खजुराहो मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात विंध्य पर्वतरांगेत वसलेले आहे. चंदेल घराण्यातील राजांनी 9 ते 12 व्या शतकात खजुराहो शिल्पकला आणि वास्तुकला यांनी सजवलेली जवळपास 85 मंदिरे  बांधली. 1986 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून खजुराहोला मान्यता दिली आहे. खजुराहो येथील मंदिरावरील मिथुनशिल्प किंवा कामशिल्प पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत. खजुराहो येथे  हिंदू आणि जैन  मंदिरे आहेत याशिवाय 64 योगिनी मंदिर देखील प्रसिद्ध आहे.

शिल्पकलेचा समृद्ध वारसा- खजुराहो https://goo.gl/maps/hBpZZdL1zP31LHyV8 येथील मंदिरांवर अप्रतिम शिल्पकाम. मूर्तिकला ,सुंदर नक्षीकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली पहावयास मिळते.  मंदिरावरील भिंतीवर पौराणिक कथाशिल्प, विविध देवदेवता ,प्राणी जीवन, सर्वसामान्यांचे जीवन  कलाकारांनी मोठ्या कौशल्याने अविष्कृत केले आहे. मंदिरा वरील मिथुन शिल्प किंवा कामशिल्प येथील एकूण शिल्पकलेच्या फक्त दहा टक्के आहेत. खजुराहो येथील मंदिरांवर इतक्या मोठ्या प्रमाणात शिल्पकाम केलेले आहे की, त्या गर्दीमध्ये मिथुन शिल्प शोधावी लागतात. प्राचीन भारतीय समाजात चार पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) यांना विशेष महत्त्वाचे स्थान होते. हे चार पुरुषार्थ शिल्पकथेच्या माध्यमातून खजुराहो येथील मंदिरांच्या भिंतीवर साकार करण्यात आले आहेत. चारही पुरुषार्थ शिल्पकथेतून प्रभावीपणे दाखविण्याचा प्रयत्न कलाकारांनी उत्कृष्टपणे केला आहे. प्राचीन भारतीय समाज जीवनात आदर्श मानलेले चार पुरुषार्थ समजून घेण्यासाठी तरुण पर्यटकांनी खजुराहोला आवश्यक भेट दिली पाहिजे.

Kandariya Mahadev Temple-Khajuraho
Kandariya Mahadev Temple

इतिहास– खजुराहो येथील मंदिरे चंदेल घराण्यातील यशोवर्धन धांग, विद्याधर इत्यादी राजांनी ही मंदिरे बांधलेली आहेत. येथील मंदिरांचे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण असे तीन विभाग आहेत. अल् बेरूणी,इब्न बतुता या परकीय प्रवाशांनी खजुराहो मंदिरांना भेट दिली होती. पंधराव्या शतकानंतर घनदाट जंगल वाढल्यामुळे सर्वसामान्यांपासून दुर्लक्षित राहिली.एफ.सी.मैसे या ब्रिटिश चित्रकाराने 1852 मध्ये खजुराहो येथील मंदिराची सर्वप्रथम रेखाचित्रे काढली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महानिर्देशक अलेक्झांडर कनिंगहम यांनी भेट दिली होती. खजुराहो येथे काही योगी उपासना करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव भरत असे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून खजुराहो येथे तांत्रिक पंथाचाही प्रभाव असल्याचे स्पष्ट होते.

Chausashta Yogini Temple
Chausashta Yogini Temple

Advertisements
REPORT THIS AD

खजुराहोची अद्वितीय वास्तुकला– खजुराहो येथे शैव पंथ, वैष्णव पंथ आणि जैन धर्माची मंदिरे आहेत. यामध्ये कंदारिया महादेव मंदिर, लक्ष्मण मंदिर, वैकुंठविष्णू मंदिर, वराह मंदिर महिषासुरमर्दिनी मंदिर, मातंगेश्वर मंदिर, विश्वनाथ मंदिर, विष्णू गरुड मंदिर, बीजमंडल मंदिर, गणेश, जगदंबी, चित्रगुप्त, वामन, जवेरी, चतुर्भुज आणि दुलादेव इत्यादी हिंदू देव देवतांची मंदिरे तसेच तांत्रिक पंथाचे 64 योगिनी मंदिर प्रसिद्ध आहेत. याशिवाय पार्श्वनाथ मंदिर, आदिनाथ मंदिर, शांतिनाथ मंदिर आणि घंटाई मंदिर ही जैन मंदिरे आहेत. खजुराहो येथे पूर्वी जवळपास 85 मंदिरे होती ; सध्या खजुराहो येथे जवळपास 25 मंदिरे सुस्थितीत आहेत. प्राचीन भारताचा हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात  खजुराहो येथे येतात.

