वेरूळ येथील लेणी समूहातील कैलास मंदिर  सोळा  क्रमांकाचे लेणे कैलास मंदिर किंवा कैलास लेणे म्हणून ओळखली जाते. वेरूळ येथील लेणी समूहात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय लेणी एकाच ठिकाणी आहेत. हे एक शिवमंदिर आहे. कैलास मंदिर कर्नाटकातील पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिर आणि तामिळनाडूतील कांची येथील कैलासनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. कैलास मंदिर द्राविड स्थापत्य शैलीमध्ये खोदलेले आहे.हे मंदिर पूर्ण होण्यासाठी दीडशे वर्षे लागली. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून कैलास मंदिर वेरूळला मान्यता दिली आहे. जगभरातील पर्यटकांचे हे एक आकर्षण केंद्र आहे.

कैलास मंदिर एलोरा Live Location – https://goo.gl/maps/ZgiYsUary48ty4QV9

kailas Tmple-Ellora
Ariel  View- Kailas Temple, Ellora

कैलास मंदिर एलोरा स्थापत्यकला -कैलास मंदिराची लांबी 276 फूट, रुंदी 154 फूट आणि उंची 107 फूट आहे.

कैलास मंदिराची रचना – एलोरा येथील कैलास मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि नंदीमंडप अशी आहे.नंदीमंडप दोन मजली असून मुख्य मंदिर 25 फूट उंचीच्या चौथऱ्यावर निर्माण केले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर द्राविडी पद्धतीचे तीन मजली शिखर(विमान) आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाजूस प्रवेश किंवा अर्धमंडप केलेले आहेत. गोपूर, नंदीमंडप आणि मुख्य मंदिर दोन मजली असून ते एकमेकांना पुलाने जोडलेले आहेत.  कैलास मंदिरात असलेल्या सभामंडपाला रंगमहाल असे म्हणतात. त्यामध्ये शिल्पकाम केलेले सोळा स्तंभ आहेत. छतावर शिव नृत्याची मूर्ती आहे. याशिवाय मुख्य मंदिराच्या भोवती पाच उप देवतांची लहान आकाराची मंदिरे आहेत. प्राकाराच्या समोरच्या बाजूला मोठी भिंत व प्रवेश द्वारावर गोपूर आहे. कैलासनाथाचे मुख्य मंदिर 25 फूट उंच चौथऱ्यावर उभे आहे. चौथर्‍याच्या  चारही भागावर हत्ती, सिंह आणि वाघ यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर अर्धस्तंभ ओळीने घडवलेले आहेत. संभा मंडपाच्या  स्तंभाच्या मध्ये देवकोष्टे केलेली आहेत. यामध्ये शिवपुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराचे शिखर द्राविड शैलीचे आहे. सध्या मंदिरासमोर एक ध्वजस्तंभ आहे. पूर्वी या ठिकाणी दोन ध्वजस्तंभ होते. तसेच दोन्ही बाजूला प्रचंड आकाराचे हत्ती होते. त्यापैकी एक हत्ती आता शिल्लक राहिला आहे.

कैलास मंदिर एलोरा शिल्पकला – शिल्पकामाच्या दृष्टीने कैलासनाथ मंदिर अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे.या लेणी मध्ये अनेक देव-देवतांची शिल्पे आहेत. या लेण्यांमध्ये गणेश , महिषासुर मर्दिनी, शिव, विष्णु, इंद्र, नरसिंह, वराह, त्रिविक्रम, ब्रह्मा, कमळपुष्पावर बसलेली गजलक्ष्मी या देव देवतांची शिल्पे आहेत. उत्तरेकडील भिंतीवर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेले शिल्प अतिशय सुंदर आहे.  कैलासनाथ मंदिराची प्रचंड वास्तू अंतर्बाह्य शिल्पकामाने सजवलेली आहे. त्यामध्ये छायाप्रकाश योजनेचा नयनरम्य परिणाम साधलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेश द्वाराच्या उजवीकडे यमुना व डावीकडे गंगा या दोन नद्याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शिल्प कामा मध्ये गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूचे द्वारपाल तसेच मंदिराचे द्वार शाखा याशिवाय रावणअनुग्रह शिल्प यांचा प्रामुख्याने समावेश होतो. रावण अनुग्रह शिल्पांमध्ये रावण खाली एक गुडघा टेकून आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवीत आहे, तर कैलास पर्वतावर शांत चित्ताने बसलेले शिव आणि भयभीत झालेली देवी पार्वती शिवाला बिलगली आहे. रावण  कैलासपर्वत हलवीत असल्यामुळे घाबरून पळणारे शिवगण, डोंगरावरचे प्राणी यांची शिल्पे हा प्रसंग जिवंत करण्यामध्ये कलाकार यशस्वी झाले आहेत. यातील नाट्यमयता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

