भारतीय पर्यटन उद्योग : आम्ही आणि ते
भारतीय पर्यटनाचे स्वरूप,सोलापूर पर्यटनाचे स्वरूप – पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला एक उद्योग म्हणून आज प्रस्थापित झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे पर्यटन क्षेत्र विकसित होत आहे .भारतामध्ये, “केल्याने देशाटन,सभेत संचार आणि पंडित मैत्री “असे एक सुभाषित प्रचलित आहे.या सुभाषितांमध्ये पर्यटन हे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग असे म्हटले आहे.पर्यटनाचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत.
भारतीय पर्यटनाचे स्वरूप Nature of Indian tourism
जगाच्या संदर्भात भारतीय पर्यटनाचा विचार केल्यास आपण खूप मागे आहोत. भारताच्या संदर्भात महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा अजिंठा वेरूळ आणि कोकण या पलीकडे आम्ही जात नाही. भारतामध्ये सध्या राजस्थान, गोवा ,गुजरात ,कर्नाटक आणि केरळ यांनी पर्यटनाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. यातील काही राज्यांची अर्थव्यवस्था केवळ पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर जाण्याची प्रचंड क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे.
भारतात पर्यटन उद्योगाची काय स्थिती आहे?What is the status of tourism industry in India?
भारतामध्ये अलीकडच्या काळात पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे सन 2022 मध्ये ३४2३०८ पर्यटक भारतात आले होते.यामध्ये अमेरिका 24% युरोप 14% बांगलादेश 12 % याशिवाय कॅनडा श्रीलंका, नेपाळ, जर्मनी, सिंगापूर, फ्रान्स, मालदीव, पोर्तुगाल, रशियन फेडरेशन ,ओमान, इटली इत्यादी देशातून विदेशी पर्यटक भारतामध्ये आले होते. सन 2019 मध्ये भारतामध्ये 6.33 मिलियन पर्यटक आले होते .तर सन 2020 मध्ये 17.1 मिलियन पर्यटक आले होते.
पर्यटन उद्योगांमध्ये भारताला कोणत्या संधी आहेत?What are the opportunities for India in the tourism industry?
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्ना मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे पर्यटन उद्योग महत्त्वाचा आहे आहे. पर्यटन हे एक सेवा क्षेत्र आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते तसेच पर्यटन स्थळांवर रोजगाराची संधी उपलब्ध होते, विदेशी पर्यटक भारतात पर्यटनासाठी आल्यामुळे भारताला परकीयचलन मिळते याशिवाय सांस्कृतिक देवाणघेवाण वाढते.
भारतात सर्वात जास्त पर्यटक किंवा प्रवासी कोणत्या शहरांमध्ये येतात?Which cities have the highest number of tourists or travelers in India?
भारतामध्ये दिल्ली मुंबई आणि आग्रा या शहरांमध्ये सर्वात जास्त पर्यटक किंवा प्रवासी येतात. कारण दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तसेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे विदेशी पर्यटक प्रथम दिल्ली येथे येऊन त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी जातात.मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टी इथे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक उद्योगपती तसेच देशांतर्गत पर्यटक व प्रवासी मोठ्या प्रमाणात इथे येतात.आग्रा हे एक ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी ताजमहाल, लाल किल्ला, फत्तेपूर सिक्री आणि जवळ मथुरा आणि वृंदावन ही धार्मिक स्थळे आहेत. ताजमहल जागतिक वारसा स्थळ आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात.
भारतात विदेशी पर्यटक जास्त कोणत्या राज्यामध्ये जातात?Which state is visited by most foreign tourists in India?
भारतात सर्वात जास्त पर्यटक तामिळनाडू व महाराष्ट्रामध्ये मध्ये जातात. याचे कारण तामिळनाडू मध्ये रामेश्वर, मदुराई आणि तंजावर यासारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत याशिवाय चेन्नई आणि महाबलीपुरम यासारखी ऐतिहासिक शहरे आहेत तसेच कोडाईकनाल आणि उटी यासारखी निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणे तामिळनाडू मध्ये आहेत.महाराष्ट्रामध्ये अजंठा वेरूळ यासारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. तसेच समृद्ध समुद्रकिनारा व जैवविविधता असलेला कोकण आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शिक्षण संस्था येथे आहेत.
भारतीय पर्यटक सर्वात जास्त कुठे जाणे पसंत करतात?Where do Indian tourists like to go the most?