Parshwanath Temple
Parshwanath Temple

कंदरिया महादेव मंदिर खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर 116 फूट उंच आणि 88 फूट रुंद चौथर्‍यावर बांधलेले आहे. मंदिरामध्ये पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिरावर जवळपास 870 शिल्प व मूर्ती आहेत. खजुराहो येथील मंदिर समूहातील कंदरिया महादेव मंदिर सर्वात आकर्षक आणि मोठे मंदिर आहे. चंदेल राजा विद्याधर याच्या काळात हे मंदिर बांधले गेले. गर्भगृह अंतराळ, महामंडप, मंडप आणि अर्धमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आहे. संपूर्ण मंदिर अंतर बाह्य शिल्पकलेनी सजवलेले आहे. मंदिरातील द्वारशाखा अतिशय सुशोभित आहेत. 64 योगिनी मंदिर– खजुराहो येथील मंदिर समूहात 64 योगिनी मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे आहे. या मंदिराचा आकार गोलाकार आहे.मंदिराच्या आतील भिंतीवर 64 देवकोष्ट (कोणाडे)केलेले असून त्यामध्ये 64 योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत.हे मंदिर तांत्रिक पंथाचे आहे.याशिवाय मंदिरांच्या भिंतीवर इतर देवदेवतांची व प्राण्यांची शिल्पे आहेत.

Erotic Sculptures-Khajuro
Erotic Sculptures-Khajuro

पर्यटकांसाठी सोयीसुविधा– खजुराहो येथील मंदिर समूहाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केल्यामुळे खजुराहो येथे पर्यटकांना राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे हॉटेल आणि लॉज उपलब्ध आहेत. भारतातील पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे आहेत. तसेच विदेशी पर्यटकांसाठी कॉन्टिनेन्टल फूड उपलब्ध आहे. खजुराहो चे ऐतिहासिक महत्व, शिल्पकाम व वास्तुकलेची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी विविध भाषेतून माहिती देणारे गाईड या ठिकाणी आहेत.खजुराहो तसेच परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहने, टॅक्सी,सायकल रिक्षा इत्यादी वाहने सहज उपलब्ध होतात. याशिवाय स्थानिक हस्तकला विक्री करणारे स्टॉल्स पर्यटकांना आकर्षित करतात.खजुराहो येथे पर्यटकांसाठी नृत्य आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यटकांना येथील पर्यटन स्थळांची माहिती, वाहतूक व्यवस्था आणि काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी पर्यटन माहिती केंद्र या ठिकाणी आहे. देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाच्या दृष्टीने हे एक सुरक्षित स्थळ आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे खजुराहो मंदिर समूहाचे जतन व संवर्धनाचे काम केले जात आहे मध्यप्रदेश शासन आणि भारतीय पर्यटन महामंडळाद्वारे पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम निरंतर चालू आहे.

खजुराहो परिसरातील  पर्यटन स्थळे– पन्ना नॅशनल पार्क (30 किमी),रानेह धबधबे(20किमी),अजय गड किल्ला (80 किमी) बेणेसागर धरण( 11 किमी) इत्यादी पर्यटन स्थळे खजुराहोच्या जवळपास आहेत. या ठिकाणी खाजगी वाहने तसेच टॅक्सीने जाता येते.