Ravan Anugrah,Ellora
Ravan Anugrah Sculpture ,Ellora

कैलास मंदिर वेरूळचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व कैलास मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. तर दक्षिणेकडील भिंतीवर रामायणातील शिल्पकाम कोरलेले आहे. यक्ष, गंधर्व व अप्सरा यांची शिल्पे कैलास मंदिराच्या भिंतींवर ठिकठिकाणी दिसतात. या मंदिराच्या मंडपामध्ये पूर्वी शिवपुराणातील विविध प्रसंगाची चित्रे चितारलेली होती. त्याचे आता काही अवशेष शिल्लक आहेत.कैलासनाथ मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात कैलास मंदिर वेरूळ येथे भेट देतात.

Kailash Temple Ellora: A Marvel of World Heritage

The Kailash temple is cave number sixteen in the group of caves at Verul. This cave is known as Kailasa Temple or Kailasa Caves. It is a Shiva temple. The Kailas Nath Temple is an exact replica of the Virupaksha Temple at Pattadakal in Karnataka and the Kailas Nath Temple at Kanchi in Tamil Nadu. Kailasanath temple is carved in Dravidian architectural style. It took 150 years to complete this temple.

Kailash Temple – Live Location – https://goo.gl/maps/ZgiYsUary48ty4QV9

Kailash Temple at Ellora is considered to be one of the marvels of Indian architecture. Among the monolithic temples, this temple is the largest in size and the most complete. The Kailasanath temple is considered to be the most advanced invention in terms of technique and art in the Giri sculptural tradition. This temple is built in the manner of building first the top and then the base. After building the upper part first, the sculptors went down. The Kailash Temple of Ellora was excavated during the reign of the Rashtrakuta kings Sri Krishna I and Dantidurga. This temple is built in Dravidian Vastu style.

The length of the Kailash temple is 276 feet, width is 154 feet and height is 107 feet. There are sculptures of many gods and goddesses in this cave. These caves have sculptures of Ganesha, Mahishasura Mardini, Shiva, Vishnu, Indra, Narasimha, Varaha, Trivikram, Brahma, Gajalakshmi sitting on a lotus flower. On the northern wall, the sculpture of the confluence of the three rivers Ganga Yamuna and Saraswati is very beautiful. The massive structure of Kailasanath temple is decorated with sculptures inside and out. It has a picturesque effect of shading scheme. The structure of the Kailasa temple consists of sanctum sanctorum, sanctum sanctorum, mandapam and Nandi Mandapam at a short distance. On the right of the entrance of the sanctum sanctorum are carved images of two rivers, Yamuna and Ganga on the left.

The Nandimandap is two storied and the main temple is built on a 25 feet high square. The sanctum sanctorum of the temple has a Dravidian style three-storied Shikhar (viman). There are entrances or Ardhamandap on three sides of the Sabhamandap. The Gopur, Nandimandap and the main temple are two storeyed and are connected to each other by a bridge. The auditorium in the Kailasa temple is called Ranga Mahal. It has sixteen sculpted pillars. There is an idol of Shiva dancing on the roof. Apart from this, around the main temple there are smaller temples of five sub deities. There is a large wall in front of the prakara and a gopur at the entrance.

The main temple of Kailasanath stands on a 25 feet high square. Elephant, lion and tiger idols are carved on all four sides of the quadrangle. The outer wall of the main temple is lined with semi-pillars. Devokoshtas are placed between the pillars of the Sambha mandapam. Incidents from Shiv Purana are engraved in it. The spire of the temple is of Dravidian style. Currently there is a flag pillar in front of the temple. Earlier there were two flagpoles at this place. Also there were elephants of huge size on both sides. One of them remains now.

Sculpture at Kailash Temple:- Kailasanath temple is very important in terms of sculpture. The sculptural work mainly includes the Ravana Anugrah sculpture apart from the gatekeepers on both sides of the entrance to the sanctum sanctorum as well as the door branches of the temple. In the Ravana Anugraha sculptures, Ravana is kneeling down and moving Mount Kailas with his twenty arms, while Shiva, seated serenely on Mount Kailas, and the terrified goddess Parvati are gazing at Shiva. The artists have been successful in bringing this scene to life with the sculptures of Shiva running away in fear, animals on the mountain as Ravana moved to Mount Kailash. The dramatization of this is characteristic.

Episodes from the Mahabharata are carved on the northern wall of the Kailasanath temple. On the southern wall, there are sculptures from the Ramayana. Sculptures of Yakshas, Gandharvas and Apsaras are seen everywhere on the walls of Kailasa temple. The mandapam of this temple used to depict various scenes from Shiv Purana. A few remains of it now remain. The Kailasanath Temple has been recognized as a World Heritage Site by UNESCO