Wednesday, August 9, 2023


 एलीफंटा लेणी घारापुरी  या नावानेही  ओळखल्या जातात. या ठिकाणी पूर्वी महाकाय दगडी हत्तीची मूर्ती होती. तिला पाहून पोर्तुगीजांनी या लेण्यांना Elephanta Caves हे नाव दिले. सध्या हत्तीची मूर्ती मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवलेली आहे. युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटा गुफा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. एलिफंटा गुंफाचे जतन आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडून केले जात आहे .घारापुरीचे भौगोलिक स्थान रायगड जिल्ह्यातील तालुका उरण येथे आहे. मुंबईच्या प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रकिनाऱ्यावरून बोटीने घारापुरीला जाता येते. मुंबई ते एलिफंटा गुंफा अंतर साधारणपणे 11 किलोमीटर इतके आहे.

एलीफंटा लेणी – घारापुरी Live Location- https://goo.gl/maps/rpgHwjcd6DdRFusDA

एलिफंटा घारापुरीचा इतिहास एलिफंटा गुफा केव्हा खोदल्या गेल्या याचे लिखित पुरावे सापडले नाहीत इसवी सन सहाव्या शतकामध्ये एलीफंटा गुंफा खोदल्या गेल्या असाव्यात असे तज्ञांचे मत आहे. येथील लेणी वाकाटक आणि कलचुरी घराण्यातील राजांनी खोदलेल्या  आहेत. तर काही तज्ञांच्या मते ही लेणी चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांनी खोदलेली आहेत.एलीफंटा गुंफा शैव पंथातील पाशुपत संप्रदायाला  समर्पित आहेत.

Trimurti Shiva ,Elephanta Caves
Trimurti Shiva ,Elephanta Caves

एलीफंटा घारापुरीचे स्वरूप एलिफंटा गुफा पाशुपत स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. पूर्व पश्चिम आणि उत्तर अशा तीन बाजू या लेण्याला आहेत. उत्तरेकडील प्रवेश मंडप हेच मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी एकूण सात लेणी  आहेत. त्यापैकी क्रमांक एक ते पाच या हिंदू लेणी आहेत तर क्रमांक सहा आणि सात या बौद्ध लेणी आहेत.

Elephant -Bhau Daji Lad Museum
Elephant statue-Bhau Daji Lad Museum,Mumbai

Advertisements

REPORT THIS AD

घारापुरी येथील गुंफा क्रमांक सहा म्हणजे चैत्यविहार असावे. समोर भव्य मंडप आणि मागील भिंतीमध्ये तीन गर्भगृह आहेत. तीन पैकी एका गर्भगृहात पोर्तुगीजांनी चर्च सारखा वापर केला होता. गुंफा क्रमांक सहा सीताबाई चे मंदिर या नावाने ओळखली जाते. गुंफा क्रमांक सात ची खूप पडझड झालेली आहे .पोर्तुगीज सैन्य या ठिकाणी युद्धसराव करत असताना अनेक शिल्प व मूर्ती उद्ध्वस्त झालेल्या आहेत. येथील बेटावर तीन गावे असून सुमारे दोन हजार लोक वस्ती आहे.

Ravan Anugrah sculpture,Elephanta caves
Ravan Anugrah Elephanta caves

त्रिमूर्ती शिव एलिफंटा –Trimurti Shiva Elephanta caves येथील क्रमांक एकचे लेणे ग्रेट गुफा म्हणून ओळखले जाते यामध्ये शिवाची सर्वात प्रसिद्ध त्रिमूर्ती किंवा महेश मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे या मूर्तीला तीन मुख असून तिन्ही चेहऱ्यावर शांती उग्रपणा आणि प्रेम या भावना दाखविल्यामुळे हे मूर्ती शिल्प अद्वितीय  बनले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या लोगो साठी त्रिमूर्ती शिवाची प्रतिमा वापरली आहे .