रेल्वेने: खजुराहो रेल्वे स्टेशन मुख्य शहरापासून पाच किमी अंतरावर आहे आणि मध्य प्रदेशातील काही शहरांशी जोडलेले आहे. महोबा हे खजुराहोपासून सर्वात जवळचे मोठे रेल्वेमार्ग आहे जे सुमारे 78 किमी अंतरावर आहे. महोबा येथून मथुरा, वाराणसी, मुंबई, कोलकाता, अलाहाबाद, जबलपूर, ग्वाल्हेर इत्यादी ठिकाणच्या गाड्या नियमित धावतात. विमानाने: मंदिराच्या ठिकाणापासून दोन किमी अंतरावर खजुराहोचे स्वतःचे देशांतर्गत विमानतळ आहे. यात दिल्ली, मुंबई, भोपाळ, वाराणसी इ.शी जोडलेली उड्डाणे आहेत. तुम्ही जवळच्या हॉटेल किंवा मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक कॅब भाड्याने घेऊ शकता. रस्त्याने: चांगल्या वाहतूक नेटवर्कसह, खजुराहोचे रस्ते सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांशी जोडलेले आहेत. खजुराहो येथून अनेक सार्वजनिक आणि खाजगी बसने झाशी सारख्या जवळच्या शहरांमध्ये प्रवास करतात. मानक बसेस, नॉन एसी आणि एसी बसेस नियमितपणे धावतात. तसेच, तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी तुमच्याकडे खाजगी कॅब भाड्याने घेण्याचा पर्याय आहे.

सारांश-1986 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून खजुराहोला मान्यता दिली आहे. खजुराहो येथील मंदिरावरील मिथुन शिल्प किंवा काम शिल्प पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहेत.येथील मंदिरांवर अप्रतिम शिल्पकाम. मूर्तिकला ,सुंदर  नक्षीकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली पहावयास मिळते.खजुराहो येथे शैव पंथ, वैष्णव पंथ आणि जैन धर्माची मंदिरे आहेत.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे खजुराहो मंदिर समूहाचे जतन व संवर्धनाचे काम केले जात आहे मध्यप्रदेश शासन आणि भारतीय पर्यटन महामंडळाद्वारे पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम निरंतर चालू आहे.प्राचीन भारतीय समाज जीवनात आदर्श मानलेले चार पुरुषार्थ समजून घेण्यासाठी तरुण पर्यटकांनी खजुराहोला आवश्यक भेट दिली पाहिजे.

हे पण वाचा-भारतीय समाज व्यवस्था https://incredibleheritage.com/2023/05/06/bharatiya-samaaj-vyavastha/

Khajuraho: UNESCO World Heritage Site in India

Khajuraho is situated in the Vindhya Range in the Chhattarpur district of Madhya Pradesh. The kings of the Chandel dynasty built around 85 temples decorated with Khajuraho sculpture and architecture between the 9th and 12th centuries. UNESCO has recognized Khajuraho as a World Heritage Site in 1986. Mithunshilp or Kamshilp on the temple in Khajuraho is a special attraction for tourists. Khajuraho has Hindu and Jain temples besides the famous 64 yogini temple.

Rich Heritage of Sculpture Khajuraho- Amazing sculptures on the temples. Sculptures, beautiful carvings and unique architectural style can be seen. On the walls of the temple, mythological sculptures, various gods and goddesses, animal life, the life of common people have been elaborated by artists with great skill. The Mithun sculpture or Kamashilp on the temple is only ten percent of the total sculpture at the temple. The temples at Khajuraho are so rich in sculptures that one has to find the Mithun sculptures in the crowd. The four Purusharthas (Dharma, Artha, Kama and Moksha) had a special place in ancient Indian society. These four Purusharthas have been realized on the walls of the temples in Khajuraho through sculpture. The artists have tried to show all the four men effectively through the sculpture story. Khajuraho is a must-visit for young tourists to understand the four purusharthas considered ideals in ancient Indian social life.

History- Temples in Khajuraho These temples were built by kings like Yashovardhan Dhang, Vidyadhar etc. of the Chandel dynasty. The temples here have three sections namely East, West and South. Foreign travelers like Al Beruni, Ibn Battuta visited the Khajuraho temples. After the 15th century, due to the growth of dense forest, it was overlooked by the general public. The British painter FC Maisse drew the first drawings of the temple at Khajuraho in 1852. After that, Director General of Archaeological Survey of India, Alexander Cunningham visited. He mentions that some yogis are worshiping at Khajuraho. Also, a big festival was held at this place on Mahashivratri. From the information given by him, it is clear that Tantric sect also had influence in Khajuraho.

