Tuesday, September 12, 2023

 

भाजे लेणी: जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र येतो




भाजे लेणी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुणे शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात आहेत. भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत. बौद्ध शैल स्थापत्यातील हीनयान  प्रकारच्या ह्या लेणी आहेत. महाराष्ट्रातील सर्वात पहिले शैलगृह भाजे येथे खोदण्यात आले. सध्या महाराष्ट्र पुरातत्त्व विभाग अंतर्गत एक संरक्षित वास्तू आहे. भाजे लेणी परिसरात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देतात.

Bhaje leni Live Link – https://goo.gl/maps/3ykp8V621zEVSBgs9

भाजे लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व– भाजे येथील बौद्ध लेणी इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदण्यात आल्या. भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना बौद्ध भिक्खूंच्या वसाहतीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यास मौर्यकाळात सुरुवात झाली. महाराष्ट्रात सातवाहन काळात भाजे लेणी बौद्ध धर्माचे  एक प्रमुख केंद्र होते. बौद्ध भिक्खू उपासना  तसेच धर्मप्रसाराचे कार्य येथून करीत होते.

Bhaje Leni
Bhaje Leni

भाजे लेण्यांचे स्थापत्य भाजे येथील बौद्ध लेणी हीनयान पंथीयांची आहेत. भाजे येथील लेणी समूहात एकूण 22 लेणी आहेत. त्यामध्ये 21 विहार आणि एक चैत्यगृह आहे. येथील काही विहार दोन मजली आहेत. विहारांमध्ये बौद्ध भिक्खूंची राहण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामध्ये विश्रांतीसाठी कट्टे केलेले असतात. विहाराबाहेर पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाण्याच्या टाक्या (पोढी)केलेल्या आहेत. तर चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थळ असते. भाजे येथील लेणी समूहात क्रमांक बाराचे लेणे म्हणजे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहामध्ये स्तूप कोरलेला आहे.  हीनयान शैलस्थापत्यामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमा आढळत नाहीत. त्याऐवजी स्तूप किंवा इतर प्रतीकांच्या स्वरूपात गौतम बुद्धाची पूजा प्रार्थना केली जाते. याचे छत गजपृष्ठाकृती असून त्यामध्ये लाकडी तुळया बसवलेल्या आहेत.

Chaitya at Bhaje
Chaitya at Bhaje

Advertisements
REPORT THIS AD

भाजे लेण्यांची वैशिष्ट्ये महाराष्ट्रात  सर्वप्रथम लेणी भाजे येथे खोदण्यात आल्या. बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आला आहे. बौद्ध धर्म,शैलस्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि  पुरातत्वज्ञ भाजे येथे येतात. देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.

भाजे परिसरातील ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे भाजे लेणी परिसरात अगदी थोड्या अंतरावर अनेक लोकप्रिय ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत यामध्येकार्ले येथील बौद्ध लेणी लोणावळा लोहगड किल्ला विसापूर किल्ला पवना सरोवर तिकोना किंवा वितंडगड किल्ला बेडसे बौद्ध लेणी भीमाशंकर मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश होतो कार्ले लेणी https://goo.gl/maps/CQMdz3jXAxmnTUDo7 भाजे लेणी ते कार्ले लेणी अंतर सात किलोमीटर आहे. या ठिकाणी बौद्ध लेणी आणि एकवीरा देवीचे मंदिर आहे. येथील बौद्ध चैत्यगृह महाराष्ट्रातील सर्वात मोठे तसेच सुशोभित चैत्यगृह आहे. चैत्यगृहातील स्तूप प्रचंड आकाराचा असून पर्यटकांचे ते खास आकर्षण आहे. बेडसे लेणी भाजे लेणी पासून 24 किलोमीटर अंतरावर बेडसे लेणी आहेत. येथील बौध्द शिल्पकला प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी कामशेत धरण असल्यामुळे हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य बनला आहे. भाजे लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक आवर्जून कार्ले आणि बेडसे दोन्ही लेण्यांना भेट देतात.

Karle Chaitya
Karle Chaitya

लोहगड किल्ला https://goo.gl/maps/fFzhbxg4Hf1SX2CZ9 भाजे लेणी पासून चार किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ला आहे. लोहगड किल्ला ट्रेकर्सचे सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. भारताच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा किल्ला होता विसापूर किल्ला लोहगड किल्ल्यापासून जवळच विसापूर किल्ला आहे हा किल्ला देखील ट्रेकर्सचा पसंतीचा किल्ला आहे तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे याला याला तिकोना किल्ला असे नाव पडले असावे भाजे लेणी परिसरातील हे तीनही किल्ले पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे कारण येथील निसर्गरम्य परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी विशेषतः पावसाळ्यामध्ये पर्यटकांची या ठिकाणी खूप गर्दी असते

Lohgad Fort
Lohgad Fort

लोणावळा https://goo.gl/maps/R6GbcbwLd1sQZfvM7 भाजे परिसरातील अतिशय लोकप्रिय नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा होय भाजे ते लोणावळा हे अंतर बारा किलोमीटर आहे येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खेचून आणते विशेषतः पावसाळ्यामध्ये या परिसरातील धबधबे प्रवाहीत होतात याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात भुशी धरण(Bhushi Dam) – भुशी धरणामुळे लोणावळा येथील निसर्ग सौंदर्य आणखी खुलले आहे. लोणावळा येथील हवामान वर्षभर अल्हाददायक असते लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की अतिशय लोकप्रिय आहे अलीकडे अनेक फ्लेवर मध्ये लोणावळा चिक्की उपलब्ध आहे. ॲम्बी व्हॅली सिटी– लोणावळा परिसरात ॲम्बी व्हॅली सिटी मध्ये लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत तसेच पर्यटकांसाठी अनेक मनोरंजनाची साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत.

