हंपी : सांस्कृतिक पर्यटन स्थळ
हंपी हे कर्नाटकातील विजय नगर जिल्ह्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले पर्यटन स्थळ आहे. हंपी पर्यटन स्थळास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. उत्तम वाहतूक व्यवस्था सर्व सुखसोयींनी युक्त असलेली निवास व्यवस्था हॉटेल या ठिकाणी आहेत. भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन महामंडळ, कर्नाटक शासन आणि स्थानिक लोकांच्या समन्वयातून हम्पी एक प्रेक्षणीय सांस्कृतिक पर्यटनस्थळ झाले आहे.
हंपी विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. हंपी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हंपीचे प्राचीन संस्कृत नाव पम्पा असे होते. पुढील काळात त्याचा कन्नड अपभ्रंश हम्पे किंवा हंपी असे झाले. रामायणात उल्लेख असलेले किस्किंदा हे ठिकाण येथेच होते.. विजयनगरच्या इतिहासामध्ये कृष्णदेवराय हा अतिशय प्रसिद्ध सत्ताधीश होऊन गेला. त्यानेच हंपीला वैभव प्राप्त करून दिले. हंपी शहराला समृद्ध संस्कृतीक वारसा निर्माण करण्यामध्ये विजयनगरच्या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे
Hampi-Kanataka Location Link-
https://maps.app.goo.gl/mJ4JFCociNMevEFM8
हंपी यथील प्रेक्षणीय ठिकाणे –विरुपाक्ष मंदिर -भव्य द्राविड स्थापत्यशैली मध्ये हे मंदिर बांधलेले आहे. हे देवराय द्वितीय यांच्या काळात हे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. यातील नंदी तीन मुखी आहे .या मंदिरात फेब्रुवारीमध्ये महोत्सवाचे आयोजन केले जाते. विरुपाक्ष मंदिर पर्यटकांसाठी सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते.
विजय विठ्ठल मंदिर हंपी :-हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कायम पर्यटकांनी गजबजलेले असते. या मंदिरातील खांबां मधून विविध संगीत वाद्यांचा आवाज येतो. मंदिर स्थापत्य कलेचे हे खास वैशिष्ट्य फक्त हंपी मध्येच पाहायला मिळते. विजय विठ्ठल मंदिरासमोर अखंड शिळेमध्ये कोरलेला दगडी गरुड रथ आहे. शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेले हे एकपाषाणी शिल्प आहे. विजय विठ्ठल मंदिर हंपी येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण स्थळ आहे.
Video-Hampi Ruins https://fb.watch/lYxPmZZ_2E/?mibextid=CDWPTG
Video Vijay Vitthal Temple Hampi https://fb.watch/lZRUZFWwP7/?mibextid=CDWPTG
लोटस महाल हंपी – वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैली मध्ये ही वास्तू बांधलेली आहे .चोवीस खांबांवर दोन मजली वास्तु बांधलेली आहे. याचा आकार कमळाच्या फुला प्रमाणे आहे.
पुरातत्वीय वस्तूसंग्रहालय हंपी– हंपी येथील पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयाला पर्यटकांनी अवश्य भेट दिली पाहिजे. या संग्रहालयात चार विभाग केलेले आहेत .त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, हंपी नगराचे मॉडेल प्रतिकृती ,शिल्प, मूर्ती, नाणी, हत्यारे ,शिलालेख यामुळे विजयनगर साम्राज्याचा अद्भुत इतिहास उलगडतो.
