राजस्थान : पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण
राजस्थान म्हटले की सहजपणे आपल्याला जयपूर ,उदयपूर ,चित्तोडगड ,कुम्बलगड, माउंट आबू ,अजमेर ,जेसलमेर ,पुष्कर ,आमेर फोर्ट ,जयगड ही नावे सहजच समोर येतात. याशिवाय राजस्थान सरकार व तिथले पर्यटन महामंडळ अनेक नव्या पर्यटनस्थळांचा विकास करीत आहे. पर्यटन उद्योग राजस्थान मधील एक प्रमुख उद्योग आहे. याशिवाय राजस्थानमध्ये वस्त्रोद्योग, लोकरी कपडे, वनस्पती तेल ,तांबे आणि जस्त,काच, सिमेंट यासारखेही उद्योग आहेत. राजस्थानच्या अर्थव्यवस्थेला पंधरा टक्के उत्पन्न पर्यटन उद्योगातून मिळते .
राजस्थानमध्ये पर्यटनासाठी का जावे? याची काही कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील-1) राजस्थानातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळे एकमेकांशी रस्ते व रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. जयपूर उदयपूर येथे विमानाने जाता येते.2) निवासासाठी श्रीमंत, मध्यमवर्गीय ,सर्वसामान्य पर्यटक आणि विदेशी पर्यटकांनाही परवडतील अशी निवास व्ववस्था3) देश-विदेशातील सर्व प्रकारच्या पर्यटकाननासहज उपलब्ध होणारे खाद्यपदार्थ4) सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर माहिती देण्यासाठी भारतातील तसेच जगातील प्रमुख भाषेतील मार्गदर्शक (Guide) उपलब्ध आहेत.5) पर्यटन स्थळांची प्रसिद्धी खाजगी संस्था, शासन आणि पर्यटन महामंडळाद्वारे तसेच विविध संकेतस्थळे व माहिती पुस्तिका द्वारे सातत्याने केले जाते.6) पर्यटन स्थानना भेट देण्यासाठी खाजगी व सरकारी किफायतशीर वाहतूक व्यवस्था.7) उंट ,घोडा ,हत्ती यांची सफारी8) राहूटी आणि तंबू मध्ये राहण्याची सोय9) पर्यटनस्थळांवर राजस्थानी नृत्य व हस्तकला प्रदर्शन10) पॅलेस ऑन व्हील या शाही सोयी सुविधांनी युक्त अशा रेल्वेची सफर11) राजस्थान मधील अनेक स्थळांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेली आहे.12) राजस्थान सरकारने पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी लक्झरी टॅक्स दहा टक्के वरून आठ टक्के केला आहे.
वरील काही प्रमुख कारणांमुळे पर्यटकांना राजस्थानमध्ये पर्यटन करताना खूप चांगला अनुभव येतो त्यामुळे पर्यटक राजस्थान मध्ये पर्यटनास जाणे पसंत करतात.संपूर्ण राजस्थान मधील पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर पंधरा दिवसाच्या सहलीचे नियोजन करावे लागेल.
राजस्थान प्रमुख पर्यटन स्थळे आणि त्यांचे लाईव्ह लोकेशन
जयपुर Live Location – https://goo.gl/maps/dEfdDfRuY8vWijeo9
जयपूर राजस्थानच्या राजधानीचे शहर असून येथे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तू विविध राजवटीमध्ये बांधलेल्या आहेत.यापैकी पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय आणि आकर्षणाच्या वास्तू म्हणजे हवा महल आणि जल महल ह्या आहेत. याशिवाय जंतर-मंतर ,अंबर पॅलेस ,सिटी पॅलेस या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात.गुलाबी शहर या नावानेही जयपूर प्रसिद्ध आहे.
उदयपूर Live Location – https://goo.gl/maps/aikcz3qMQMjag8Vd9
उदयपूर मेवाड घराण्यातील महाराणा उदयसिंह द्वितीय यांनी उदयपूर शहराची स्थापना केली.उदयपूर मध्ये सिटी पॅलेस,जयसमंद सरोवर,चित्तोडगढ किल्ला,फतेह सागर सरोवर हि पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.याशिवाय राजस्थान सरकार काही ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करीत आहे.
चित्तोडगढ- Live Location – https://goo.gl/maps/j7deWSPPmvitBLgZ7
चित्तोडच्या किल्ल्यात पाहावयाची ठिकाणे राजपुतांचे शौर्य,त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणजे चित्तोडचा किल्ला होय.चित्तोडगढ अनेक ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार आहे.चित्तोडगढ इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहे.पद्मिनी पॅलेस,विजयस्थंभ,कीर्तिस्तंभ,वस्तू संग्रहालय,जैन व हिंदू मंदिरे,संत मीराबाईचे मंदिर,अनेक राजवाडे पर्यटकांनी गजबजलेले असतात.
जोधपूर – https://goo.gl/maps/HJKALUXkEKVF6mDV6
जोधपूर राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऐतिहासिक शहर आहे.Blue City या नावानेही जोधपूर शहर ओळखले जाते.या ठिकाणी अनेक किल्ले,राजवाडे,मंदिरे,हवेली आणि घरे व इमारती निळ्या रंगाने रंगवलेली आहेत.
