पर्यटन विकासामध्ये पाश्चात्य देशानी वस्तुसंग्रहालयाचे महत्व फार पूर्वीच ओळखले आहे. युरोपमध्ये विशेषतः एकट्या पॅरिस शहरामध्ये दोनशेच्या आसपास वस्तुसंग्रहालये आहेत. याशिवाय लंडन, रोम इथेही मोठ्या प्रमाणात वस्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या शहरांना भेट देणारे पर्यटक आवर्जून येथील वस्तुसंग्रहालयाला भेट देतात.ब्रिटिश सत्तेच्या स्थापने नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यास सुरुवात झाली.

वस्तू संग्रहालयाची व्याख्या – अनेक विद्वानांनी वस्तुसंग्रहालयाच्या विविध व्याख्या केल्या आहेत.युनेस्कोने संग्रहालयाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे,” समाजाच्या सेवेसाठी आणि त्याच्या विकासासाठी ना-नफा, कायमस्वरूपी संस्था, लोकांसाठी खुली, जी शिक्षण, अभ्यास आणि आनंदाच्या उद्देशाने मानवतेचा मूर्त आणि अमूर्त वारसा जतन करते, संवर्धन करते, संशोधन करते, संवाद साधते आणि त्याचे प्रदर्शन करते.”

भारतीय संस्कृती कोशांमध्ये ,”नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला वस्तुसंग्रहालय म्हणतात” .पर्यटन विकासामध्ये वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. वस्तुसंग्रहालय आणि पर्यटन विकास  दोन्ही परस्पर पूरक आहेत.

Museum display
Museum display

वस्तू संग्रहालय निर्मितीचा इतिहास -आधुनिक काळात जशी वस्तुसंग्रहालय आहेत तशी प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात भारतात नव्हती. परंतु राजप्रासादामध्ये राजघराण्यातील अनेक दुर्मिळ, मौल्यवान व कलात्मक वस्तूंचा संग्रह केलेला असे. युरोपात प्रारंभीच्या काळात काही हौशी किंवा श्रीमंत माणसे कलात्मक व मौल्यवान वस्तूंचा संग्रह करून विशेष समारंभात त्याचे प्रदर्शन मांडीत असत. ब्रिटिश सत्तेच्या स्थापने नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. इतिहास ,परंपरा व संस्कृती जतन करून ती पुढच्या पिढीकडे नेण्याची महत्त्वाची भूमिका वस्तू संग्रहालये पार पाडतात.

वस्तुसंग्रहालयाचे प्रकार -वस्तुसंग्रहालय मध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत त्यावरून संग्रहालयाचे प्रकार पाडले जातात. आधुनिक काळात वस्तुसंग्रहालयाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. वस्तुसंग्रहालयाचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत-  इतिहास वस्तुसंग्रहालय- पुरातत्व वस्तुसंग्रहालय- कला वस्तुसंग्रहालय- हस्तकला वस्तुसंग्रहालय- वस्त्र संग्रहालय -शस्त्रास्त्रे संग्रहालय- शास्त्रीय वस्तूसंग्रहालय-आदिवासी संग्रहालय .प्रधानमंत्री संग्रहालय- अलीकडच्या काळात अनेक प्रकारचे वस्तुसंग्रहालय निर्माण होत आहेत. भारतामध्ये प्रधानमंत्री संग्रहालय नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आले आहे.

भारतातील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये-भारतामध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय वस्तू संग्रहालये विविध राज्यांमध्ये आहेत. त्यापैकी काही वस्तू संग्रहालये पुढील प्रमाणे आहेत.राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली-इंडियन म्युझियम, कोलकाता-छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई-सालारजंग म्युझियम, हैदराबाद-शासकीय वस्तुसंग्रहालय, चेन्नई-अल्बर्ट हॉल, जयपुर-नेपियर संग्रहालय ,तिरुअनंतपुरम