Unique Architecture of Khajuraho- Khajuraho has temples of Shaivism, Vaishnava and Jainism. These include Kandaria Mahadev Temple, Lakshmana Temple, Vaikuntha Vishnu Temple, Varaha Temple, Mahishasuramardini Temple, Matangeshwar Temple, Vishwanath Temple, Vishnu Garuda Temple, Bijamandal Temple, Ganesha, Jagadambi, Chitragupta, Vamana, Javeri, Chaturbhuj and Duladeva etc. 64 yogini temples are famous. Apart from this, Parswanath Temple, Adinath Temple, Shantinath Temple and Ghantai Temple are Jain temples. Khajuraho used to have around 85 temples; Presently there are around 25 temples in good condition in Khajuraho. Tourists from all over the country come to Khajuraho in large numbers to see this historical and cultural heritage of ancient India.

Kandaria Mahadev Temple The Kandaria Mahadev Temple at Khajuraho is built on a 116 feet high and 88 feet wide square. One has to climb stairs in the temple. There are around 870 sculptures and idols on this temple. Kandaria Mahadev Temple is the most attractive and largest temple in the temple group at Khajuraho. This temple was built during the reign of Chandela king Vidyadhar. The structure of this temple consists of sanctum sanctorum, Mahamandapam, Mandapam and Ardhamandapam. There is a circular path around the sanctum sanctorum. The entire temple space is decorated with exterior sculptures. The doorways of the temple are very ornate. 64 Yogini Temple- 64 Yogini Temple is unique and unique among the group of temples at Khajuraho. The shape of this temple is circular. The inner wall of the temple has 64 devkoshtas (corners) and 64 idols of Yoginis are installed in them. This temple belongs to the Tantric sect. Apart from this, there are sculptures of other gods and goddesses and animals on the walls of the temple.

Tourist Facilities- As the temple complex of Khajuraho has been declared a World Heritage Site by UNESCO, hotels and lodges with all facilities are available for tourists to stay in Khajuraho. Traditional Indian food stalls are here. Continental food is also available for foreign tourists. There are guides in various languages to explain the historical importance of Khajuraho, sculpture and architectural features. Private vehicles, taxis, cycle rickshaws etc. are easily available to visit Khajuraho as well as the tourist places in the area. Apart from this, stalls selling local handicrafts attract tourists.Khajuraho organizes dance and music programs for tourists. There is a tourist information center at this place to provide information about the tourist places, transport arrangements and some important instructions to the tourists. It is a safe place for tourists from abroad. Conservation and conservation work of Khajuraho Temple Group is being done by Archaeological Survey of India, Government of Madhya Pradesh and Tourism Corporation of India are continuing to provide facilities for tourists.

Tourist places in Khajuraho area- Panna National Park (30 km), Raneh Falls (20 km), Ajay Gad Fort (80 km), Benesagar Dam (11 km) etc. are near Khajuraho. This place can be reached by private vehicles as well as by taxi.

By Rail: Khajuraho Railway Station is five km from the main city and central Q.It is connected to some cities in the country. Mahoba is the nearest major railway line from Khajuraho which is about 78 km away. Regular trains run from Mahoba to Mathura, Varanasi, Mumbai, Kolkata, Allahabad, Jabalpur, Gwalior etc. By Air: Khajuraho has its own domestic airport at a distance of two km from the temple site. It has connecting flights to Delhi, Mumbai, Bhopal, Varanasi etc. You can hire a local cab to reach the nearest hotel or temple. By Road: With a good transport network, Khajuraho’s roads are connected to all major national and state highways. Several public and private buses ply from Khajuraho to nearby cities like Jhansi. Standard buses, non AC and AC buses run regularly. Also, you have the option of hiring a private cab to reach your destination.

Summary-Khajuraho has been recognized as a World Heritage Site by UNESCO in 1986. Mithun Shilp or Kam Shilp on the temple in Khajuraho are the special attraction of the tourists. Amazing sculptures on the temples here. Sculptures, beautiful carvings and unique architectural style can be seen. Khajuraho has temples of Shaivism, Vaishnavism and Jainism. Conservation and conservation of Khajuraho temple complex is being done by Archaeological Survey of India, Government of Madhya Pradesh and Tourism Corporation of India are working to provide tourist facilities. Continued. To understand the four virtues considered ideal in ancient Indian society life, Khajuraho is a must-visit for young tourists.