पुष्कर- Live Location – https://goo.gl/maps/2jFBJ2yLbkGwavLv9
भारतातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर पुष्कर येथे आहे.हिंदू मान्यतेनुसार ब्रह्मदेवाची पूजा फक्त पुष्कर येथेच केली जाते.याशिवाय पुष्कर सरोवर पर्यटकांचे आणि भाविकांचे आकर्षण केंद्र आहे.दरवर्षी कार्तिक महिन्यात पुष्कर मेळा या ठिकाणी भरतो.पुष्कर उंट मेळा किंवा कार्तिक मेळा असेही स्थानिक लोक याला म्हणतात.राजस्थान पर्यटन विभागामार्फत पुष्कर मेळाव्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
माउंट अबू-Live Location – https://goo.gl/maps/ic7Ap6JQ2BVRhXis9
माऊंट अबू राजस्थान मधील लोकप्रिय थंड हवेचे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे.राजस्थान आणि गुजरात यांच्या सीमेवर स्थित आहे.अरावली पर्वत रांगा आणि घनदाट जंगल यामुळे येथील हवामान थंड असते.माउंट अबू येथील दिलवाडा जैन मंदिरे संगमरवरी दगडात बांधलेले असून स्थापत्य कला व मूर्तिकला यांच्या दृष्टीनेही अप्रतिम आहेत.अनेक पौराणिक कथांचा संबंध माउंट अबूशी जोडला जातो.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान,बिकानेर,अलवार,अजमेर,जैसलमेर,कोटा, मांडवा,भरतपूर अभयारण्य,सवाई माधोपुर,बुंदी आणि रणकपुर या पर्यटन स्थळांना पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
Rajasthan: A must visit place for tourists
Jaipur, Udaipur, Chittodgarh, Kumbalgad, Mount Abu, Ajmer, Jaisalmer, Pushkar, Amer Fort, Jaigarh are easily mentioned when we say Rajasthan. Apart from this, Rajasthan government and its tourism corporation are developing many new tourist spots. Tourism industry is a major industry in Rajasthan. Apart from this, Rajasthan also has industries like textiles, woolen clothes, vegetable oil, copper and zinc, glass, cement. Fifteen percent of Rajasthan’s economy comes from the tourism industry.
https://play.ht/articles/5712e1d1-1a6d-4e6a-932b-db98be6085c8
Audio Clip
Why visit Rajasthan for tourism? Some of the reasons for this can be stated as follows- 1) All the major tourist places in Rajasthan are connected with each other by road and rail. Jaipur to Udaipur can be reached by plane. 2) Accommodation that can be afforded by rich, middle class, ordinary tourists and foreign tourists as well 3) Food available for all types of tourists in the country and abroad 4) Guide available in major languages of India and the world to provide information on all major tourist spots. 5) Publicity of tourist places is continuously done by private organizations, government and tourism corporation as well as through various websites and information booklets. 6) Private and government cost-effective transport system for visiting tourist places. Accommodation in tents 9) Rajasthani dance and handicrafts exhibition at tourist spots 10) Palace on wheels train journey with royal amenities 11) Many places in Rajasthan have been registered as UNESCO World Heritage Sites. 12) Rajasthan government has increased luxury tax from 10% to 8% to promote tourism. has done
Due to some of the above major reasons, the tourists have a very good experience while doing tourism in Rajasthan, so tourists prefer to go for tourism in Rajasthan. If you want to enjoy the tourist places of entire Rajasthan to your heart’s content, then you have to plan a fifteen day trip.
Top tourist places preferred by tourists in Rajasthan and their live location
Jaipur – Live Location -https://goo.gl/maps/dEfdDfRuY8vWijeo9
Jaipur is the capital city of Rajasthan and there are many historical and cultural monuments built in different dynasties. Among these, the most popular and attractive monuments for tourists are Hawa Mahal and Jal Mahal. Apart from this, tourists also pay a visit to Jantar-Mantar, Amber Palace, City Palace. Jaipur is also known as Pink City.
Udaipur -Live Location -https://goo.gl/maps/aikcz3qMQMjag8Vd9
Udaipur Maharana Uday Singh II of the Mewar dynasty founded the city of Udaipur. City Palace, Jaisamand Lake, Chittogarh Fort, Fateh Sagar Lake are popular places for tourists in Udaipur. Apart from this, Rajasthan government is developing some historical places for tourism.
Chittorgarh- Live Location -https://goo.gl/maps/j7deWSPPmvitBLgZ7
Chittor Fort is a symbol of bravery, sacrifice and sacrifice of Rajputs. Chittorgarh is a silent witness of many historical events. Chittorgarh is a place of inspiration and inspiration for all the tourists who come here. The palaces are crowded with tourists.
Jodhpur – https://goo.gl/maps/HJKALUXkEKVF6mDV6
Jodhpur is the second largest historical city in Rajasthan. Jodhpur city is also known as Blue City. Many forts, palaces, temples, mansions and houses and buildings are painted in blue color.
Pushkar- Live Location -https://goo.gl/maps/2jFBJ2yLbkGwavLv9
Pushkar is the only temple of Lord Brahma in India. According to Hindu belief Lord Brahma is worshiped only in Pushkar. Apart from this, Pushkar Sarovar is the center of attraction for tourists and devotees. Every year in the month of Kartik, Pushkar Mela is held at this place. It is also called Pushkar Camel Fair or Kartik Mela by local people. Rajasthan The Pushkar fair is organized on a large scale by the tourism department.
Mount Abu-Live Location -https://goo.gl/maps/ic7Ap6JQ2BVRhXis9
It is a popular cold weather natural tourist destination in Rajasthan. It is located on the border of Rajasthan and Gujarat. The climate here is cool due to the Aravalli mountain range and dense forest. Mythology is associated with Mount Abu.
Ranthambore National Park, Bikaner, Alwar, Ajmer, Jaisalmer, Kota, Mandwa, Bharatpur Sanctuary, Sawai Madhopur, Bundi and Ranakpur are popular tourist destinations.
No comments:
Post a Comment