Thursday, November 2, 2023





अहमदाबाद शहर पंधराव्या शतकात सुलतान अहमद शाह यांनी स्थापन केले. अहमदाबाद भारताच्या गुजरात राज्यात असून समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले प्रसिद्ध शहर आहे. युनेस्कोने जुलै 2017 मध्ये जागतिक वारसा शहर म्हणून मान्यता दिली आहे.

अहमदाबादची ऐतिहासिक पार्श्वभूमी– सुलतान अहमदशहा याच्या नावावरून या शहराला अहमदाबाद हे नाव पडले. मध्य युगातील व्यापारी मार्गावर अहमदाबाद Location Link – https://maps.app.goo.gl/KU7EJoNWwG87au6G6 हे प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. सुलतान अहमद शाह यांच्या काळात अहमदाबाद येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधण्यात आल्या. त्यामध्ये ऐतिहासिक जामा मस्जिद आणि शहराभोवती मजबूत तटबंदी यांचा समावेश होतो. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि साबरमती आश्रम यामुळे अहमदाबाद जगाच्या नकाशावर आले. युनेस्कोने मान्यता दिलेले अहमदाबाद शहर भारतातील पहिले जागतिक वारसा शहर आहे. अलीकडच्या काळात अहमदाबाद परिसरात अनेक पर्यटन स्थळे विकसित झाली आहेत. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात आमदाबाद येथे येतात.

साबरमती आश्रम –https://maps.app.goo.gl/w8QxW1LnMg44aAZE8 अहमदाबाद  मध्ये साबरमती नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात साबरमती आश्रम आहे. गांधी आश्रम या नावानेही साबरमती आश्रमाला ओळखले जाते. साबरमती आश्रम स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. महात्मा गांधींचे वास्तव्य 1917 ते 1930 या काळात साबरमती आश्रमात होते. 1930 मध्ये दांडी मार्च किंवा मिठाचा सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात साबरमती आश्रमातूनच झाली होती. याशिवाय असहकार चळवळ, सायमन चले जाव आंदोलन तसेच देश-विदेशातून आलेले विविध क्षेत्रातील लोक यांच्यासोबत झालेली चर्चा आणि निर्णय साबरमती आश्रमामध्येच झाले आहेत. साबरमती संग्रहालय– आश्रमात एक वस्तुसंग्रहालय विकसित करण्यात आले आहे. यामध्ये गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू, छायाचित्रे, कागदपत्रे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. त्यातून साबरमती आश्रमातील गांधीजींचा जीवनपट उलगडतो. याशिवाय स्वातंत्र्यपूर्व  काळातील इतिहासात महात्मा गांधींनी केलेल्या योगदानाची माहिती मिळते. साबरमती ग्रंथालय– साबरमती आश्रमामध्ये असलेल्या ग्रंथालयात महात्मा गांधींनी स्वतः लेखन केलेले सर्व ग्रंथ, वर्तमानपत्र, पाक्षिक, मासिके, नियतकालिके यांचा मोठा संग्रह आहे. याशिवाय देश-विदेशातील चरित्रकारांनी महात्मा गांधींच्या जीवनावर लिहिलेले चरित्र ग्रंथ या ग्रंथालयात ठेवलेले आहेत. साबरमती उपक्रम व कार्यक्रम –साबरमती आश्रमात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात.यामध्ये गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चर्चासत्रे, संमेलने व अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यटनाच्या दृष्टीनेही आता साबरमती आश्रमाचा विकास करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी गांधीजींच्या जीवनावर तयार केलेली ध्वनी प्रकाश योजना चित्रफीत( लाईट अँड साऊंड शो) पर्यटकांना दाखविली जाते. साबरमती आश्रम म्हणजे महात्मा गांधींचे जिवंत स्मारक आहे. गांधीजींचे तत्त्वज्ञान, त्यांचे राहणीमान, त्यांचे साहित्य आणि राजकीय व सामाजिक कार्याचा इतिहास समजून घेण्यासाठी साबरमती आश्रमात आवर्जून गेले पाहिजे.

Sabarmati Ashram
Sabarmati Ashram
Sabarmati Ashram-Ahmedabad
Sabarmati Ashram Ahmedabad

Advertisements
REPORT THIS AD

अहमदाबाद येथील पोल घरे -आमदाबाद येथील वैशिष्ट्यपूर्ण पोल घरे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत.चौरस आकाराची टुमदार घरे,घरासमोर अंगण,घरामध्ये ओसरी, मुख्य प्रवेशद्वार आणि मागील बाजूस स्त्रिया आणि लहान मुले यांच्यासाठीचे स्वतंत्र दार अशी याची मूळ रचना आहे. कालानुरूप त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत .घराच्या बांधकामामध्ये लाकडी कोरीव कामाचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. घराचे  खांब, सज्जे,खिडक्या,दारे, छत यासाठी लाकडाचा वापर केलेला आहे. त्यावर केलेले कोरीव नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेक्षणीय आहे. घरांच्या बांधकामामध्ये स्टको शिल्पकामाचा उपयोग केलेला आहे.पिवळा, हिरवा, नारंगी,निळा या रंगाचा वापर केल्यामुळे पोल घरे खूपच आकर्षित दिसतात. ही सर्व पोलघरे हस्तकला व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची आहेत. अहमदाबाद येथील पोल घरांसमोरील अंगणात हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पर्यटक पोल घरांना भेट देतात.

