पट्टदकल भारतातील कर्नाटक राज्यात असून मलप्रभा नदीच्या काठावर वसलेले प्राचीन शहर आहे. या ठिकाणी चालुक्य घराण्यातील राजांनी द्राविड, नागर आणि वेसर स्थापत्य शैलीतील कलात्मक मंदिरे बांधली आहेत. पट्टदकल येथे विविध शैलीत बांधलेल्या मंदिरांचा समूह आहे. पट्टदकल या स्थळाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी प्रामुख्याने हिंदू मंदिरे आहेत.पट्टदकल येथील मंदिर वास्तू कला आणि शिल्पकला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. याशिवाय पट्टदकल परिसरात ऐहोळे आणि बदामी ही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.

ऐतिहासिक महत्त्व आणि वैशिष्ट्ये पट्टदकल शहराला स्थानिक कन्नड भाषेत पट्टदकल्लू असे म्हणतात. पट्टदकल उत्तर चालुक्यांचे राजधानीचे शहर होते. चालुक्यकाळात हे स्थळ धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेचे प्रमुख केंद्र होते. हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या ठिकाणी द्राविड, नागर आणि इतर स्थापत्यशैली मधील मंदिरे एकाच ठिकाणी पहावयास मिळतात. पट्टदकल येथील सर्वच मंदिरे वास्तू कला आणि शिल्पकला यांच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील मंदिर समूहातील विरूपाक्ष मंदिर सर्वात प्रेक्षणीय आहे. काही मंदिरांवर कन्नड, संस्कृत आणि इतर भाषेतील शिलालेख आहेत. त्यातून चालुक्य घराण्याची माहिती मिळते.पट्टदकल Live Location- https://goo.gl/maps/8ApHyMM6p5prP5i26

पट्टदकल येथील मंदिर समूह– येथील मंदिर समूहात वीरूपाक्ष मंदिर, संगमेश्वर मंदिर, पापनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर,  गलंगनाथ मंदिर, जम्बुलिंग मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. वीरूपाक्ष मंदिर – पट्टदकल येथील निरुपाक्ष मंदिर द्रविड शैलीतील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे शिवमंदिर  चालुक्य घराण्यातील राजा विक्रमादित्य द्वितीय याची पत्नी लोक महादेवी हिने इसवी सन आठव्या शतकामध्ये  बांधले आहे. गर्भगृह,सभा मंडप, मुख्य मंडप आणि नंदी मंडप अशी या मंदिराची रचना आहे. गर्भ गृहावरील शिखर (विमान)याची पिरॅमिड सारखी रचना आहे. शिखरावर अनेक शिल्पपट आणि देव देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे शिखराचे सौंदर्य वाढले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण,महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारित अनेक शिल्पपट आणि देव देवतांच्या प्रतिमा आहेत. सभा मंडप आणि मुख्य मंडपाच्या आतील बाजूस असलेल्या स्तंभांवर कोरीव नक्षीकाम, शिल्पकाम तसेच नृत्य करीत असलेले  नर्तकी, वाद्य वाजवणारे वादक कोरलेले आहेत. मंदिराचे छत आकर्षक नक्षीकाम आणि शिल्पकामाने सजवलेले आहे. पट्टदकल येथील वीरूपाक्ष मंदिरामध्ये शिल्पकला आणि वास्तुकला यांचा अपूर्व संगम पहावयास मिळतो.

Temple Group at Pattadakal
Temple Group at Pattadakal

संगमेश्वर मंदिर– पट्टदकल येथील मंदिर समूहातील हे एक  शिवमंदिर आहे. द्राविड आणि नागर स्थापत्य शैलीचे मिश्रण या मंदिराच्या वास्तुकलेत आणि शिल्पकलेमध्ये दिसून येते.   पापनाथ मंदिर– पट्टदकल येथील पापनाथ मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिल्पकाम आणि मूर्तीकाम प्रेक्षणीय आहे. मल्लिकार्जुन मंदिर– पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर परिपूर्ण द्राविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर शिवपुराणातील शिल्पपट पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याशिवाय काशी विश्वेश्वर मंदिर आणि गलंगनाथ मंदिर ही दोन शिव मंदिरे पट्टदकल मंदिर समूहात आहेत. गलंगनाथ मंदिर आकाराने छोटे असून त्याचे शिखर (विमान) उंच आहे. जम्बुलिंग मंदिर-पट्टदकल येथील मंदिर समूहात हे एकमेव नागरशैलीतील शिवमंदिर आहे.

पट्टदकल परिसरातील  पर्यटन स्थळे– पट्टदकल पासून चौदा किलोमीटर अंतरावर ऐहोळे आणि 22 किलोमीटर अंतरावर बदामी लेणी आहेत. पट्टदकल येथे आलेले पर्यटक आवर्जून या दोन्ही स्थळांना भेट देतात.