Bhushi Dam -Lonavala
Bhushi Dam -Lonavala

सारांश -भाजे लेणी परिसरात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत.बौद्ध धर्म,शैलस्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि  पुरातत्वज्ञ भाजे येथे येतात. देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.

Join Whatsapp Group via below link – https://chat.whatsapp.com/Fjxqyh03IEaAMVC89qYRCo

Bhaje Caves: Where Nature and History Meet

Bhaje Caves are located in Maval taluka, 55 km from Pune city on the old Mumbai Pune highway. Bhaje has ancient Buddhist caves. These caves are of Hinayana type of Buddhist rock architecture. The first rock shelter in Maharashtra was excavated at Bhaje. It is currently a protected structure under the Maharashtra Archeology Department. Bhaje Caves are visited by tourists in large numbers as there are many popular historical and natural tourist spots in the area

Historical Significance of Bhaje Caves- The Buddhist caves at Bhaje were excavated in the 2nd century BC. In the ancient times, while spreading Buddhism in India, caves were started to be dug in the mountains for the settlement of Buddhist monks during the Mauryan period. Bhaje Caves were a major center of Buddhism during the Satavahana period in Maharashtra. Buddhist bhikkhus performed worship as well as missionary work from here.

Architecture of Bhaje Caves The Buddhist caves at Bhaje belong to the Hinayana sect. There are a total of 22 caves in the cave group at Bhaje. It has 21 Viharas and a Chaitya Griha. Some viharas here are two storied. Buddhist monks are accommodated in viharas. They have grooves for relaxation. Outside the Vihar, water tanks are built for drinking and bathing. Chaityagriha is a place of prayer. Cave number 12 in the group of caves at Bhaje is a Chaityagriha. A stupa is carved in this chaityagriha. Images of Gautama Buddha are not found in Hinayana rock architecture. Instead, Gautama Buddha is worshiped in the form of stupas or other symbols. Its roof is gajpaja shaped and wooden beams are installed in it.

Features of Bhaje Caves Caves were first excavated at Bhaje in Maharashtra. Historical and cultural heritage of Buddhism has been preserved in this place. Researchers and archaeologists visit Bhaje to study Buddhism, rock architecture and sculpture. Tourists from all over the country visit this place to see the rich cultural heritage of India and enjoy the nature of the area.

Historical and Natural Tourist Places in Bhaje Area There are many popular historical and natural tourist places within a short distance of Bhaje Caves which include Buddhist Caves at Karle Lonavala Lohgad Fort Visapur Fort Pavana Sarovar Tikona or Vitandgad Fort Bedse Buddhist Caves Bhimashankar Temple Karle Caves Bhaje Caves This Karle Caves distance is seven kilometers. The place has a Buddhist cave and a temple of Ekvira Devi. The Buddhist Chaityagriha here is the largest as well as the most decorated Chaityagriha in Maharashtra. The Stupa in Chaityagriha is huge in size and is a special attraction for tourists. Bedse Caves Bedse Caves are located at a distance of 24 km from Bhaje Caves. The Buddhist sculpture here is spectacular. Due to the Kamshet Dam at this place, the whole area has become scenic. Tourists visiting Bhaje Caves must visit both Karle and Bedse Caves.

Lohgad Fort Lohgad Fort is located at a distance of four kilometers from Bhaje Caves. Lohgad fort is the most preferred place of trekkers. Visapur Fort was a very important political fort in the medieval history of India. Visapur Fort is close to Lohgad Fort. This fort is also a favorite fort for trekkers. Tikona Fort (Vitandgad) is a triangular shaped fort, hence the name Tikona Fort. It is a center of attraction because the scenic area here is crowded with tourists especially during monsoons to see the Sahyadri mountain ranges

A very popular natural tourist spot in the area of Lonavala Bhaje is Lonavala Yes Bhaje to Lonavala is twelve kilometers the beauty of the nature here attracts the tourists especially during the monsoons tourists flock to this place in large numbers to enjoy the waterfalls flowing in this area Bhushi Dam (Bhushi Dam) Due to the dam, the natural beauty of Lonavala has been opened up. Lonavla weather is pleasant throughout the year Peanut Chikki in Lonavla is very popular Recently Lonavala Chikki is available in many flavors. Ambhi Valley City- Ambhi Valley City in Lonavala area has luxury resorts and hotels and many entertainment facilities are available for tourists.

Summary -Bhaje Leni area has many popular historical and natural tourist spots. Bhaje has ancient Buddhist caves. Researchers and archaeologists visit Bhaje to study Buddhism, rock architecture and sculpture. Tourists from all over the country visit this place to see the rich cultural heritage of India and enjoy the nature of the area.

Advertisements

No comments:

Post a Comment