बृहदेश्वर मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथे असून युनेस्कोने1987 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून याला मान्यता दिली आहे. बृहदेश्वर मंदिर कावेरी नदीच्या काठावर बांधलेले आहे.  हे एक सांस्कृतिक वारसा पर्यटन स्थळ असून देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देतात. बृहदेश्वर मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून शिल्पकला, स्थापत्य कला, मूर्ती कला, चित्रकला यासाठी जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

बृहदेश्वर मंदिराचा इतिहास बृहदेश्वर मंदिर चोल घराण्यातील राज राजेश्वर प्रथम यांनी इसवी सन 1010 मध्ये बांधले. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सात वर्ष लागली. तामिळ भाषेमध्ये या मंदिराला तंजई पेरिया कोविल (तंजावरचे मोठे मंदिर)असेही म्हणतात. बृहदेश्वर मंदिर चोल घराण्यातील राजांनी बांधले असले तरी पुढील काळात पांड्य, नायक, विजयनगर आणि मराठा घराण्यातील राजांनी या मंदिराचा अनेक वेळा जिर्णोद्धार केलेला आहे; तसेच नवीन वास्तूंची भर घातली आहे. येथील एक गोपूर मराठा गेट म्हणूनच ओळखले जाते.

Brihadeshwara Temple Thanjavur Live Location https://goo.gl/maps/HhSrxr7NTcQztWKBA

बृहदेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये- स्थापत्य कला– बृहदेश्वर मंदिर द्राविड  स्थापत्य शैली मध्ये बांधलेले आहे. मंदिराची रचना गर्भगृह (विमान), अंतराळ, महामंडप, मुखमंडप आणि नंदी मंडप याप्रमाणे आहे. मुख्य मंदिराच्या पूर्व दिशेला  मंदिराच्या शिखराच्या अर्ध्या उंचीचे गोपूरम आहे. गोपूरम म्हणजे स्वागत कमान असते. मुख्य मंदिराच्या प्रांगणात विविध राजवटींच्या काळात अनेक छोटी मोठी मंदिरे बांधलेली आहेत. मंदिराच्या शिखरावर 13 मजले असून त्याची उंची 208 फूट इतकी आहे. मंदिराच्या शिखरावरील कळस स्तुपी 80 टन वजनाची असून ती तेवढ्या उंचीवर नेऊन बसविणे म्हणजे प्राचीन भारतातील स्थापत्य कला किती प्रगत होती हे स्पष्ट होते. मुख्य मंदिरातील गर्भगृहामध्ये भव्य आकाराचे शिवलिंग आहे. मुख्य गर्भगृहातील शिवलिंग आधी स्थापन करून मग मंदिर बांधण्यात आले असा उल्लेख शिलालेखात मिळतो. मुख्य गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्भगृहात पार्वती, कार्तिकेय(मुरुगन), गणपती यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मुखमंडपासामोर असलेल्या नंदी मंडपामध्ये भव्य आकाराचा बसलेला नंदी आहे. एका अखंड दगडी शिळे मध्ये नंदी कोरलेला आहे. भारतातील सर्वात उंच नंदी मध्ये येथील नंदीचा दुसरा क्रमांक लागतो. संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी ग्रॅनाईट दगडाचा वापर केलेला आहे.

Brihadeshwara Temple-Thanjavur
Brihadeshwara Temple-Thanjavur

बृहदेश्वर मंदिरातील शिल्पकला व मूर्तिकला– बृहदेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर शिवाच्या विविध रूपातील मूर्ती बसवलेले आहेत. त्यामध्ये लिंगोद्भव, पाशुपत मूर्ती, भिक्षाटन मूर्ती, वीरभद्र मूर्ती, दक्षिणामूर्ती, कालांतक मूर्ती, नटराज मूर्ती, हरिहर, चंद्रशेखर, गंगाधर शिव, आलिंगन मूर्ती या मूर्तींचा समावेश होतो. मुखमंडपामध्ये अष्ट दिक्पाल-आठ दिशांच्या देवता यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय सप्तमातृका, गणेश, मुरुगन, सूर्य, चंद्र यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंतीवर नाट्यशास्त्रातील जवळपास 81 नृत्य मुद्रा अभिनय करीत असलेल्या नर्तकींच्या मूर्ती कोरलेले आहेत.

