडो येथे महास्नान गृहाचे अवशेष मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये प्रत्येक घरात स्नानगृह असूनही अशा प्रकारचे सार्वजनिक स्वरूपाचे महा स्नानगृह त्यांनी बांधले होते. हे महा स्नानगृह साठ मीटर लांब व 36 मीटर रुंद आहे. मध्यभागी 13 मीटर लांबीचा पोहण्याचा तलाव आहे.. त्याची खोली तीन मीटर इतकी आहे. संपूर्ण महा स्नानगृह पक्‍क्‍य भाजलेल्या विटांनी बांधलेले आहे.  तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. शेजारी असलेल्या मोठ्या विहिरींमधून तलावामध्ये स्वच्छ पाणी पाण्याची सोय केलेली आहे. तसेच तलावातील अस्वच्छ पाणी बाहेर सोडून देण्याची व्यवस्था केलेली आहे. तलावाभोवती लहान आकारांच्या खोल्या बांधलेल्या आहेत. त्यांचा उपयोग कशासाठी केला जात असावा याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत.

धान्याचे कोठार (Granery)  हडप्पा संस्कृती मध्ये धान्याच्या स्वरूपामध्ये कर गोळा केला जात असे. हे जमा झालेले धान्य साठविण्यासाठी प्रचंड आकाराची धान्य कोठारे त्यांनी बांधली. मोहेंजोदडो येथे धान्याचे कोठार आढळले आहे. हे धान्य कोठार 50 मीटर लांब व 25 मीटर रुंद आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूला धान्य साठवण्यासाठी मोठ्या खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी वायुविजन ( ventilation)ची सोय केलेली आहे.

लोथल जहाजाची गोदी (Dockyard)  समुद्रमार्गे व्यापार करण्यासाठी हडप्पा संस्कृती मधील लोकांनी  जहाजाची गोदी गोदी बांधली होती. यामध्ये नवीन जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय केलेली होती. भारतामध्ये गुजरात मधील लोथल येथे पक्या भाजलेल्या विटांनी बांधलेली प्रचंड आकाराची जहाजाची गोदी आढळली आहे. या गोदीमध्ये समुद्राच्या भरती वेळी येणाऱ्या लाटांबरोबर येणारे पाणी या जहाजाच्या गोदीमध्ये येईल आणि समुद्राच्या ओहोटीच्या वेळी आलेले पाणी बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केलेली होती.

सभाग्रह (Public Hall)  मोहेंजोदडो येथे सुमारे 25 मीटर लांब व 25 मीटर रुंदीच्या एका सार्वजनिक सभागृहाचे अवशेष मिळाले आहेत.

शासन केंद्र  (Administration Center) हडप्पासंस्कृतीच्या उत्खननात एका वेगळ्या प्रकारच्या इमारतीचे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये एका बाजूस प्रमुख व्यक्तीला बसण्यासाठी जागा केलेली आहे. तसेच त्याच्याभोवती आणखी काही जणांना बसण्यासाठी आसने किंवा बैठक व्यवस्था केलेली आहे. याचा उपयोग प्रशासन चालविण्यासाठी केला जात असावा. काही विद्वानांच्या मते ही इमारत एक शिक्षण केंद्र असावे.

        नगर रचना हे हडप्पा संस्कृतीचे खास वैशिष्ट्य होते. अशा प्रकारची नगर रचना इतर समकालीन कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाहीं.भारतामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक  स्थळे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. यातील बहुतेक सर्व स्थळांवर हडप्पा संस्कृती मधील वैशिष्ट्यपूर्ण नगर रचनेचे अवशेष आढळतात.

भारतातील हडप्पा संस्कृतीची प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळे –भारत आणि पाकिस्तान मध्ये हडप्पा संस्कृतीची एकूण १५०० स्थळेआहेत.त्यापैकी १००० स्थळे भारतात आहेत.भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभाग,डेक्कन कॉलेज -पुणे आणि अनेक संशोधन संस्थांनी गेल्या शंभर वर्षात भारतातील विविध स्थळांवर पुरातत्त्वीय उत्खनन केले आहे.गुजरात मधील लोथल आणि धोलावीरा तसेच हरियाणा मधील राखीगढी हि स्थळे भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने जतन आणि संवर्धन केली आहेत.युनेस्कोने लोथल या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.राखीगढी हे स्थळ हडप्पा संस्कृती मधील सर्वात मोठे नगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू प्रोफेसर वसंत शिंदे यांनी राखीगढी येथे केलेल्या संशोधनामुळे जगभरातील संशोधकांचे लक्ष वळले आहे.हि स्थळे पुरातत्त्वीय संशोधनाबरोबरच पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहेत.

हडप्पा संस्कृतीची पर्यटन स्थळे -लोथल,धोलावीरा आणि राखीगढी Live Location Link खाली दिलेल्या आहेत.

लोथल LIVE Location Link – https://goo.gl/maps/Zi8tY65B8RUXc5qd6

धोलावीरा Live Location Link – https://goo.gl/maps/agLiT1WUbJaGVJ378

राखीगढी -Live Location Link – https://goo.gl/maps/agLiT1WUbJaGVJ378

Harappan Civilization : Archaeological Tourist Sites

The people of the Harappan culture had progressed in all spheres of life. The most important period in human progress after the Stone Age in India is the Copper Age. At the beginning of the Metal Age, humans made various ornaments and implements from copper. The period when humans used both copper and stone to make weapons is known as the Copper Age. Harappan Civilization is also known as Indus Civilization, Bronze Age Civilization. During the Copper Age, many cultures emerged in different regions of India. Among them, the most ancient and developed civilization is the Harappan civilization. It is seen that Harappan civilization has made great progress in the field of urban planning, sewage system, architecture than any other civilization in the world. The skill of making bronze metal from an alloy of copper and zinc was developed by the people of the Harappan civilization.

