सोलापूर येथील कुडल्संगम या ऐतिहासिक मंदिर माहिती .
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा व सीना नदीच्या संगमावरील कुडल संगम हे एक निसर्गरम्य पर्यटन व अध्यात्मिक स्थळ आहे .येथे असलेले संगमेश्वर मंदिर व हरिहरेश्वर मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे आहे. अतिशय निसर्गरम्य अशा या धार्मिक स्थळाला श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी गर्दी असते. येथे असलेले वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे बहुमुखी शिवलिंग, मराठीतील पुरातन अशा प्रकारचा शिलालेख, त्याचप्रमाणे हरिहरेश्वर मंदिरातील अतिशय रेखीव सुंदर अशा प्रकारची शिल्पे पर्यटकांचे मन मोहून घेतात. सोलापूर पासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटन व अध्यात्मिक स्थळास सहकुटुंब भेट द्यावी अशा प्रकारचे हे ठिकाण आहे .याची माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजे लेणी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुणे शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात आहेत. भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत. बौद्ध शैल स्थापत्यातील हीनयान प्रकारच्या ह्या लेणी आहेत. महाराष्ट्रातील सर्वात पहिले शैलगृह भाजे येथे खोदण्यात आले. सध्या महाराष्ट्र पुरातत्त्व विभाग अंतर्गत एक संरक्षित वास्तू आहे. भाजे लेणी परिसरात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देतात.
भाजे लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व– भाजे येथील बौद्ध लेणी इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदण्यात आल्या. भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना बौद्ध भिक्खूंच्या वसाहतीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यास मौर्यकाळात सुरुवात झाली. महाराष्ट्रात सातवाहन काळात भाजे लेणी बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र होते. बौद्ध भिक्खू उपासना तसेच धर्मप्रसाराचे कार्य येथून करीत होते.
भाजे लेण्यांचे स्थापत्य भाजे येथील बौद्ध लेणी हीनयान पंथीयांची आहेत. भाजे येथील लेणी समूहात एकूण 22 लेणी आहेत. त्यामध्ये 21 विहार आणि एक चैत्यगृह आहे. येथील काही विहार दोन मजली आहेत. विहारांमध्ये बौद्ध भिक्खूंची राहण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामध्ये विश्रांतीसाठी कट्टे केलेले असतात. विहाराबाहेर पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाण्याच्या टाक्या (पोढी)केलेल्या आहेत. तर चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थळ असते. भाजे येथील लेणी समूहात क्रमांक बाराचे लेणे म्हणजे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहामध्ये स्तूप कोरलेला आहे. हीनयान शैलस्थापत्यामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमा आढळत नाहीत. त्याऐवजी स्तूप किंवा इतर प्रतीकांच्या स्वरूपात गौतम बुद्धाची पूजा प्रार्थना केली जाते. याचे छत गजपृष्ठाकृती असून त्यामध्ये लाकडी तुळया बसवलेल्या आहेत.
Advertisements
REPORT THIS AD
भाजे लेण्यांची वैशिष्ट्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम लेणी भाजे येथे खोदण्यात आल्या. बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आला आहे. बौद्ध धर्म,शैलस्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि पुरातत्वज्ञ भाजे येथे येतात. देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.
भाजे परिसरातील ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे भाजे लेणी परिसरात अगदी थोड्या अंतरावर अनेक लोकप्रिय ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत यामध्येकार्ले येथील बौद्ध लेणी लोणावळा लोहगड किल्ला विसापूर किल्ला पवना सरोवर तिकोना किंवा वितंडगड किल्ला बेडसे बौद्ध लेणी भीमाशंकर मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश होतो कार्ले लेणीhttps://goo.gl/maps/CQMdz3jXAxmnTUDo7 भाजे लेणी ते कार्ले लेणी अंतर सात किलोमीटर आहे. या ठिकाणी बौद्ध लेणी आणि एकवीरा देवीचे मंदिर आहे. येथील बौद्ध चैत्यगृह महाराष्ट्रातील सर्वात मोठे तसेच सुशोभित चैत्यगृह आहे. चैत्यगृहातील स्तूप प्रचंड आकाराचा असून पर्यटकांचे ते खास आकर्षण आहे. बेडसेलेणी भाजे लेणी पासून 24 किलोमीटर अंतरावर बेडसे लेणी आहेत. येथील बौध्द शिल्पकला प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी कामशेत धरण असल्यामुळे हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य बनला आहे. भाजे लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक आवर्जून कार्ले आणि बेडसे दोन्ही लेण्यांना भेट देतात.