भारतातील प्रत्येक राज्यातील पर्यटकांच्या आवडी निवडी मध्ये विविधता आढळते. भारतीय पर्यटकांचा कल धार्मिक पर्यटन आणि निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी जाण्याकडे आहे. चारधाम यात्रा, वाराणसी ,ऋषिकेश ,हरिद्वार, कन्याकुमारी, वैष्णोदेवी, जगन्नाथ पुरी, तिरुपती बालाजी, बारा ज्योतिर्लिंग, शिर्डी साईबाबा, अजमेर, श्रवणबेळगोळ, बोधगया इत्यादी धार्मिक स्थळे तसेच काश्मीर, शिमला, कुलु मनाली, कोडाईकनाल, उटी, सापुतारा, महाबळेश्वर इत्यादी निसर्गरम्य व थंड हवेची ठिकाणे या काही प्रमुख पर्यटन स्थळांकडे भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात.
भारतीय पर्यटनाचा विकास का झाला नाही?Why Indian tourism has not developed?
भारतीय पर्यटना समोर अनेक आव्हाने आहेत भारतामध्ये असंख्य पर्यटन स्थळे आहेत. त्यातील काही पर्यटन स्थळे चांगल्या सोयी सुविधा असल्यामुळे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहेत.परंतु बहुसंख्य पर्यटन स्थळे सोयीसुविधांपासून वंचित आहेत. अशा सर्व पर्यटन स्थळांवर चांगली निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था ,आरोग्य व्यवस्था, रस्ते व वाहतूक व्यवस्था निर्माण केल्यास भारतीय पर्यटनाला चांगले दिवस येतील.सोलापूरजिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात अनेक पर्यटन स्थळे अतिशय महत्त्वाची आणि प्रेक्षणीय असूनही केवळ स्थानिक लोकांची अनास्था यामुळे अशी स्थळे दुर्लक्षित आहेत .त्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने सोयीसुविधा ,मार्गदर्शक पुस्तिका, संग्रहालय, हस्तकला विक्री केंद्र यांच्या माध्यमातून पर्यटन विकास करता येऊ शकेल.
सोलापूर पर्यटनाचे स्वरूप Nature of Solapur Tourism
महाराष्ट्राच्यासंदर्भात जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा विचार करतो तेव्हा धार्मिक पर्यटन आणि आरोग्य पर्यटन यांचा विकास केल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.धार्मिक पर्यटन स्थळे सोलापूर जिल्हा आणि परिसरात पंढरपूर ,अक्कलकोट आणि तुळजापूर ही धार्मिक पर्यटन स्थळे आहेत .आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी हे एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ आहे.तिरुपती बालाजी प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास केल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये तेथे आकर्षित होतील. आरोग्य पर्यटन आरोग्य पर्यटनाच्या बाबतीत सोलापूर मध्ये बहुतेक सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत.इतर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोलापूर मध्ये वास्तव्यास येतात.त्यांच्यासाठी निवास ,भोजन व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था वाजवी दरामध्ये उपलब्ध करून द्यावी. पर्यटकाला पैशांच्या मोबदल्यात जास्तीत जास्त समाधान मिळाले तर तो पर्यटक परत गेल्यानंतर पर्यटन स्थळावर जी वागणूक त्याला मिळालेली असते तिचे गोडवे तो गातो याशिवाय दिलखुलासपणे खर्चही करतो.
सारांश Summary
पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत जेव्हा आम्ही सोलापूरचा विचार करतो तेव्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आम्ही मागे आहोत. महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा इतर राज्यांच्या तुलनेत आम्ही मागे आहोत आणि भारतीय पर्यटन क्षेत्राचा विचार करतो तेव्हा जगाच्या तुलनेत आम्ही मागे आहोत. भारतामध्ये पर्यटन स्थळावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम शासन तसेच पर्यटन महामंडळ करीत असते .परंतु लोकसहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे. विशेषतः ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांनी त्या ठिकाणाचे पर्यटनाच्यादृष्टीने असलेले महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
Indian Tourism Industry : Us and Them
Introduction :- Tourism sector is established today as an industry with huge potential for employment generation. Tourism sector is developing as the second largest contributor to the Indian economy. In India, there is a well-known saying, “Kelya Deshatan, Sabha Sanchar and Pandit Maitri”. In these subhasitas, tourism is said to be a way to gain knowledge. Many forms of tourism are available today.