Town Planning of Harappa Civilisation

A special feature of the Harappan civilization is the planned urban structure which is not found in any other civilization in the world. This planned city structure is found in Harappa and Mohen-jo-Dado and other places. Along with the aesthetic approach to urban planning, he also gave preference to utility. There are two divisions in the Harappan culture. The elevated area on one side is supposed to be inhabited by the rulers and rich people while the plain area is seen to be inhabited by the common people. The urban structure here consists of three parts: fortifications, urban structures in plains and huge buildings.

Fortification

Remains of fortifications have been found at Mohenjodado. From this, John Marshall suggested that people in this culture should be peaceful. At Harappa, a wall was found around a house on a hill on one side of the city. Similarly, the remains of ramparts have been found around many cities. The ramparts must have protected the city.

Roads

Remains of roads were found in cities like Harappa, Mohenjodado, Lothal, Dholavira, Rakhigarhi etc. The city is divided into two parts by roads running east-west from the center of the city. The main road is intersected at right angles by narrower sub-roads. Due to this particular design, the atmosphere in the city was free and clean. Street lighting and waste collection facilities were provided.

the houses

The houses of ordinary citizens are located in the outskirts of the city. These houses are built on either side of the sub roads. No houses were found on the main road. Also, there is no door or window of the house facing the main road. These houses are built of baked bricks. The shape of the houses is generally square. There is a square in the middle of the house and there are rooms on its sides. These houses are two-storied and rarely three-storied houses are also built by them. Stairs are cut through the wall to get to the upper floor. There is a yard in front of the house and a yard in the back. Wells have been found in some houses. Bathroom is built in every house. The rooms on the ground floor may have been used for cooking and storage.

Underground drainage system

In the Harappan culture, every house had a bathroom. The sewage from the house was connected to the sewers passing under the sub-road through a vertical pipe. Arrangements were made to discharge this sewage outside the city through the underground sewers under the main road. These drains are built with burnt bricks. Separate arrangements were made for cleaning the drains at regular intervals. Such a scheme of underground sewers is not found in other contemporary cultures.

Huge buildings

Archaeological excavations at various sites of the Harappan civilization have yielded remains of huge buildings. Huge buildings are also a feature of this culture as well as planned urban design. The construction of these buildings includes elements such as aesthetic approach, proportionality, utility and linearity.

Great Bath

Remains of Mahasnan Grha have been found at Mohenjodado. In the Harappan culture, although every house had a bathroom, they built a public bath of this type. This great bath is sixty meters long and 36 meters wide. In the center is a 13 meter long swimming pool.. Its depth is three meters. The entire Maha Bathinya is built with baked bricks. There are steps to descend into the lake. Clean water is provided in the lake from the big wells nearby. Arrangements have also been made to release the unsanitary water from the lake. Smaller sized rooms are built around the lake. Scholars differ as to what they should have been used for.

Granary

In the Harappan culture taxes were collected in the form of grain. They built huge granaries to store this accumulated grain. A granary has been found at Mohenjodado. This granary is 50 meters long and 25 meters wide. On both sides of the building, large rooms are built for storing grain. Ventilation is provided to keep the air circulating in these rooms.

Dockyard

People of Harappan civilization built ship docks to trade by sea. It provided facilities for building and repairing new ships. Baked at Lothal in Gujarat, India

An enormous brick-built ship dock has been found. The dock was designed so that the water coming in with the waves during the high tide would enter the ship’s dock and the water coming in during the low tide would not go out.

Public Hall

Remains of a public hall about 25 meters long and 25 meters wide have been found at Mohenjodado.

Administration Center

Excavations of the Harappan culture have yielded remains of a different type of building. It has a seat on one side for the chief person. Also seats or meetings are arranged around him for some more people to sit. It should be used to run the administration. According to some scholars, this building may have been a learning center.

Urban design was a special feature of the Harappan civilization. This kind of urban structure is not found in any other contemporary culture. In India, many sites of Harappan culture have been found in Gujarat, Rajasthan, Punjab, Haryana in large numbers. At most of these sites, the remains of the typical urban structure of the Harappan civilization can be found.

Famous sites of Harappan civilization in India

There are a total of 1500 sites of Harappan civilization in India and Pakistan. Out of them 1000 sites are in India. Archaeological Survey of India, Deccan College-Pune and many research institutes have conducted archaeological excavations at various sites in India during the last hundred years. Lothal and Rakhilawira in Gujarat and Dhogarhi in Haryana. The site has been well preserved and conserved by the Archaeological Survey of India. Lothal has been recognized as a World Heritage Site by UNESCO. Rakhigarhi has been identified as the largest city of the Harappan civilization. Due to the research done, the attention of researchers from all over the world has been diverted. These places have become tourist attractions along with archaeological research.

Lothal LIVE Location Link – https://goo.gl/maps/Zi8tY65B8RUXc5qd6

Dholavira Museum
Dholavira Museum

Dholaweera Live Location Link – https://goo.gl/maps/agLiT1WUbJaGVJ378

Dholavira,Gujarat
Dholavira,Gujarat

Rakhigarhi -Live Location Link – https://goo.gl/maps/agLiT1WUbJaGVJ378

Rakhigadhi -Dr.Vasant Shinde
Rakhigadhi -Dr.Vasant Shinde

No comments:

Post a Comment