लोहगड किल्लाhttps://goo.gl/maps/fFzhbxg4Hf1SX2CZ9 भाजे लेणी पासून चार किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ला आहे. लोहगड किल्ला ट्रेकर्सचे सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. भारताच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा किल्ला होता विसापूर किल्ला लोहगड किल्ल्यापासून जवळच विसापूर किल्ला आहे हा किल्ला देखील ट्रेकर्सचा पसंतीचा किल्ला आहे तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे याला याला तिकोना किल्ला असे नाव पडले असावे भाजे लेणी परिसरातील हे तीनही किल्ले पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे कारण येथील निसर्गरम्य परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी विशेषतः पावसाळ्यामध्ये पर्यटकांची या ठिकाणी खूप गर्दी असते
लोणावळाhttps://goo.gl/maps/R6GbcbwLd1sQZfvM7 भाजे परिसरातील अतिशय लोकप्रिय नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा होय भाजे ते लोणावळा हे अंतर बारा किलोमीटर आहे येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खेचून आणते विशेषतः पावसाळ्यामध्ये या परिसरातील धबधबे प्रवाहीत होतात याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात भुशी धरण(Bhushi Dam) – भुशी धरणामुळे लोणावळा येथील निसर्ग सौंदर्य आणखी खुलले आहे. लोणावळा येथील हवामान वर्षभर अल्हाददायक असते लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की अतिशय लोकप्रिय आहे अलीकडे अनेक फ्लेवर मध्ये लोणावळा चिक्की उपलब्ध आहे. ॲम्बी व्हॅली सिटी– लोणावळा परिसरात ॲम्बी व्हॅली सिटी मध्ये लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत तसेच पर्यटकांसाठी अनेक मनोरंजनाची साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत.
सारांश -भाजे लेणी परिसरात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. भाजे येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत.बौद्ध धर्म,शैलस्थापत्य आणि शिल्पकला यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक आणि पुरातत्वज्ञ भाजे येथे येतात. देश विदेशातील पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी तसेच परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.
Bhaje Caves are located in Maval taluka, 55 km from Pune city on the old Mumbai Pune highway. Bhaje has ancient Buddhist caves. These caves are of Hinayana type of Buddhist rock architecture. The first rock shelter in Maharashtra was excavated at Bhaje. It is currently a protected structure under the Maharashtra Archeology Department. Bhaje Caves are visited by tourists in large numbers as there are many popular historical and natural tourist spots in the area
Historical Significance of Bhaje Caves- The Buddhist caves at Bhaje were excavated in the 2nd century BC. In the ancient times, while spreading Buddhism in India, caves were started to be dug in the mountains for the settlement of Buddhist monks during the Mauryan period. Bhaje Caves were a major center of Buddhism during the Satavahana period in Maharashtra. Buddhist bhikkhus performed worship as well as missionary work from here.
Architecture of Bhaje Caves The Buddhist caves at Bhaje belong to the Hinayana sect. There are a total of 22 caves in the cave group at Bhaje. It has 21 Viharas and a Chaitya Griha. Some viharas here are two storied. Buddhist monks are accommodated in viharas. They have grooves for relaxation. Outside the Vihar, water tanks are built for drinking and bathing. Chaityagriha is a place of prayer. Cave number 12 in the group of caves at Bhaje is a Chaityagriha. A stupa is carved in this chaityagriha. Images of Gautama Buddha are not found in Hinayana rock architecture. Instead, Gautama Buddha is worshiped in the form of stupas or other symbols. Its roof is gajpaja shaped and wooden beams are installed in it.
