महाबळेश्वर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय निसर्गरम्य थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून चार हजार पाचशे मीटर उंचीवर वसलेले आहे. सातारा ते महाबळेश्वर 50 किलोमीटर पुणे ते महाबळेश्वर 115 किलोमीटर मुंबई ते महाबळेश्वर 245 किलोमीटर आंतर आहे. महाबळेश्वर मध्ये आर्थर सीट पॉइट,इको पॉईंट ,वेण्णा लेक पॉईंट ,लिंगमळा वॉटर फॉल , फॉकलंड पॉईंट ,सन सेट पॉईंट, श्री महाबळेश्वर क्षेत्र, पंचगंगा मंदिर अशी जवळपास 30 प्रेक्षणीय स्थळे महाबळेश्वर मध्ये आहेत.

Mahabaleshwar Live Location https://goo.gl/maps/xxbL2zWTs6vDA6dL

महाबळेश्वर मध्ये काय पहाल? आर्थर सीट पॉइंट महाबळेश्वर मधील पर्यटकांचा लोकप्रिय पॉईंट आहे. या पॉइंटच्या एका  बाजूला खोल दरीतून कोकणात जाणारी सावित्री नदी आहे. तर दुसर्‍या बाजूला घनदाट जंगल आहे. या पॉईंटवरून महाबळेश्वरचा निसर्गरम्य परिसर आणि मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात. याच पॉईंटवरून रायगड किल्ला आणि तोरणा किल्ला पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण होते.

Mahabaleshwar,Satara
Monsoon View,Mahabaleshwar

ईको पॉईंट   महाबळेश्वर येथे आर्थर पॉईंट कडे  जाताना मार्गावरच इको पॉईंट आहे. निसर्गरम्य परिसर, उंच पर्वत रांगा, खोल दऱ्या आणि आरोग्यदायी वातावरण यामुळे पर्यटक या ठिकाणी सकाळी जाणे पसंत करतात.

वेण्णा लेक महाबळेश्वर येथे वेण्णा लेक सरोवराची निर्मिती सातारचे राजे श्रीमंत छत्रपती आप्पासाहेब महाराज यांनी एकोणिसाव्या शतकात केली. हे सरोवर सुमारे 28 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. बारमाही वाहणारे झरे यामुळे सरोवराचा परिसर फुलझाडांनी फुलला आहे. पावसाळ्यात वेण्णा सरोवरात पाण्याचा भरपूर साठा होतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर पर्यटनास अतिशय योग्य असा काळ असतो.

Venna Lake,Mahabaleshwar
Boating-Venna Lake, Mahabaleshwar

Advertisements
REPORT THIS AD

लिंगमळा वॉटरफॉल पाचगणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर वेण्णा सरोवराजवळ लिंगमळा आणि चिंतामण हे धबधबे पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतात.

सनसेट पॉईंट महाबळेश्वर मधील हा प्रसिद्ध पॉईंट असून याला बॉम्बे पॉईंट असेही म्हणतात. सर्व पर्यटक मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी एकत्र येतात.

फॉकलंड पॉईंट महाबळेश्वर येथे फॉकलँड पॉइटवरून कोयना नदीचे दर्शन होते.मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणीसुद्धा येतात. यावेळी अतिशय विहंगम आणि मनमोहक असे दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.

जुने महाबळेश्वर भगवान महाबली( महादेव )या नावापासून या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर पासून पाच किलोमीटर अंतरावर जुने महाबळेश्वर आहे. या परिसरात अनेक धार्मिक स्थळे आहेत. महाबळेश्वर मध्ये यादव राजा सिंघण याने कृष्णाबाई मंदिर बांधले. या मंदिराला पंचगंगा मंदिर असेही म्हणतात. कारण या मंदिरातूनच वेण्णा, सावित्री, गायत्री, कृष्णा आणि कोयना या नद्यांचा उगम झाला असे मानतात.