Durga Temple at Aihole
Durga Temple at Aihole

ऐहोळे येथे चालुक्य काळातील शंभर पेक्षा जास्त हिंदू मंदिरे, काही जैन मंदिरे आणि एक बौद्ध मंदिर आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून 16 मंदिरे चांगल्या स्थितीत जतन करण्यात आली आहेत. तसेच येथे चार लेणी मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे द्रविड, नागर आणि चालुक्य स्थापत्य शैलीमध्ये बांधलेली आहेत. या परिसरात शिव, विष्णू ,दुर्गा आणि सूर्य इत्यादी देव देवतांची मंदिरे आहेत. Aihole Live Location – https://goo.gl/maps/EMkbzQT9ujU7JjyB9 येथील दुर्गा मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. ऐहोळे येथील जैन मंदिरांमध्ये महावीर,पार्श्वनाथ,नेमिनाथ आणि इतर तीर्थकारांच्या मूर्ती आहेत.या परिसरात एक बौद्ध मंदिर आणि छोट्या आकाराचे विहार आहे.ऐहोळे येथील मंदिर समूहातील मंदिरे तसेच लेणी इसवी सन चौथ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत बांधलेली  आहेत. चालुक्य घराण्याचा हा समृद्ध संस्कृतीत वारसा पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतात.

Badami Caves-Karnataka
Badami Caves-Karnataka

बदामी लेणी– बदामी शहराचे प्राचीन नाव वातापी असे होते. पूर्व चालुक्यांच्या राजधानीचे हे प्रमुख केंद्र होते. या ठिकाणी चार लेणी आहेत. Badami Live Location – https://goo.gl/maps/ZbrddtrwgNoa1cabA त्यापैकी दोन लेणी वैष्णव पंथाच्या एक लेणे शैव पंथाचे आणि एक लेणे जैन धर्माचे आहे. येथील लेणी क्रमांक एक च्या भिंतीवर असलेली नटराजाची प्रतिमा पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या प्रतिमेमध्ये नृत्य कलेतील अनेक मुद्रा स्पष्ट होतात. बदामी येथील क्रमांक दोन आणि तीन लेणी वैष्णव पंथांच्या आहेत. यामध्ये पुराणकथांवर आधारित विष्णूच्या वराह,नरसिंह आणि इतर स्वरूपातील प्रतिमा आणि कथाशिल्प आहेत .येथील लेण्यांच्या छतावर काढलेली फ्रेस्को पद्धतीची चित्रे उल्लेखनीय आहेत. बदामी येथील चौथ्या क्रमांकाचे लेणे जैन लेणे आहे. यामध्ये वर्धमान महावीर आणि इतर तीर्थकारांच्या मूर्ती आहेत.याशिवाय बदामी येथे बनशंकरी देवीचे मंदिर आहे. तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विकसित केलेले वस्तूसंग्रहालय आहे.या वस्तुसंग्रहालयात चालुक्य काळातील विविध देवदेवतांच्या मूर्ती, शिलालेख, वीरगळ, चालुक्य घराण्यातील राजांनी चलनात आणलेली नाणी तसेच या परिसरात आढळलेले अनेक पुरातत्वीय अवशेष ठेवलेले आहेत. संशोधक व इतिहास प्रेमी पर्यटक आवर्जून या वस्तू संग्रहालयाला भेट देतात.

Jain Caveat Badami
Jain Caveat Badami

पर्यटकांसाठी सोयीसुविधा– पट्टदकल हे कर्नाटकातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथील मंदिरे ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत. पर्यटकांना या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पट्टदकल तसेच बदामी येथे पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या प्रतीचे हॉटेल्स,लॉज आणि अतिथी गृह आहेत. येथील स्थळांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे मार्गदर्शक उपलब्ध आहेत. तसेच येथील पर्यटन स्थळांची माहिती असलेली पुस्तिका, नकाशे पर्यटकांसाठी उपयुक्त ठरतात.पट्टदकल पासून जवळचे विमानतळ हुबळी आणि बदामी येथे रेल्वे स्टेशन आहे. टॅक्सी, बस सारख्या खाजगी वाहनाने सुद्धा पट्टदकल, ऐहोळे आणि बदामी येथे जाता येते.

सारांश– पट्टदकल या स्थळाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे.पट्टदकल येथील मंदिरांची वास्तूकला आणि शिल्पकला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.पट्टदकल उत्तर चालुक्यांचे राजधानीचे शहर होते.चालुक्यकाळात हे स्थळ धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेचे प्रमुख केंद्र होते.या ठिकाणी द्राविड, नागर आणि इतर स्थापत्यशैलीमध्ये मंदिरे एकाच ठिकाणी पहावयास मिळतात. पट्टदकल परिसरात ऐहोळे आणि बदामी या दोन पर्यटन स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात.