Features of Bhaje Caves Caves were first excavated at Bhaje in Maharashtra. Historical and cultural heritage of Buddhism has been preserved in this place. Researchers and archaeologists visit Bhaje to study Buddhism, rock architecture and sculpture. Tourists from all over the country visit this place to see the rich cultural heritage of India and enjoy the nature of the area.
Historical and Natural Tourist Places in Bhaje Area There are many popular historical and natural tourist places within a short distance of Bhaje Caves which include Buddhist Caves at Karle Lonavala Lohgad Fort Visapur Fort Pavana Sarovar Tikona or Vitandgad Fort Bedse Buddhist Caves Bhimashankar Temple Karle Caves Bhaje Caves This Karle Caves distance is seven kilometers. The place has a Buddhist cave and a temple of Ekvira Devi. The Buddhist Chaityagriha here is the largest as well as the most decorated Chaityagriha in Maharashtra. The Stupa in Chaityagriha is huge in size and is a special attraction for tourists. Bedse Caves Bedse Caves are located at a distance of 24 km from Bhaje Caves. The Buddhist sculpture here is spectacular. Due to the Kamshet Dam at this place, the whole area has become scenic. Tourists visiting Bhaje Caves must visit both Karle and Bedse Caves.
Lohgad Fort Lohgad Fort is located at a distance of four kilometers from Bhaje Caves. Lohgad fort is the most preferred place of trekkers. Visapur Fort was a very important political fort in the medieval history of India. Visapur Fort is close to Lohgad Fort. This fort is also a favorite fort for trekkers. Tikona Fort (Vitandgad) is a triangular shaped fort, hence the name Tikona Fort. It is a center of attraction because the scenic area here is crowded with tourists especially during monsoons to see the Sahyadri mountain ranges
A very popular natural tourist spot in the area of Lonavala Bhaje is Lonavala Yes Bhaje to Lonavala is twelve kilometers the beauty of the nature here attracts the tourists especially during the monsoons tourists flock to this place in large numbers to enjoy the waterfalls flowing in this area Bhushi Dam (Bhushi Dam) Due to the dam, the natural beauty of Lonavala has been opened up. Lonavla weather is pleasant throughout the year Peanut Chikki in Lonavla is very popular Recently Lonavala Chikki is available in many flavors. Ambhi Valley City- Ambhi Valley City in Lonavala area has luxury resorts and hotels and many entertainment facilities are available for tourists.
Summary -Bhaje Leni area has many popular historical and natural tourist spots. Bhaje has ancient Buddhist caves. Researchers and archaeologists visit Bhaje to study Buddhism, rock architecture and sculpture. Tourists from all over the country visit this place to see the rich cultural heritage of India and enjoy the nature of the area.
हंपी हे कर्नाटकातील विजय नगर जिल्ह्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले पर्यटन स्थळ आहे. हंपी पर्यटन स्थळास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. उत्तम वाहतूक व्यवस्था सर्व सुखसोयींनी युक्त असलेली निवास व्यवस्था हॉटेल या ठिकाणी आहेत. भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन महामंडळ, कर्नाटक शासन आणि स्थानिक लोकांच्या समन्वयातून हम्पी एक प्रेक्षणीय सांस्कृतिक पर्यटनस्थळ झाले आहे.
हंपी विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. हंपी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हंपीचे प्राचीन संस्कृत नाव पम्पा असे होते. पुढील काळात त्याचा कन्नड अपभ्रंश हम्पे किंवा हंपी असे झाले. रामायणात उल्लेख असलेले किस्किंदा हे ठिकाण येथेच होते.. विजयनगरच्या इतिहासामध्ये कृष्णदेवराय हा अतिशय प्रसिद्ध सत्ताधीश होऊन गेला. त्यानेच हंपीला वैभव प्राप्त करून दिले. हंपी शहराला समृद्ध संस्कृतीक वारसा निर्माण करण्यामध्ये विजयनगरच्या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे
हंपी यथील प्रेक्षणीय ठिकाणे –विरुपाक्ष मंदिर -भव्य द्राविड स्थापत्यशैली मध्ये हे मंदिर बांधलेले आहे. हे देवराय द्वितीय यांच्या काळात हे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. यातील नंदी तीन मुखी आहे .या मंदिरात फेब्रुवारीमध्ये महोत्सवाचे आयोजन केले जाते. विरुपाक्ष मंदिर पर्यटकांसाठी सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते.