Gopuram-Brihadeshwara Temple
Gopuram-Brihadeshwara Temple

बृहदेश्वर मंदिरातील भित्तिचित्रे– बृहदेश्वर मंदिराच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंगांचा वापर करून काढलेली भित्तिचित्रे चोलकालीन चित्रकलेचे वेगळेपण स्पष्ट करतात. या चित्रांसाठी फ्रेस्को तंत्र पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. एका चित्रामध्ये राजगुरू वटवृक्षाखाली ध्यानाला बसले आहेत आणि झाडावर मोर, विविध पक्षी, माकडे,साप आणि नाग यांचे मोठे चित्र काढलेले आहे. आणि दुसऱ्या बाजूला विविध अलंकार, Shaving, वेशभूषा, परिधान केलेल्या नर्तकी विविध प्रकारच्या नृत्य मुद्रेमध्ये दाखविलेले आहेत. मंदिराच्या छतावर, स्तंभांवर चित्रे काढलेली आहेत. यातील बरीच चित्रे काळाच्या ओघात खराब झाली आहेत. एका चित्रामध्ये राज राजेश्वर प्रथम आणि त्यांचे गुरु यांना चित्रित करण्यात आले आहे. ही सर्वच चित्रे अतिशय प्रेक्षणीय आहेत.

Mural-Brihadeshwara Temple
Mural-Brihadeshwara Temple

बृहदेश्वर मंदिरातील कोरीव लेख– बृहदेश्वर मंदिरातील भिंतीवर खूप मोठ्या प्रमाणात शिलालेख आहेत. भारतातील इतर कोणत्याही मंदिरांमध्ये इतके शिलालेख नाहीत. या भिंतीवर चोल राजा राज राजेश्वर प्रथम याचे 64 शिलालेख आहेत तर राजेंद्र चोल याचे 29 शिलालेख आहेत याशिवाय चोल घराण्यातील इतर राजांचेही शिलालेख यामध्ये आहेत. याशिवाय पांड्य आणि नायक राजांचेही शिलालेख या मंदिराच्या भिंतीवर आहेत. हे सर्व लेख तामिळ आणि संस्कृत भाषेमध्ये आहेत. बहुतेक सर्व शिलालेख हे दानपत्र आहेत. एका शिलालेखात मंदिरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱी, पुजारी व इतर सेवक यांची नावे दिलेली आहेत. मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या देवदासी, संन्यासी, मंदिरामध्ये येणारे भाविक यांच्यासाठी अन्नदान करण्यासाठी तसेच विविध सण उत्सवामध्ये होणाऱ्या खर्चासाठी केलेल्या दानांचा उल्लेख या शिलालेखांमध्ये आहे.

Top View-Brihadeshwara Temple
Top View-Brihadeshwara Temple

बृहदेश्वर मंदिराचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व– तंजावरचे बृहदेश्वर मंदिर जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केले आहे. प्राचीन भारतीय स्थापत्य कला तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. चोल घराण्यातील राजांनी बृहदेश्वर मंदिर बांधताना त्यावेळेसच्या प्रगत स्थापत्य आणि तंत्रज्ञानाचा वापर केला होता. द्राविड स्थापत्य शैलीतील हे एक उत्तम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिराचा प्रचंड विस्तार आणि त्याची भव्यता, सुशोभित गोपुरे, मंदिरावरील शिल्पकला, मूर्ती कला आणि चित्रकला  देश विदेशातील पर्यटक, वारसा प्रेमी, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारे संशोधक यांना नेहमीच आकर्षित करते.