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विकसित केलेली साइट संग्रहालये- उदा. लोथल आणि धोलाविरा-गुजरात, प्राचीन नालंदा विद्यापीठ- बिहार, हम्पी- कर्नाटक,खजुराहो-मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील उत्कृष्ट वस्तू संग्रहालये -महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये जवळपास दीडशे वस्तुसंग्रहालये आहेत. त्यापैकी काही वस्तुसंग्रहालय पुढील प्रमाणे आहेत-छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई-डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, मुंबई-राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय, पुणे-मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर-सोनेरी महाल वस्तु संग्रहालय, औरंगाबाद-रामलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय, तेर, जिल्हा उस्मानाबाद-टाऊन हॉल संग्रहालय कोल्हापूर-श्री भवानी संग्रहालय औंध,जिल्हा सातारा-छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, सातारा-शस्त्रास्त्र संग्रहालय न्यू पॅलेस, अक्कलकोट,जिल्हा सोलापूर

पर्यटन विकासामध्ये वस्तू संग्रहालयाचे योगदान-पर्यटन विकासामध्ये पाश्चात्य देशानी वस्तुसंग्रहालयाचे महत्व फार पूर्वीच ओळखले आहे. युरोपमध्ये विशेषतः एकट्या पॅरिस शहरामध्ये दोनशेच्या आसपास वस्तुसंग्रहालये आहेत. याशिवाय लंडन, रोम इथेही मोठ्या प्रमाणात वस्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या शहरांना भेट देणारे पर्यटक आवर्जून येथील वस्तुसंग्रहालयाला भेट देतात. भारतामध्ये पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभाग यांनी समन्वयातून वस्तुसंग्रहालयां कडे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यातूनच पर्यटन विकास आणि वस्तुसंग्रहालयाचे महत्व अधोरेखित होणार आहे.

Museums and Tourism development

The importance of museums in tourism development is unique. Both museums and tourism development are mutually complementary. Many scholars have given various definitions of museum. UNESCO defines a museum as follows, “The instruments used for the study, preservation and other protection of the common people and the structure for the enjoyment of the public is called a museum”. It is called a museum.

History of museums:- There were no museums in ancient or medieval India as they are in modern times. But in Rajprasada many rare, valuable and artistic objects of the royal family were collected. In early Europe, some amateurs or rich people used to collect artistic and valuable objects and exhibit them in special ceremonies. After the establishment of British rule, the creation of museums in India began in real terms. Museums play an important role in preserving history, tradition and culture and passing it on to the next generation.

Types of Museums 

Museums are classified according to the type of objects stored in the museum. In modern times, the scope of the museum has increased tremendously.

Some types of museums are as follows-

History Museum

Archaeological Museum

  Art Museum

  Handicraft Museum

  Textile Museum

  Weapons Museum

  Classical Museum

  Tribal Museum.

Many types of museums are emerging in recent times. In India, the Prime Minister’s Museum is established in New Delhi.

Famous  Museums in India

There are many famous and popular museums in India located in different states. Some of those objects museums are as follows,

National Museum, New Delhi

Indian Museum, Kolkata

Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Mumbai

Salarjung Museum, Hyderabad

Government Museum, Chennai

Albert Hall, Jaipur

Napier Museum, Thiruvananthapuram

Site Museums developed by Archaeological Survey of India- e.g. Lothal and Dholavira-Gujarat, ancient Nalanda University- Bihar,Hampi- Karnataka, Khajuraho-Madhya Pradesh

Top Artifacts Museums in Maharashtra

Maharashtra has about 150 Artifacts Museums in various cities. Some of those museums are as follows,

Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Mumbai

Dr. Bhau Daji Lad Museum, Mumbai

Raja Dinkar Kelkar Object Museum, Pune

Central Museum, Nagpur

Soneri Mahal Artifacts Museum, Aurangabad

Ramalingappa Lamture Museum, Ter, District Osmanabad

Town Hall Museum ,Kolhapur

Shri Bhavani Museum, Aundh, District Satara

Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Satara

Armoury Museum, New Palace ,Akkalkot

Contribution of object museum in tourism development

Western countries have long recognized the importance of museums in tourism development. There are around two hundred museums in Europe, especially in the city of Paris alone. Apart from this, a large number of object museums have been created in London and Rome. Tourists visiting these cities must visit the museums here. In India, the Department of Tourism and the Department of Archeology should coordinate efforts to attract tourists to the museums. This will highlight the importance of tourism development and museum