Nature of Indian Tourism :- If we consider Indian tourism in the context of the world, we are far behind. When we think of Maharashtra in the context of India, we do not go beyond Ajanta Verul and Konkan. Currently in India, Rajasthan, Goa, Gujarat, Karnataka and Kerala have made great progress in the field of tourism. The economy of some of these states is solely dependent on the tourism industry. Maharashtra has a huge potential to become number one in the field of tourism.
What is the status of tourism industry in India?
Tourism has gained a lot of importance in India in recent times 342308 tourists came to India in the year 2022. Among them America 24% Europe 14% Bangladesh 12% Besides Canada Sri Lanka, Nepal, Germany, Singapore, France, Maldives, Portugal, Russian Federation, Oman, Italy Foreign tourists from other countries came to India. In the year 2019, 6.33 million tourists came to India, while in the year 2020, 17.1 million tourists came.
What are the opportunities for India in the tourism industry?
The tourism industry is important as the second largest source of income in India’s national income. Tourism is a service sector. International trade and domestic trade increase national integration and provide employment opportunities at tourist destinations, foreign tourists visit India for tourism, and cultural exchange also increases.
Which cities have the highest number of tourists or travelers in India?
Delhi, Mumbai and Agra are the most visited cities in India. Because Delhi is the capital of India. Also, because of the international airport at this place, foreign tourists first come to Delhi and go to their desired destination. Mumbai is the financial capital of India. Bollywood i.e. Hindi film industry is here. Therefore, international tourists businessmen as well as domestic tourists and travelers come here in large numbers. Agra is a historical city. Taj Mahal, Red Fort, Fatehpur Sikri and nearby Mathura and Vrindavan are religious places. Taj Mahal is a World Heritage Site. Therefore, foreign tourists come here in large numbers.
Which state is visited by most foreign tourists in India?
In India, most tourists go between Tamil Nadu and Maharashtra. This is because Tamil Nadu has famous religious places like Rameshwar, Madurai and Thanjavur besides historical cities like Chennai and Mahabalipuram and scenic cool places like Kodaikanal and Ooty.Maharashtra has world heritage sites like Ajantha Verul. Konkan is also rich in beaches and biodiversity. Mumbai is the financial capital of India. Internationally renowned educational institutes are located here.
Where do Indian tourists like to go the most?
Every state in India has diversity in the choices of tourists. Indian tourists tend to go for religious tourism and scenic cool climates. Chardham Yatra, Varanasi, Rishikesh, Haridwar, Kanyakumari, Vaishnodevi, Jagannath Puri, Tirupati Balaji, Bara Jyotirlinga, Shirdi Saibaba, Ajmer, Shravanbelgol, Bodhgaya etc. religious places and scenic places like Kashmir, Shimla, Kullu Manali, Kodaikanal, Ooty, Saputara, Mahabaleshwar etc. Indian tourists go to some of the major tourist destinations in large numbers.
Why Indian tourism has not developed?
There are many challenges facing Indian tourism India has numerous tourist destinations. Some of the tourist spots are preferred by tourists because of good facilities. But majority of the tourist spots are deprived of amenities. Indian tourism will see good days if good accommodation, food, health, roads and transport system are created at all such tourist places. Although many tourist places are very important and spectacular in Solapur district, Maharashtra and the country, such places are neglected only because of the apathy of the local people. Tourism development can be done through finding tourist facilities, guide books, museum, handicraft sales center at that place.
Nature of Solapur Tourism :- When we think about the tourism of Solapur district in relation to Maharashtra, the development of religious tourism and health tourism will provide many employment opportunities. Religious tourism places in Solapur district and surrounding areas are Pandharpur, Akkalkot and Tuljapur. Tirupati Balaji in Andhra Pradesh is It is an ideal religious tourist spot. Like Tirupati Balaji, if religious tourist spots are developed in Solapur district, tourists will be attracted there in large numbers. Health Tourism In terms of health tourism, most all types of treatment are available in Solapur. Patients and their relatives come to Solapur in large numbers from other districts and Karnataka. Accommodation, food and transportation should be provided for them at reasonable rates. If the tourist gets the maximum satisfaction for his money, after the tourist returns, he sings about the sweetness of the treatment he received at the tourist destination and spends heartily.
Summary :- When we consider Solapur in terms of tourism sector we are lagging behind other districts. When we think of Maharashtra we lag behind other states and when we think of the Indian tourism sector we lag behind the world. In India, the government and the tourism corporation are doing the work of providing facilities at the tourist destination. But public participation is important in this. Local people especially in historical and religious tourist places need to understand the importance of that place in terms of tourism.
No comments:
Post a Comment