Advertisements
REPORT THIS AD
विजय विठ्ठल मंदिर हंपी :-हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कायम पर्यटकांनी गजबजलेले असते. या मंदिरातील खांबां मधून विविध संगीत वाद्यांचा आवाज येतो. मंदिर स्थापत्य कलेचे हे खास वैशिष्ट्य फक्त हंपी मध्येच पाहायला मिळते. विजय विठ्ठल मंदिरासमोर अखंड शिळेमध्ये कोरलेला दगडी गरुड रथ आहे. शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेले हे एकपाषाणी शिल्प आहे. विजय विठ्ठल मंदिर हंपी येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण स्थळ आहे.
लोटस महालहंपी – वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैली मध्ये ही वास्तू बांधलेली आहे .चोवीस खांबांवर दोन मजली वास्तु बांधलेली आहे. याचा आकार कमळाच्या फुला प्रमाणे आहे.
पुरातत्वीय वस्तूसंग्रहालय हंपी– हंपी येथील पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयाला पर्यटकांनी अवश्य भेट दिली पाहिजे. या संग्रहालयात चार विभाग केलेले आहेत .त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, हंपी नगराचे मॉडेल प्रतिकृती ,शिल्प, मूर्ती, नाणी, हत्यारे ,शिलालेख यामुळे विजयनगर साम्राज्याचा अद्भुत इतिहास उलगडतो.
हंपी बाजार– पर्यटकांचे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे हंपी बाजार. या ठिकाणी स्थानिक हस्तकला वस्तू ,कपडे, चांदीचे दागिने, बॅगा ,चामड्याच्या वस्तू इत्यादी खरेदी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
हंपी येथील इतर प्रेक्षणीय पर्यटन स्थळे -हंपी मध्ये अनेक मंदिरे आहेत. यापैकी विरुपाक्ष मंदिर, विजय विठ्ठल मंदिर, लोटस महाल, हम्पी बाजार ,क्वींस बाथ (राणीचे शाही स्नानगृह), हनुमान मंदिर, मातंग हील ,पुरातत्वीय वस्तू संग्रहालय, तुंगभद्रा नदीच्या काठावर विखुरलेले असंख्य अवशेष, भूमिगत मंदिर ,पुष्करिणी, पायऱ्यांची बारव ,गगन महाल, हेमकूट पर्वत ,वीर हरिहर पॅलेस, कोदंडराम मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर, बद्वलिंग मंदिर, प्रचंड आकाराचा नंदी, हत्तीखाना यासारखी जवळपास 35 पर्यटन स्थळे हम्पी मध्ये आहेत.
सारांश-हंपी हे कर्नाटकातील विजय नगर जिल्ह्यातील समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले पर्यटन स्थळ आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून हम्पीला मान्यता दिलेली आहे. उत्तम वाहतूक व्यवस्था सर्व सुखसोयींनी युक्त असलेली निवास व्यवस्था हॉटेल या ठिकाणी आहेत. भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन महामंडळ, कर्नाटक शासन आणि स्थानिक लोकांच्या समन्वयातून हम्पी एक प्रेक्षणीय सांस्कृतिक पर्यटनस्थळ झाले आहे.
Hampi : A cultural tourism destination
Hampi was the capital city of Vijayanagara Empire. The city of Hampi is situated on the banks of the Tungabhadra River. The ancient Sanskrit name of Hampi was Pampa. In later times it was corrupted to Kannada as Hampe or Hampi. The place Kiskinda mentioned in Ramayana was located here..Krishna Devaraya became a very famous ruler in the history of Vijayanagara. It was he who brought glory to Hampi.
Virupaksha Temple Hampi:- This temple is built in grand Dravidian architectural style. This temple was built during the reign of Devaraya II. In front of the temple is Nandi Mandap. In this Nandi is three-faced. A festival is organized in this temple in February. Virupaksha temple is open for darshan from 9 am to 11 am and 5 pm to 9 pm.