वैशिष्ट्यपूर्ण शिवप्रतिमा एलीफंटा -Characteristic Shiva ImageElephanta caves येथील शिवपार्वती विवाहाचा प्रसंग दर्शविणारा भव्य शिल्पपट मूर्ती विज्ञाना मध्ये या मूर्तीला कल्याणसुंदर मूर्ती असे म्हणतात. याशिवाय लकुलीषाची तपश्चर्या, पार्वती बरोबर द्यूत क्रीडा, रावण अनुग्रह,अर्धनारी शिव, डोक्यावर गंगा धारण करणारा गंगाधर शिव, गजासुर आणि अंधकासुर या दोन राक्षसांचा वध करणारा शिव दाखविणारे भव्य शिल्पपट  एलिफंटा  गुंफेमध्ये पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहेत.

Gangadhar Shiv
गंगाधर शिव -एलीफंटा
kalyansunder Murti
शिव-पार्वती विवाह (कल्याणसुंदर मूर्ती) एलीफंटा

पर्यटकांसाठी सोयी सुविधाएलिफंटा घारापुरी एलिफंटा गुफा येथे पर्यटक दोन ते तीन तास पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात या ठिकाणी टॉय ट्रेन मधून सफारी करता येते विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे महिना अनुकूल असा काळ आहे.

Ferry Boat -Elephanta Caves
Ferry Boat -Elephanta Caves
Toy Train -Elephanta Caves
Toy Train -Elephanta Caves

सारांश एलिफंटा घारापुरी येथे एकाच ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन समुद्र पर्यटन नैसर्गिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी  एक आदर्श स्थळ आहे.युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटा गुफा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी  सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Elephanta Caves : Tourist attraction

Elephanta caves are also known as Gharapuri Caves. This place used to have a giant stone elephant idol. Seeing her, the Portuguese named these caves Elephanta Caves. Currently, the elephant statue is housed in the Bhau Daji Lad Museum in Mumbai. UNESCO declared Elephanta Cave as a World Heritage Site in 1987. The conservation and conservation work of Elephanta Cave is being done by Archaeological Survey of India.Gharapuri is geographically located in Taluka Uran of Raigad District. Gharapuri can be reached by boat from the beach at Mumbai’s famous Gateway of India. The distance from Mumbai to Elephanta Caves is approximately 11 kilometers.

History No written evidence has been found as to when the Elephanta Caves were excavated, experts believe that the Elephanta Caves were excavated in the sixth century AD. The caves here are excavated by kings of the Vakataka and Kalachuri dynasties. Some experts believe that these caves were dug by the Chalukya and Rashtrakuta kings. The Elephanta Caves are dedicated to the Pashupat sect of Shaivism.

Appearance of Elephanta Caves Elephanta Caves are a masterpiece of Pasupat architectural style. There are three sides to take: East, West and North. The north entrance pavilion is the main entrance. There are total seven caves in this place. Among them number one to five are Hindu caves while number six and seven are Buddhist caves.

Cave number six should be Chaitya Vihara. There is a grand pavilion in front and three sanctuaries in the back wall. One of the three sanctuaries was used by the Portuguese as a church. Cave number six is known as Sitabai’s temple. Cave number seven is very dilapidated. Many sculptures and idols have been destroyed when the Portuguese army was conducting military exercises in this place. There are three villages on the island with a population of about two thousand people.

Cave number one at Trimurti in Elephanta is known as the Great Cave and the most famous Trimurti or Mahesh Murti of Shiva is very unique as it has three faces and all the three faces show emotions of peace ferocity and love making this idol sculpture unique. The image of Trimurti Shiva has been used for the logo of the Maharashtra Tourism Corporation.

A magnificent sculpture depicting the wedding scene of Shivaparvati in the characteristic Shivapratima at Elephanta, this idol is called Kalyansundera Murti in murti science. Apart from this, magnificent sculptures depicting Lakulisha’s penance, Deut sports with Parvati, Ravana Anugraha, Ardhnari Shiva, Gangadhar Shiva holding Ganga on his head, Shiva slaying two demons Gajasur and Andhakasur are the tourist attractions in Elephanta Caves.

Tourist facilities Tourists can enjoy two to three hours of sightseeing at Elephanta Caves.Toy train safaris are available.There are various types of food stalls.

Summary Elephanta Cave or Gharapuri Caves is an ideal place to enjoy cultural tourism, sea tourism, natural tourism at one place. UNESCO has declared Elephanta Cave as a World Heritage Site in 1987. All the facilities required by tourists are available here.

Advertisements

No comments:

Post a Comment