Pattadakal, Aihole, Badami: Rich cultural heritage

Pattadakal is an ancient city located on the banks of the Malaprabha River in the Indian state of Karnataka. Chalukya kings built artistic temples in Dravidian, Nagar and Vesar architectural styles at this place. Pattadakal has a cluster of temples built in various styles. Pattadakal has been recognized as a World Heritage Site by UNESCO. There are mainly Hindu temples in this place. The temple architecture and sculpture at Pattadakal is a major tourist attraction. Apart from this, Aihole and Badami are popular tourist destinations in Pattadakal area.

Historical Significance and Characteristics The town of Pattadakal is called Pattadakallu in the local Kannada language. Pattadakal was the capital city of the Northern Chalukyas. The site was a major religious, cultural and architectural center during the Chalukya period. It is a world heritage site. Temples of Dravidian, Nagar and other architectural styles can be seen at one place. All the temples in Pattadakal are unique in terms of architecture and sculpture. The Virupaksha temple is the most spectacular of the group of temples here. Some temples have inscriptions in Kannada, Sanskrit and other languages. It gives information about the Chalukya dynasty. Pattadakal Live Location- https://goo.gl/maps/8ApHyMM6p5prP5i26

Temple Group at Pattadakal- The temple group here consists of Veerupaksha Temple, Sangameshwara Temple, Papanath Temple, Mallikarjuna Temple, Kashi Vishweshwar Temple, Galanganath Temple, Jambulinga Temple etc. Veerupaksha Temple – The Nirupaksha Temple at Pattadakal is an excellent example of the Dravidian style. This Shiva temple was built by Lok Mahadevi, the wife of King Vikramaditya II of the Chalukya dynasty, in the eighth century AD. The structure of this temple consists of sanctum sanctorum, assembly mandap, main mandap and Nandi mandap. The sikhara (viman) on the Garbha Griha has a pyramid-like structure. There are many sculptures and idols of gods and goddesses on the peak. This has increased the beauty of the peak. On the outer wall of the temple there are many sculptures and images of gods and goddesses based on Ramayana, Mahabharata and mythology. The pillars on the inside of the assembly mandap and the main mandap are carved with carvings, sculptures as well as dancing dancers and musicians playing musical instruments. The ceiling of the temple is decorated with attractive carvings and sculptures. Veerupaksha Temple at Pattadakal offers a unique fusion of sculpture and architecture.

Sangameshwara Temple- This is one of the Shiva temples in the group of temples at Pattadakal. A blend of Dravidian and Nagar architectural styles can be seen in the architecture and sculpture of this temple. Papnath Temple- The exterior wall of Papnath Temple at Pattadakal is spectacular with sculptures and idols. Mallikarjuna Temple- The Mallikarjuna Temple at Pattadakal is built in perfect Dravidian architectural style. The Shiv Purana sculpture on the temple wall is a tourist attraction. Apart from this, Kashi Vishweshwar Temple and Galanganath Temple are two Shiva temples in the Pattadakal temple group. Galangnath temple is small in size and its spire (viman) is high. Jambuling Temple-This is the only urban style Shiva temple in the group of temples at Pattadakal.

Aihole has more than a hundred Hindu temples dating back to the Chalukya period, a few Jain temples and one Buddhist temple. 16 temples have been preserved in good condition by Archaeological Survey of India. There are also four cave temples here. All these temples are built in Dravidian, Nagar and Chalukya style of architecture. There are temples of Lord Shiva, Vishnu, Durga and Surya etc. in this area. Durga Temple at Aihole Live Location – https://goo.gl/maps/EMkbzQT9ujU7JjyB9 is a special tourist attraction. The Jain temples at Aihole have idols of Mahavir, Parswanath, Neminath and other pilgrims. There is a Buddhist temple and a small vihara in the area. The temples and caves in the Aihole temple complex are built from the 4th century to the twelfth century AD. Tourists from all over the country come here in large numbers to witness this rich cultural heritage of the Chalukya dynasty.

Badami Caves- The ancient name of Badami city was Vatapi. It was the main center of the capital of the Eastern Chalukyas. There are four caves in this place. Badami Live Location – https://goo.gl/maps/ZbrddtrwgNoa1cabA Among them two caves belong to Vaishnava sect, one cave belongs to Shaiva sect and one cave belongs to Jainism. The image of Nataraja on the wall of cave number one here attracts the attention of tourists. This image illustrates many dance postures. Caves number two and three at Badami belong to the Vaishnava sect. It has images and narrative sculptures of Vishnu in Varaha, Narasimha and other forms based on mythology. The frescoes on the ceilings of the caves here are remarkable. The fourth largest cave in Badami is the Jain Cave. It has idols of Vardhaman Mahavir and other pilgrims. Apart from this there is a temple of Banashankari Devi at Badami. Also, there is a museum developed by the Archaeological Survey of India. The museum houses statues of various gods and goddesses of the Chalukya period, inscriptions, Veergals, coins issued by the kings of the Chalukya dynasty and many archaeological remains found in the area. Researchers and history buffs visit this museum without fail.