Pol house-Ahmedabad
Pol house-Ahmedabad

ऐतिहासिक जामा मस्जिद– अहमदाबाद येथे  सन 1424 मध्ये सुलतान अहमद शाह यांच्या काळात  वैशिष्ट्यपूर्ण इंडो-इस्लामिक शैलीत बांधलेली  मस्जिद आहे. मस्जिदीचे मिनार, घुमट, खांब आणि भिंतीवरील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेक्षणीय झाले आहे.

Jama Masjid-Ahmedabad
Jama Masjid-Ahmedabad

अदलाज बारव (पायऱ्यांची विहीर) -गुजरात मध्ये अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे तत्कालीन शासकांनी ठिकठिकाणी पाण्यासाठी पायऱ्यांच्या विहिरी बांधलेल्या आहेत. अहमदाबादच्या सीमेवर आदलाज बारव मध्ययुगात बांधलेली आहे. ही बारव जमिनीमध्ये पाच मजली खोल आहे.त्यावरील शिल्पकाम,स्तंभ पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.अशा प्रकारच्या पायऱ्याच्या विहिरी त्या काळात एक सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करीत असत. या ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.

Adlaj Vav-Barav-Ahmedabad
Adlaj Vav-Barav-Ahmedabad

गुजराती खाद्य संस्कृती-अहमदाबाद येथे आलेल्या पर्यटकांचे गुजराती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय अहमदाबाद पर्यटन पूर्ण होत नाही. प्रसिद्ध गुजराती खाद्यपदार्थ ढोकळा,फाफडा,बाकरवडी,खाकरा आणि गुजराती थाळी यांचे पर्यटकांना खास आकर्षण असते. अहमदाबाद मधील सर्व भागात गुजराती खाद्यपदार्थांची छोटी मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खवय्यांची चांगली सोय झाली आहे.

अहमदाबाद परिसरातील पर्यटन स्थळे– अहमदाबाद परिसरात गुजरातची राजधानी गांधीनगर थोड्याच अंतरावर आहे .गांधीनगर नियोजनबद्ध नगर रचनेसाठी प्रसिद्ध आहे.गांधीनगर मधील अक्षरधाम मंदिर आणि सरिता उद्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. अक्षरधाम– गांधीनगर येथे स्वामीनारायण संप्रदायाचे अक्षरधाम मंदिर आहे. वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, शिल्पकला आणि मूर्ती कलेसाठी अक्षरधाम प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक आणि श्रद्धाळू मोठ्या प्रमाणात अक्षरधाम येथे जातात. मोढेरा सूर्य मंदिर- अहमदाबाद पासून 100 किलोमीटर अंतरावर सोळंकी घराण्यातील राजांनी बांधलेले सूर्य मंदिर शिल्पकला व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.मंदिर परिसरात एक पुष्करणी (स्नान कुंड) आहे. लोथल -अहमदाबाद पासून 85 किलोमीटर अंतरावर सिंधू संस्कृतीमधील प्रसिद्ध शहर  लोथल आहे. लोथल सिंधू संस्कृतीमधील एक व्यापारी केंद्र होते. या ठिकाणाहून समुद्र मार्गे व्यापार चालत असे. लोथल येथे जहाज बांधणी, दुरुस्ती व वाहतुकीसाठी जहाजाची गोदी बांधलेली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि पर्यटन विभागाने संपूर्ण लोथल शहर जतन आणि संवर्धन केले आहे. लोथल वस्तू संग्रहालय– भारतीय प्रातःतत्व सर्वेक्षण विभागाने लोथल येथे उत्खनन स्थळ वस्तू संग्रहालय उभारले आहे. लोथल येथील वस्तुसंग्रहालयात उत्खननात मिळालेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत.त्यामुळे सिंधू संस्कृतीमधील समुद्रमार्गे चालणारा व्यापार आणि नगररचना यांची माहिती होते. सिंधू संस्कृती मधील लोथल जगातील सर्वात प्राचीन व्यापारी बंदर असल्यामुळे केंद्र सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोथल येथे विकास कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.