हंपी बाजार– पर्यटकांचे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे हंपी बाजार. या ठिकाणी स्थानिक हस्तकला वस्तू ,कपडे, चांदीचे दागिने, बॅगा ,चामड्याच्या वस्तू इत्यादी खरेदी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
हंपी येथील इतर प्रेक्षणीय पर्यटन स्थळे -हंपी मध्ये अनेक मंदिरे आहेत. यापैकी विरुपाक्ष मंदिर, विजय विठ्ठल मंदिर, लोटस महाल, हम्पी बाजार ,क्वींस बाथ (राणीचे शाही स्नानगृह), हनुमान मंदिर, मातंग हील ,पुरातत्वीय वस्तू संग्रहालय, तुंगभद्रा नदीच्या काठावर विखुरलेले असंख्य अवशेष, भूमिगत मंदिर ,पुष्करिणी, पायऱ्यांची बारव ,गगन महाल, हेमकूट पर्वत ,वीर हरिहर पॅलेस, कोदंडराम मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर, बद्वलिंग मंदिर, प्रचंड आकाराचा नंदी, हत्तीखाना यासारखी जवळपास 35 पर्यटन स्थळे हम्पी मध्ये आहेत.
सारांश-हंपी हे कर्नाटकातील विजय नगर जिल्ह्यातील समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले पर्यटन स्थळ आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून हम्पीला मान्यता दिलेली आहे. उत्तम वाहतूक व्यवस्था सर्व सुखसोयींनी युक्त असलेली निवास व्यवस्था हॉटेल या ठिकाणी आहेत. भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन महामंडळ, कर्नाटक शासन आणि स्थानिक लोकांच्या समन्वयातून हम्पी एक प्रेक्षणीय सांस्कृतिक पर्यटनस्थळ झाले आहे.
Hampi : A cultural tourism destination
Hampi was the capital city of Vijayanagara Empire. The city of Hampi is situated on the banks of the Tungabhadra River. The ancient Sanskrit name of Hampi was Pampa. In later times it was corrupted to Kannada as Hampe or Hampi. The place Kiskinda mentioned in Ramayana was located here..Krishna Devaraya became a very famous ruler in the history of Vijayanagara. It was he who brought glory to Hampi.
Virupaksha Temple Hampi:- This temple is built in grand Dravidian architectural style. This temple was built during the reign of Devaraya II. In front of the temple is Nandi Mandap. In this Nandi is three-faced. A festival is organized in this temple in February. Virupaksha temple is open for darshan from 9 am to 11 am and 5 pm to 9 pm.
Vijay Vitthal Temple Hampi:- This unique temple is always crowded with tourists. The sound of various musical instruments comes from the pillars of this temple. This special feature of temple architecture is seen only in Hampi. In front of the Vijay Vitthal Temple is a stone Garuda Rath carved into an unbroken stone. It is a monolithic sculpture that is a wonderful example of sculpture. Vijay Vitthal Temple is a major tourist attraction in Hampi.
Lotus Mahal Hampi:- This vastu is built in typical architectural style.The vastu is built with two floors on twenty four pillars. Its shape is like a lotus flower.
Archaeological Museum Hampi :- Tourists must visit the archaeological museum in Hampi. This museum is divided into four sections.In it various types of objects, model replicas of Hampi city, sculptures, idols, coins, weapons, inscriptions reveal the wonderful history of the Vijayanagar Empire.
Hampi Bazaar:- The most favorite place for tourists is Hampi Bazaar. Tourists flock here to buy local handicrafts, clothes, silver jewellery, bags, leather goods etc.
Sightseeing places in Hampi:- There are many temples in Hampi including Virupaksha Temple, Vijay Vitthal Temple, Lotus Mahal, Hampi Bazaar, Queen’s Bath (Queen’s Royal Bath), Hanuman Temple, Matang Hill, Archaeological Museum, numerous ruins scattered on the banks of Tungabhadra River. , Underground Temple, Pushkarini, Staircase, Gagan Mahal, Hemkoot Parvat, Veer Harihar Palace, Kodandram Temple, Lakshmi Narasimha Temple, Badwalinga Temple, Huge Sized Nandi, Elephant Khana are about 35 tourist places in Hampi.
Summary:- Hampi is a tourist destination with rich historical heritage in Vijayanagar district of Karnataka. Hampi has been recognized as a World Heritage Site by UNESCO. Accommodation facilities with all the comforts are available in this place with good transport links. Hampi has become a spectacular cultural tourist destination through the coordination of Archaeological Department of India, Tourism Corporation, Government of Karnataka and local people.
No comments:
Post a Comment