Vijay Vitthal Temple Hampi:- This unique temple is always crowded with tourists. The sound of various musical instruments comes from the pillars of this temple. This special feature of temple architecture is seen only in Hampi. In front of the Vijay Vitthal Temple is a stone Garuda Rath carved into an unbroken stone. It is a monolithic sculpture that is a wonderful example of sculpture. Vijay Vitthal Temple is a major tourist attraction in Hampi.
Lotus Mahal Hampi:- This vastu is built in typical architectural style.The vastu is built with two floors on twenty four pillars. Its shape is like a lotus flower.
Archaeological Museum Hampi :- Tourists must visit the archaeological museum in Hampi. This museum is divided into four sections.In it various types of objects, model replicas of Hampi city, sculptures, idols, coins, weapons, inscriptions reveal the wonderful history of the Vijayanagar Empire.
Hampi Bazaar:- The most favorite place for tourists is Hampi Bazaar. Tourists flock here to buy local handicrafts, clothes, silver jewellery, bags, leather goods etc.
Sightseeing places in Hampi:- There are many temples in Hampi including Virupaksha Temple, Vijay Vitthal Temple, Lotus Mahal, Hampi Bazaar, Queen’s Bath (Queen’s Royal Bath), Hanuman Temple, Matang Hill, Archaeological Museum, numerous ruins scattered on the banks of Tungabhadra River. , Underground Temple, Pushkarini, Staircase, Gagan Mahal, Hemkoot Parvat, Veer Harihar Palace, Kodandram Temple, Lakshmi Narasimha Temple, Badwalinga Temple, Huge Sized Nandi, Elephant Khana are about 35 tourist places in Hampi.
Summary:- Hampi is a tourist destination with rich historical heritage in Vijayanagar district of Karnataka. Hampi has been recognized as a World Heritage Site by UNESCO. Accommodation facilities with all the comforts are available in this place with good transport links. Hampi has become a spectacular cultural tourist destination through the coordination of Archaeological Department of India, Tourism Corporation, Government of Karnataka and local people.
राजस्थान म्हटले की सहजपणे आपल्याला जयपूर ,उदयपूर ,चित्तोडगड ,कुम्बलगड, माउंट आबू ,अजमेर ,जेसलमेर ,पुष्कर ,आमेर फोर्ट ,जयगड ही नावे सहजच समोर येतात. याशिवाय राजस्थान सरकार व तिथले पर्यटन महामंडळ अनेक नव्या पर्यटनस्थळांचा विकास करीत आहे. पर्यटन उद्योग राजस्थान मधील एक प्रमुख उद्योग आहे. याशिवाय राजस्थानमध्ये वस्त्रोद्योग, लोकरी कपडे, वनस्पती तेल ,तांबे आणि जस्त,काच, सिमेंट यासारखेही उद्योग आहेत. राजस्थानच्या अर्थव्यवस्थेला पंधरा टक्के उत्पन्न पर्यटन उद्योगातून मिळते .
राजस्थानमध्ये पर्यटनासाठी का जावे? याची काही कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील-1) राजस्थानातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळे एकमेकांशी रस्ते व रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. जयपूर उदयपूर येथे विमानाने जाता येते.2) निवासासाठी श्रीमंत, मध्यमवर्गीय ,सर्वसामान्य पर्यटक आणि विदेशी पर्यटकांनाही परवडतील अशी निवास व्ववस्था3) देश-विदेशातील सर्व प्रकारच्या पर्यटकाननासहज उपलब्ध होणारे खाद्यपदार्थ4) सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर माहिती देण्यासाठी भारतातील तसेच जगातील प्रमुख भाषेतील मार्गदर्शक (Guide) उपलब्ध आहेत.5) पर्यटन स्थळांची प्रसिद्धी खाजगी संस्था, शासन आणि पर्यटन महामंडळाद्वारे तसेच विविध संकेतस्थळे व माहिती पुस्तिका द्वारे सातत्याने केले जाते.6) पर्यटन स्थानना भेट देण्यासाठी खाजगी व सरकारी किफायतशीर वाहतूक व्यवस्था.7) उंट ,घोडा ,हत्ती यांची सफारी8) राहूटी आणि तंबू मध्ये राहण्याची सोय9) पर्यटनस्थळांवर राजस्थानी नृत्य व हस्तकला प्रदर्शन10) पॅलेस ऑन व्हील या शाही सोयी सुविधांनी युक्त अशा रेल्वेची सफर11) राजस्थान मधील अनेक स्थळांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेली आहे.12) राजस्थान सरकारने पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी लक्झरी टॅक्स दहा टक्के वरून आठ टक्के केला आहे.