पर्यटकांसाठी सोयीसुविधा अहमदाबाद गुजरात मध्ये एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटकांना निवासासाठी   सामान्य, मध्यम आणि उच्च दरातील हॉटेल्स अहमदाबाद येथे आहेत. याशिवाय राहण्यासाठी सर्विस अपार्टमेंट, विश्रांतीगृह ,धर्मशाळा अहमदाबाद येथे आहेत.अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील व विदेशातील प्रमुख शहरांना जोडलेले आहे. तसेच रेल्वे स्टेशन भारतातील सर्व प्रमुख शहरांना जोडले आहे. अहमदाबाद दर्शन बस व खाजगी बस, रिक्षा तसेच टॅक्सीतून अहमदाबाद पर्यटन करता येते. अहमदाबाद येथे पर्यटकांना माहितीसाठी गुजरात पर्यटन विभागामार्फत माहिती केंद्र उपलब्ध आहे. त्यामध्ये अहमदाबाद माहिती पुस्तक, नकाशे, वाहतूक व्यवस्था, पर्यटन स्थळे इत्यादीची माहिती दिली जाते. अहमदाबाद येथे अनेक खाजगी प्रवासी संस्था अहमदाबाद पर्यटनाचे आयोजन करतात.अहमदाबाद मध्ये शॉपिंग साठी लॉ गार्डन, माणेक चौक परिसरात अनेक शॉपिंग मॉल, दुकाने आणि स्टॉल्स आहेत. याशिवाय गुजराती पारंपारिक कपडे,हस्तकला वस्तू, अलंकार,दागदागिने खरेदी करण्यासाठी धलगरवाड बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

सारांश– गुजरात मधील अहमदाबाद शहर ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे. युनेस्कोने भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून अहमदाबाद शहराला मान्यता दिली आहे. अहमदाबाद येथे इतिहास आणि वर्तमान यांचा अपूर्व संगम पहावयास मिळतो. अहमदाबादचे वर्णन भारताचे मँचेस्टर म्हणून केले जाते.अहमदाबाद वस्त्रोद्योगासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अहमदाबाद मधील ऐतिहासिक वास्तू, महात्मा गांधींचा साबरमती आश्रम,खवय्यांसाठी गुजराती खाद्यपदार्थ तसेच अहमदाबाद परिसरातील पर्यटन स्थळे या सर्व वैशिष्ट्यांमुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये अहमदाबादला भेट देतात.

Ahmedabad: A UNESCO World Heritage City

The city of Ahmedabad was founded by Sultan Ahmad Shah in the fifteenth century. Ahmedabad is a famous city in the Indian state of Gujarat with rich historical and cultural heritage. It was recognized as a World Heritage City by UNESCO in July 2017.

Historical Background of Ahmedabad– The city got its name Ahmedabad after Sultan Ahmad Shah. Ahmedabad was a famous trading center on the trade routes of the Middle Ages. Many characteristic buildings were constructed in Ahmedabad during the reign of Sultan Ahmad Shah. It includes the historic Jama Masjid and a strong fortification around the city. Later, in the pre-independence period, Mahatma Gandhi and the Sabarmati Ashram brought Ahmedabad on the world map. Ahmedabad is India’s first World Heritage City to be recognized by UNESCO. Many tourist spots have developed in the Ahmedabad area in recent times. Therefore, tourists from home and abroad come to Ahmedabad in large numbers.

Sabarmati Ashram – Sabarmati Ashram is situated in a scenic area on the banks of Sabarmati River in Ahmedabad. Sabarmati Ashram is also known as Gandhi Ashram. Sabarmati Ashram has witnessed many historical events during the pre-independence era. Mahatma Gandhi lived in the Sabarmati Ashram from 1917 to 1930. In 1930, the Dandi March or the Salt Satyagraha Movement started from the Sabarmati Ashram itself. Apart from this, discussions and decisions with non-cooperation movement, Simon Chale Jav movement and people from different fields from home and abroad have taken place in Sabarmati Ashram itself. Sabarmati Museum- A museum has been developed in the ashram. In this, many objects, photographs, documents related to Gandhiji’s life have been arranged in an attractive manner. It reveals the life story of Gandhiji in Sabarmati Ashram. Apart from this, the contribution of Mahatma Gandhi in the history of the pre-independence era is known. Sabarmati Library- The library located in the Sabarmati Ashram has a large collection of all the books written by Mahatma Gandhi himself, newspapers, fortnightly, magazines, periodicals. Apart from this, biographical texts written on the life of Mahatma Gandhi by biographers from home and abroad are kept in this library. Sabarmati Activities and Programs – Sabarmati Ashram conducts many activities throughout the year. In this, seminars, meetings and many programs are organized to promote and disseminate Gandhian ideas. Sabarmati Ashram has also been developed in terms of tourism. Dhvani Prakash Yojana (light and sound show) based on Gandhiji’s life is shown to the tourists. Sabarmati Ashram is a living memorial of Mahatma Gandhi. A visit to Sabarmati Ashram is a must to understand Gandhiji’s philosophy, his lifestyle, his literature and the history of his political and social work.