पर्यटकांसाठी सोयीसुविधा तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी स्थानिक आणि विदेशी पर्यटकांसाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मंदिराचा इतिहास, स्थापत्य कला, शिल्पकला, भित्तिचित्रे यांची माहिती देणारे तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आहेत याशिवाय ऑडिओ गाईडची ही सोय या ठिकाणी आहे मंदिराचा प्रचंड विस्तार असल्यामुळे पर्यटकांना काही ठराविक अंतरावर विश्रांती घेण्यासाठी बैठक व्यवस्था व उद्यान विकसित करण्यात आले आहेत पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी माहिती केंद्र आहे ज्यामध्ये मंदिरातील कार्यक्रम सण उत्सव यांची माहिती दिली जाते तसेच बृहदेश्वर मंदिराची माहिती देणाऱ्या सर्व भाषेतील पुस्तिका विक्री केंद्र या ठिकाणी आहेत मंदिरातील काही ठराविक भाग सोडल्यास इतर स्थळांची फोटोग्राफी करण्यास परवानगी दिली जाते भारताचा समृद्ध वारसा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या विदेशी पर्यटकांना वरील प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे एक सुखद आणि संस्मरणीय अनुभव मिळतो

तंजावर परिसरातील इतर पर्यटन स्थळे बृहदेश्वर मंदिर तंजावर परिसरात इतरही अनेक पर्यटन स्थळे आहेत तंजावर पॅलेस या ठिकाणी एक वस्तू संग्रहालय आहे त्यामध्ये चोल काळातील अनेक वस्तू तसेच प्रसिद्ध चोला ब्रांझ शिल्प आणि मूर्ती ठेवलेल्या आहेत सरस्वती महाल तंजावरच्या राजवाड्यामध्येच हे ग्रंथालय असून यामध्ये तामिळ संस्कृत मोडी मधील प्राचीन ग्रंथ कागदपत्रे जतन करण्यात आलेली आहेत गंगईकोंडा चोलापूरम तंजावर पासून 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे या ठिकाणी चोल राजा राजेंद्र प्रथम याने बांधलेले अप्रतिम मंदिर आहे. उत्तर भारतात गंगा नदीच्या काठावरील राज्यांवर विजय मिळवल्या प्रित्यर्थ हे मंदिर राजेंद्र प्रथम यांनी बांधले होते. याशिवाय दारासुरम ऐरावतेश्वर मंदिर(35कि.मी.), कुंभकोणम मंदिर(40कि.मी.) इत्यादी पर्यटन स्थळांना देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

Brihadeshwar Temple Thanjavur : Amazing cultural tourist destination

The Brihadeshwar Temple is located in Thanjavur in Tamil Nadu and was recognized as a World Heritage Site by UNESCO in 1987. Brihadeshwar Temple is built on the banks of Kaveri river. It is a cultural heritage tourist spot and tourists from home and abroad visit this place in large numbers. Brihadeshwar temple is unique and is a center of attraction for tourists from all over the world for its sculpture, architecture, idol art, painting.

History of Brihadeshwar Temple Brihadeshwar Temple was built in 1010 AD by King Rajeshwar I of the Chola dynasty. It took seven years to complete the construction of the temple. In Tamil, this temple is also known as Tanjai Periya Kovil (Great Temple of Thanjavur). Although the Brihadeshwar temple was built by the kings of the Chola dynasty, the temple was renovated several times by the kings of the Pandya, Nayak, Vijayanagara and Maratha dynasties in the following period; New buildings have also been added. A gopur here is known as Maratha Gate.

Features of Brihadeshwar Temple- Architecture- Brihadeshwar temple is built in Dravidian style of architecture. The structure of the temple consists of sanctum sanctorum (plane), antarala, mahamandapa, mukhamandapa and nandi pavilion. To the east of the main temple is a gopuram half the height of the temple peak. Gopuram means welcome arch. In the courtyard of the main temple there are many small and big temples built during different dynasties. The peak of the temple has 13 floors and its height is 208 feet. The kalas stupi at the top of the temple weighs 80 tons and to carry it to such a height shows how advanced the architecture of ancient India was. The sanctum sanctorum in the main temple has a magnificent Shivalinga. The inscription mentions that the Shivalinga in the main sanctum was installed first and then the temple was built. The idols of Parvati, Kartikeya (Murugan), Ganapati are installed in the sanctum on either side of the main sanctum sanctorum. The Nandi Mandapa in front of the Mukha Mandapa has a grand size seated Nandi. Nandi is carved into an intact stone slab. The Nandi here ranks second among the tallest Nandis in India. Granite stone has been used to build the entire temple.

