Tuesday, September 12, 2023

 https://youtu.be/VL_jqW_IWzQ 

सोलापूर येथील कुडल्संगम या ऐतिहासिक मंदिर माहिती .


 दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा व सीना नदीच्या संगमावरील कुडल संगम हे एक निसर्गरम्य पर्यटन व अध्यात्मिक स्थळ आहे .येथे असलेले संगमेश्वर मंदिर व हरिहरेश्वर मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे आहे. अतिशय निसर्गरम्य अशा या धार्मिक स्थळाला श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी गर्दी असते. येथे असलेले वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे बहुमुखी शिवलिंग, मराठीतील पुरातन अशा प्रकारचा शिलालेख, त्याचप्रमाणे हरिहरेश्वर मंदिरातील अतिशय रेखीव सुंदर अशा प्रकारची शिल्पे पर्यटकांचे मन मोहून घेतात. सोलापूर पासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटन व अध्यात्मिक स्थळास सहकुटुंब भेट द्यावी अशा प्रकारचे हे ठिकाण आहे .याची माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

No comments:

Post a Comment