Pole Houses in Ahmedabad – Typical Pole Houses in Ahmedabad are a tourist attraction. They have a basic design of square shaped tumdar houses, a courtyard in front of the house, an osari inside the house, a main entrance and a separate door for women and children at the back. Necessary changes have been made in it over time. Wood carving has been extensively used in the construction of the house. Wood is used for the pillars, furniture, windows, doors, roof of the house. The carving done on it is unique and spectacular. Stucco sculpture is used in the construction of the houses. Due to the use of yellow, green, orange, blue colors, pole houses look very attractive. All these polgharas belong to artisans doing handicraft business. Handicrafts are available for sale in the front yard of pole houses in Ahmedabad. Tourists visit pole houses to buy these items.

Historic Jama Masjid– Ahmedabad is a mosque built in the typical Indo-Islamic style during the reign of Sultan Ahmed Shah in 1424 AD. The minarets, domes, pillars and carvings on the walls of the mosque are distinctive and spectacular.

Adalaj Barav (Step well) – Due to water scarcity in many parts of Gujarat, the then rulers built step wells for water supply. Adlaj Barva was built in the middle ages on the border of Ahmedabad. This barva is five stories deep in the ground. Sculptures, pillar steps are characteristic on it. Such step wells functioned as a cultural center during that time. Social and cultural events were organized at this place.

Gujarati Food Culture– Ahmedabad tourism is not complete without tourists visiting Ahmedabad relishing Gujarati food. The famous Gujarati cuisines Dhokla, Fafda, Bakarwadi, Khakra and Gujarati thali are a special attraction for tourists. All parts of Ahmedabad have a large number of Gujarati food shops. So the foodies have been well catered for.

Tourist Places in Ahmedabad Area– In Ahmedabad area, Gandhinagar, the capital of Gujarat, is at a short distance. Gandhinagar is famous for its well-planned urban design. Akshardham Temple and Sarita Udyan in Gandhinagar are tourist attractions. Akshardham- Akshardham temple of Swaminarayan sect is located in Gandhinagar. Akshardham is famous for its unique architecture, sculpture and idol art. Tourists and devotees flock to Akshardham in large numbers to see this temple in the scenic surroundings. Modhera Sun Temple– 100 Kilometers away from Ahmedabad  , the Sun Temple built by the kings of the Solanki dynasty is famous for its sculpture and architecture. There is a pushkarni (bathing tank) in the temple premises. Lothal – Lothal is a famous city of Indus civilization at a distance of 85 km from Ahmedabad. Lothal was a trading center in the Indus Civilization. From this place trade was carried on by sea. A ship dock was built at Lothal for ship building, repair and transportation. The entire city of Lothal has been preserved and conserved by the Department of Archaeological Survey of India and the Department of Tourism. Lothal Artifacts Museum- The Archaeological Survey of India has set up an Excavation Site Artifacts Museum at Lothal. The objects found in the excavations are kept in the museum at Lothal, which gives information about the sea-borne trade and urban planning of the Indus Civilization. Since Lothal in the Indus Civilization is the oldest trading port in the world, the central government has started development works at Lothal on a war footing to provide all the facilities in terms of tourism.

Tourist Facilities– Ahmedabad being a major tourist destination in Gujarat, all the necessary tourist facilities are available. There are normal, medium and high priced hotels in Ahmedabad to accommodate tourists. Apart from this, there are service apartments, rest houses, Dharamshalas in Ahmedabad for accommodation. The Sardar Vallabhbhai Patel International Airport in Ahmedabad is connected to major cities in India and abroad. Also the railway station is connected to all the major cities of India. Ahmedabad tourism can be done by darshan bus and private bus, rickshaw and taxi. An information center is available at Ahmedabad through the Gujarat Tourism Department to provide information to tourists. It provides information about Ahmedabad information book, maps, transport system, tourist places etc. Many private travel agencies organize Ahmedabad tourism in Ahmedabad. Ahmedabad has many shopping malls, shops and stalls in Law Garden, Manek Chowk area for shopping. Apart from this, Dhalgarwad market is famous for buying Gujarati traditional clothes, handicrafts, ornaments, jewellery.

Summary– The city of Ahmedabad in Gujarat is historically and culturally rich. UNESCO has recognized the city of Ahmedabad as India’s first World Heritage City. Ahmedabad offers a unique blend of history and present. Ahmedabad is described as the Manchester of India. Ahmedabad is also famous for its textile industry. Ahmedabad’s historical architecture, Mahatma Gandhi’s Sabarmati Ashram, Gujarati food for gourmets and tourist attractions in Ahmedabad area attract tourists from home and abroad in large numbers.

Advertisements

No comments:

Post a Comment