स्ट्रॉबेरी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी साठी जगप्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महाबळेश्वरला आलेले पर्यटक स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

महाबळेश्वरच्या परिसरातील पर्यटन स्थळे महाबळेश्वरच्या परिसरात काही निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. महाबळेश्वरच्या दक्षिणेस कोयना, सोळशी व कांदार खोरी आहेत; तर पश्चिमेस छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड किल्ला आहे. तसेच पाचगणी येथील टेबल लँड पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे.

सारांश :- महाबळेश्वर हे पश्चिम घाटातील अतिशय निसर्गरम्य असे  ठिकाण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उन्हाळी राजधानी म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध होते. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, घनदाट जंगल, दऱ्याखोऱ्या, उंच शिखरे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरला येतात. मार्च ते जून हा काळ महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी योग्य आहे.

महाबळेश्वर संबंधी तुम्हाला माहित असलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील लिंक दाबून सोडवा Quiz प्रश्नमंजुषा

Mahabaleshwar:scenic tourist spot

Mahabaleshwar is a popular cold weather tourist destination in Satara district of Maharashtra. This place is situated at an altitude of 4,500 meters above sea level. Satara to Mahabaleshwar is 50 kms Pune to Mahabaleshwar 115 kms Mumbai to Mahabaleshwar is 245 kms distance.

What to see in Mahabaleshwar? Mahabaleshwar has around 30 sightseeing places like Arthur seat point, Eco point, Venna Lake point, Lingamala water fall, Falkland point, Sun set point, Sri Mahabaleshwar area, Panchganga temple in Mahabaleshwar.

Arthur Seat Point is a popular tourist point in Mahabaleshwar. On one side of this point is the river Savitri flowing through a deep valley into Konkan. On the other side there is dense forest. The scenic surroundings and mesmerizing views of Mahabaleshwar attract tourists from this point. Viewing Raigad Fort and Torna Fort from this point reminds one of the history of Chhatrapati Shivaji Maharaj.

Echo Point In Mahabaleshwar Echo Point is on the way to Arthur Point. Due to the scenic surroundings, high mountain ranges, deep valleys and healthy environment, tourists prefer to visit this place in the morning.

Venna Lake   In Mahabaleshwar    Venna Lake was created by the  Chhatrapati Appasaheb Maharaj, the king of Satara  in the nineteenth century. This lake is spread over an area of about 28 acres. Due to perennial springs, the area around the lake is full of flowers. During the rainy season, there is a lot of water in Venna lake. So after monsoon is a very suitable time for tourism.

Lingamala Waterfalls.    In Mahabaleshwar Lingamala and Chintaman waterfalls near Venna lake on the road to Pachagani are very beautiful during monsoons.

Sunset Point is a famous point in Mahabaleshwar and is also known as Bombay Point. All the tourists gather here to watch the sunset.

Falkland Point   In Mahabaleshwar overlooks the Koyna River. Tourists also come to this place to see the setting sun. At this time, the view is very panoramic and charming which attracts the tourists.

Old Mahabaleshwar The place got its name Mahabaleshwar from the name of Lord Mahabali (Mahadev). Old Mahabaleshwar is five kilometers away from Mahabaleshwar. There are many religious places in this area. Yadav King Singhan built Krishnabai Temple in Mahabaleshwar. This temple is also known as Panchganga temple. Because the rivers Venna, Savitri, Gayatri, Krishna and Koyna are believed to originate from this temple.

Strawberries Mahabaleshwar is world famous for strawberries. Strawberry cultivation is done on a large scale in Mahabaleshwar. Tourists visiting Mahabaleshwar buy strawberries and raspberries in large quantities.

Tourist Places in the vicinity of Mahabaleshwar There are some scenic and historical tourist places in the vicinity of Mahabaleshwar. South of Mahabaleshwar are the Koyna, Solshi and Kandar valleys; While in the west is the Pratapgad fort built by Chhatrapati Shivaji Maharaj. Also the table land at Panchgani is an attraction for tourists.

Summary :- Conclusion This is a very scenic place in the Western Ghats. Mahabaleshwar was famous as the summer capital during pre-independence period. Tourists come to Mahabaleshwar in large numbers to see the green nature, beautiful gardens, dense forest, valleys, high peaks. March to June is the best time for Mahabaleshwar tourism.