Sculptures and Sculptures in Brihadeshwar Temple- On the outer wall of the sanctum sanctorum of Brihadeshwar temple, idols of Lord Shiva in various forms are installed. They include Lingodbhava, Pashupat idol, Bhikshatana idol, Virbhadra idol, Dakshina idol, Kalantaka idol, Nataraja idol, Harihara, Chandrashekhar, Gangadhar Shiva, Aalingan idol. In the Mukhamandapa there are idols of Ashta Dikpala-the deities of the eight directions. Apart from this, there are idols of Saptamatrika, Ganesha, Murugan, Surya, Chandra. The walls of the temple are carved with idols of dancers performing around 81 dance postures of Natya Shastra.

Brihadeshwar Temple Murals- The frescoes on the walls of Brihadeshwar temple using natural colors illustrate the uniqueness of Chola painting. Fresco technique has been used for these paintings. In one picture, the king is meditating under a banyan tree and the tree has a large picture of peacocks, various birds, monkeys, snakes and snakes. And on the other side dancers wearing various ornaments, shaving, costumes, are shown in various dance postures. Paintings are done on the roof of the temple, on the pillars. Many of these paintings have deteriorated over time. One painting depicts Raj Rajeshwar I and his Guru. All these pictures are very spectacular.

Carvings in Brihadeshwar Temple- Brihadeshwar Temple has a large number of inscriptions on its walls. No other temple in India has so many inscriptions. This wall has 64 inscriptions of the Chola king Raja Rajeshwar I and 29 inscriptions of Rajendra Chola besides inscriptions of other kings of the Chola dynasty. Apart from this, there are also inscriptions of Pandya and Nayak kings on the walls of this temple. All these articles are in Tamil and Sanskrit language. Most of the inscriptions are donation letters. An inscription mentions the names of workers, priests and other servants working in the temple. These inscriptions mention the donations made for the Devadasis who danced in the temple, the sannyasins, the food for the devotees coming to the temple as well as the expenses incurred during various festivals.

Importance of Brihadeshwar Temple in terms of tourism- Brihadeshwar Temple of Thanjavur has been declared as a World Heritage Site by UNESCO. It is a major tourist destination with ancient Indian architecture as well as historical and cultural importance. The kings of the Chola dynasty used the advanced architecture and technology of the time while building the Brihadeshwar temple. It is a fine example of Dravidian architectural style. Brihadeshwar Temple’s huge expanse and its magnificence, ornate gopuras, temple sculptures, idol art and paintings always attract tourists, heritage lovers, researchers studying Indian culture from home and abroad.

Tourist Facilities All kinds of facilities are available at this place for local and foreign tourists to visit Brihadeshwar Temple in Thanjavur. There are expert guides who provide information about the history, architecture, sculptures, murals of the temple, apart from this the facility of audio guide is also available at this place due to the vast expanse of the temple, tourists can rest at certain intervals.

Meeting facilities and gardens have been developed for this purpose.Through the tourism department, there is an information center at this place which provides information about the events and festivals of the temple.Also there is a sales center selling brochures in all languages providing information about the Brihadeshwar temple. Foreign tourists eager to see India’s rich heritage can enjoy a pleasant and memorable experience with all the above facilities

Other Tourist Places in Thanjavur Area Brihadeshwar Temple There are many other tourist places in Thanjavur area Thanjavur Palace is an artefacts museum in this place which houses many objects of the Chola period as well as famous Chola bronze sculptures and idols Saraswati Mahal is a library inside the Thanjavur palace which contains ancient texts in Tamil Sanskrit Modi. Documents have been preserved Gangaikonda Cholapuram is a place 70 km from Thanjavur where there is a magnificent temple built by the Chola king Rajendra I. The temple was built by Rajendra I in honor of his conquest of the kingdoms along the banks of the river Ganga in northern India. Apart from this, tourists also visit Darasuram Airavateshwar Temple (35 km), Kumbakonam Temple (40 km) etc. in large numbers