वरील काही प्रमुख कारणांमुळे पर्यटकांना राजस्थानमध्ये पर्यटन करताना खूप चांगला अनुभव येतो त्यामुळे पर्यटक राजस्थान मध्ये पर्यटनास जाणे पसंत करतात.संपूर्ण राजस्थान मधील पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर पंधरा दिवसाच्या सहलीचे नियोजन करावे लागेल.
राजस्थान प्रमुख पर्यटन स्थळे आणि त्यांचे लाईव्ह लोकेशन
जयपूर राजस्थानच्या राजधानीचे शहर असून येथे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तू विविध राजवटीमध्ये बांधलेल्या आहेत.यापैकी पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय आणि आकर्षणाच्या वास्तू म्हणजे हवा महल आणि जल महल ह्या आहेत. याशिवाय जंतर-मंतर ,अंबर पॅलेस ,सिटी पॅलेस या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात.गुलाबी शहर या नावानेही जयपूर प्रसिद्ध आहे.
उदयपूर मेवाड घराण्यातील महाराणा उदयसिंह द्वितीय यांनी उदयपूर शहराची स्थापना केली.उदयपूर मध्ये सिटी पॅलेस,जयसमंद सरोवर,चित्तोडगढ किल्ला,फतेह सागर सरोवर हि पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.याशिवाय राजस्थान सरकार काही ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करीत आहे.
चित्तोडच्या किल्ल्यात पाहावयाची ठिकाणे राजपुतांचे शौर्य,त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणजे चित्तोडचा किल्ला होय.चित्तोडगढ अनेक ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार आहे.चित्तोडगढ इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहे.पद्मिनी पॅलेस,विजयस्थंभ,कीर्तिस्तंभ,वस्तू संग्रहालय,जैन व हिंदू मंदिरे,संत मीराबाईचे मंदिर,अनेक राजवाडे पर्यटकांनी गजबजलेले असतात.
जोधपूर राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऐतिहासिक शहर आहे.Blue City या नावानेही जोधपूर शहर ओळखले जाते.या ठिकाणी अनेक किल्ले,राजवाडे,मंदिरे,हवेली आणि घरे व इमारती निळ्या रंगाने रंगवलेली आहेत.
भारतातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर पुष्कर येथे आहे.हिंदू मान्यतेनुसार ब्रह्मदेवाची पूजा फक्त पुष्कर येथेच केली जाते.याशिवाय पुष्कर सरोवर पर्यटकांचे आणि भाविकांचे आकर्षण केंद्र आहे.दरवर्षी कार्तिक महिन्यात पुष्कर मेळा या ठिकाणी भरतो.पुष्कर उंट मेळा किंवा कार्तिक मेळा असेही स्थानिक लोक याला म्हणतात.राजस्थान पर्यटन विभागामार्फत पुष्कर मेळाव्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
माऊंट अबू राजस्थान मधील लोकप्रिय थंड हवेचे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे.राजस्थान आणि गुजरात यांच्या सीमेवर स्थित आहे.अरावली पर्वत रांगा आणि घनदाट जंगल यामुळे येथील हवामान थंड असते.माउंट अबू येथील दिलवाडा जैन मंदिरे संगमरवरी दगडात बांधलेले असून स्थापत्य कला व मूर्तिकला यांच्या दृष्टीनेही अप्रतिम आहेत.अनेक पौराणिक कथांचा संबंध माउंट अबूशी जोडला जातो.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान,बिकानेर,अलवार,अजमेर,जैसलमेर,कोटा, मांडवा,भरतपूर अभयारण्य,सवाई माधोपुर,बुंदी आणि रणकपुर या पर्यटन स्थळांना पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
Rajasthan: A must visit place for tourists
Jaipur, Udaipur, Chittodgarh, Kumbalgad, Mount Abu, Ajmer, Jaisalmer, Pushkar, Amer Fort, Jaigarh are easily mentioned when we say Rajasthan. Apart from this, Rajasthan government and its tourism corporation are developing many new tourist spots. Tourism industry is a major industry in Rajasthan. Apart from this, Rajasthan also has industries like textiles, woolen clothes, vegetable oil, copper and zinc, glass, cement. Fifteen percent of Rajasthan’s economy comes from the tourism industry.
Why visit Rajasthan for tourism? Some of the reasons for this can be stated as follows- 1) All the major tourist places in Rajasthan are connected with each other by road and rail. Jaipur to Udaipur can be reached by plane. 2) Accommodation that can be afforded by rich, middle class, ordinary tourists and foreign tourists as well 3) Food available for all types of tourists in the country and abroad 4) Guide available in major languages of India and the world to provide information on all major tourist spots. 5) Publicity of tourist places is continuously done by private organizations, government and tourism corporation as well as through various websites and information booklets. 6) Private and government cost-effective transport system for visiting tourist places. Accommodation in tents 9) Rajasthani dance and handicrafts exhibition at tourist spots 10) Palace on wheels train journey with royal amenities 11) Many places in Rajasthan have been registered as UNESCO World Heritage Sites. 12) Rajasthan government has increased luxury tax from 10% to 8% to promote tourism. has done
Due to some of the above major reasons, the tourists have a very good experience while doing tourism in Rajasthan, so tourists prefer to go for tourism in Rajasthan. If you want to enjoy the tourist places of entire Rajasthan to your heart’s content, then you have to plan a fifteen day trip.
Top tourist places preferred by tourists in Rajasthan and their live location
Jaipur – Live Location -https://goo.gl/maps/dEfdDfRuY8vWijeo9
Jaipur is the capital city of Rajasthan and there are many historical and cultural monuments built in different dynasties. Among these, the most popular and attractive monuments for tourists are Hawa Mahal and Jal Mahal. Apart from this, tourists also pay a visit to Jantar-Mantar, Amber Palace, City Palace. Jaipur is also known as Pink City.
Udaipur Maharana Uday Singh II of the Mewar dynasty founded the city of Udaipur. City Palace, Jaisamand Lake, Chittogarh Fort, Fateh Sagar Lake are popular places for tourists in Udaipur. Apart from this, Rajasthan government is developing some historical places for tourism.
Chittorgarh- Live Location -https://goo.gl/maps/j7deWSPPmvitBLgZ7
Chittor Fort is a symbol of bravery, sacrifice and sacrifice of Rajputs. Chittorgarh is a silent witness of many historical events. Chittorgarh is a place of inspiration and inspiration for all the tourists who come here. The palaces are crowded with tourists.
Jodhpur is the second largest historical city in Rajasthan. Jodhpur city is also known as Blue City. Many forts, palaces, temples, mansions and houses and buildings are painted in blue color.
Pushkar- Live Location -https://goo.gl/maps/2jFBJ2yLbkGwavLv9
Pushkar is the only temple of Lord Brahma in India. According to Hindu belief Lord Brahma is worshiped only in Pushkar. Apart from this, Pushkar Sarovar is the center of attraction for tourists and devotees. Every year in the month of Kartik, Pushkar Mela is held at this place. It is also called Pushkar Camel Fair or Kartik Mela by local people. Rajasthan The Pushkar fair is organized on a large scale by the tourism department.
Mount Abu-Live Location -https://goo.gl/maps/ic7Ap6JQ2BVRhXis9
It is a popular cold weather natural tourist destination in Rajasthan. It is located on the border of Rajasthan and Gujarat. The climate here is cool due to the Aravalli mountain range and dense forest. Mythology is associated with Mount Abu.
Ranthambore National Park, Bikaner, Alwar, Ajmer, Jaisalmer, Kota, Mandwa, Bharatpur Sanctuary, Sawai Madhopur, Bundi and Ranakpur are popular tourist destinations.